

Stock Market Today : देशातंर्गत शेअर बाजारात आज (दि. ९ जून) आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी तेजीने सुरुवात झाली. सेन्सेक्स ३८६ अंकांनी वाढून ८२,५७४ वर तर निफ्टी १५७ अंकांनी वाढून २५,१६० वर उघडला. बँक निफ्टी ४७१ अंकांनी वाढून ५७,०४९ वर उघडला.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह ८२,६०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील १०० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह २५,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ समभागांमध्ये वाढ दिसून येत आहे. आज, ऑटो, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात, सेन्सेक्स ७३७ अंकांनी आणि निफ्टी २५२ अंकांनी वाढला. २-६ जून २०२५, म्हणजेच गेल्या आठवड्यात, भारतीय शेअर बाजारात चढउतार दिसून आले, परंतु आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. सुरुवातीच्या घसरणीनंतर गेल्या दोन दिवसांत निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये मोठी सुधारणा दिसून आली. संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स ७३७ अंकांनी आणि निफ्टी २५२ अंकांनी वाढलाहोता.आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजे शुक्रवार, ६ जून रोजी, आरबीआयने ५० बेसिस पॉइंट रेपो रेट कपात आणि १०० बेसिस पॉइंट सीआरआर कपात केल्यामुळे बाजाराला वेग आला आहे. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारून ८२,१८९ वर बंद झाला आणि निफ्टी २५२ अंकांनी वधारून २५,००३ वर बंद झाला. व्याजदरात कपात झाल्यामुळे रिअल्टी, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रांना चालना मिळाल्याचे दिसले.