Shrimanth Bazaar fraud | सूत्रधार महिलेला पुण्यातून अटक

पोलिस कोठडी : घोटाळ्याच्या व्याप्तीत वाढ
Shrimanth Bazaar fraud |
Shrimanth Bazaar fraud | सूत्रधार महिलेला पुण्यातून अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : गडहिंग्लज येथील श्रीमंत बाजार कंपनीत झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार फरार महिलेला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील चतु:शृंगी पोलिसांच्या मदतीने रविवारी पहाटे छापा टाकून अटक केली. वैशाली काशिनाथ गुरव (37, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी बजावली आहे.

दोन कोटी 95 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी श्रीमंत बाजार कंपनीच्या पदाधिकार्‍यांसह नऊजणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वैशाली गुरव हिच्यावरील कारवाईमुळे अटक झालेल्यांची संख्या दहा झाली आहे. मध्य प्रदेश येथील धमेंद्र शेंगर हा अद्याप फरारी आहे. आर्थिक गुन्हे शाखेने एक आठवड्यापूर्वी फरार असलेले संशयित रमेश शिरगावे, रणजित रावण, संतोष भोसले, तुषार चौथे, विठ्ठल जाधव, सदाशिव चव्हाण यांना अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news