

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आज ( दि20 ऑगस्ट) शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीने बंद झाले. सेन्सेक्स 378 अंकांनी वाढून 80,802 वर तर निफ्टी 126 अंकांनी वाढून 24,698 वर बंद झाला. बँक निफ्टी 434 अंकांनी वाढून 50,803 वर बंद झाला.
जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांमुळे मंगळवारी (20 ऑगस्ट) भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडले. सेन्सेक्स 225 अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टीने 60 अंकांची वाढ दर्शविली. बँक निफ्टी 78 अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टीचे सर्व क्षेत्र हिरवेगार होते. तर निफ्टी 50 चे 48 समभाग हिरव्या रंगात व्यवहार करत होते. निफ्टीवर, बीपीसीएल, टीसीएस, टाटा मोटर्स, इंडसइंड बँकमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी बँक निर्देशांक वाढीने बंद झाला. आजच्या व्यवहारात आयटी आणि फार्मा समभागात खरेदी दिसली. ऑटो, पीएसई, मेटल निर्देशांक वाढीने बंद झाले. तथा, FMCG निर्देशांक किंचित घसरणीसह बंद झाले.
एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स आणि इंडसइंड बँक वाढले. तर ओएनजीसी, भारती एअरटेल, अदानी एंटरप्रायझेस, सिप्ला आणि अपोलो हॉस्पिटल्स घसरले.व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 378.18 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 80,802.86 वर बंद झाला. तर निफ्टी 100.80 अंक किंवा 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 24,673.45 च्या पातळीवर बंद झाला.एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. बँक, हेल्थकेअर, आयटी, मेटल, पॉवर निर्देशांक 0.5-1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
BSE वर सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील सुमारे 454.4 लाख कोटी रुपयांवरून सुमारे 456.7 लाख कोटी रुपयांरवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांनी एकाच सत्रात २ लाख कोटींहून अधिक कमावल्याचे स्पष्ट झाले.