Share Market Slowdown | बाजार मंदीच्या छायेत

Share Market Under the Shadow of Slowdown
Share Market Slowdown | बाजार मंदीच्या छायेतPudhari File Photo
Published on
Updated on

भक्ती साळोखे

दिल्लीमधील जंतरमंतरवरचे चिघळत जाणारे विद्यार्थ्यांचे आंदोलन, आखातातील न थांबणारा संघर्ष आणि त्यामुळे क्रुड ऑईलच्या दरात झालेली वाढ या तीन घटनांच्या कात्रीत बाजार सापडला आणि आठवड्याचे पाचही दिवस त्याचे लाल रंग दाखवला. निफ्टी अडीच टक्के तर सेन्सेक्स पावणेतीन टक्के कोसळला. बँक निफ्टी सध्या तीन टक्के आणि स्मॉल कॅप इंडेक्स सव्वादोन टक्के आपटले. त्या मानाने मिड कॅप इंडेक्स थोडा कमी म्हणजे सव्वा टक्के घसरला.

तीन मोठ्या आधारपातळ्या तोडून निफ्टी आता २३७६७.४५ वर थांबला आहे. २४१०० ही निफ्टीची ५० दिवसांच्या Daily Expenential moving average ची पातळी होती. २४००० ही phycatogical support पातळी होती. या दोन्ही पातळ्या तोडून निफ्टीने २३८०० ची पातळी तोडली. सोमवारी निदान २३८०० च्या वरती निफ्टी राहायला हवा, अन्यथा २३३०० पर्यंत तो घसरण्याची भीती आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे ब्रेन्ट क्रूडच्या दराने उसळी मारली आणि तो प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेला. त्यामुळे महागाई वाढते काय आणि महागाई वाढली की रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवते काय, अशीही भीती निर्माण झाली आहे. ऑटो आणि एनसीएफसी ही दोन्ही सेक्टर्स Interest Rate Sensitive आहेत. व्याज दरांबद्दल साशंकता निर्माण झाली की पहिल्यांदा ती धाराशायी होतात.

Nifty Realty आणि Nifty Financial Services नी बाजाराला खाली खेचण्याचे काम सर्वात जास्त केले. Nifty Pharma, Energy, Infra, Metal यांनी त्यांना साथ दिली. Nifty Auto, FMCG, CPSE यांनी बाजार काहीसा सावरून धरला. Jewellery शेअर्स चांगले वाढले. Bluestane, Jewellery & Lifestyle हा शेअर पंचवीस टक्क्यांहून अधिक वाढला. (रु ७७२.४०) मागील सहा महिन्यांपासून तो एकसारखा वाढत आहे. कंपनीचे फंडामेंटल आणि पहिल्या तिमाहीचे आर्थिक नियम पाहाल तर तुम्ही चकीत व्हाल, इतके ते खराब आहेत. बाजार कुणाच्या पदरात लाभाचे माप टाकील याचा नेम नाही, असे तुम्हला वाटेल. अशा शेअर्समधील तेजी ही तात्कालिक असते. त्यांच्यापासून दूरच राहिलेले बरे. याच सेक्टरमधील पुढील शेअर्स चांगले वाढत आहेत. Kalyan Jewellers, Thangamayil Jewellery, Sky Gold and Diamonds, P N Gadgil Jewellers, Sencg Gold.

Huhtamaki India Ltd. ही पॅकेजिंग आणि लेबलींग उद्योगांना लागणारी उत्पादने बनविणारी कंपनी आहे. हा शेअर आठवड्यात ३० टक्के वाढला. त्याचे कारण कंपनीचे Q१ रिझल्टस. खालील आकडे पाहा.

नेट प्रॉफिट रु. ४३.७ कोटी ७६ टक्के वाढ

रेव्हेन्यू रु. ७५० कोटी २२.५ टक्के वाढ

शेअरचा शुक्रवारचा भाव रु. ३१९ असून, तो उच्चांकावर आहे. हा शेअर रु. ५०० चा भाव लवकरच दाखवेल असे वाटते.

उत्कृष्ट Q१ निकालांमुळे वाढलेला दुसरा शेअर म्हणजे Cyient DLM! Electronic Components सेक्टरमधील ही कंपनी. या कंपनीचा रेव्हेन्यू ३४.३ टक्क्यांनी वाढून ३७४ कोटी रुपये झाला. प्रॉफिट तब्बल ११९ टक्क्यांनी वाढून रु. १६.३ कोटी झाला. हा शेअर आठवड्यात १६ टक्के वाढला तर मागील सहा महिन्यांत तो दुप्पट झाला आहे. शेअर्समध्ये DII प्रमाण तीस टक्के आहे.

आता एका अप्रतिम कंपनीबद्दल. MPS हा शेअर सप्ताहात ३२ टक्के तर एका महिन्यात ५० टक्के वाढला. Elearning आणि Publishing सेक्टरमधील ही अतिशय प्रगत, आधुनिक, कर्जमुक्त कंपनी आहे. कंपनीचा ROCE ३९ टक्के तर ROE ३१ टक्के आहे. प्रमोटर्स होल्डींग ६८.३४ टक्के आहे आणि शेअर्स Pledging शून्य आहे. नुकतेच कंपनीने २०२६-२७ चे पहिल्या तिमाहीचे निकाल सादर केले. ऑपरेटींग रेव्हेन्यू २०.४ टक्‍क्यांनी तर नेट प्रॉफिट ४३ टक्क्यांनी वाढला. कंपनीचा शुक्रवारचा भाव रु. २७८६ आहे आणि तो उच्चांकी स्थानी आहे.

शेअरचा भाव वाढण्याबरोबर त्याचा व्हॉल्यूमही वाढला तर शेअरमध्ये सकारात्मक वाढ होत आहे असा निष्कर्ष निघतो. त्या दृष्टीने मागील सप्ताहात खालील शेअर्सचे भाव आणि व्हॉल्‍यूममध्ये वाढ झाली.

1) Gandhar Oil Refinery - Rs. २८२.४६ Rise ३६%

2) Diamond Power - Rs. २९५.१५ Rise ३३%

3) Sri Lotus Developers - Rs. १८०.३९ Rise २९%

SBI Funds Management चा शेअर २१ जुलै रोजी किस्ट झाला. एकूण सबस्क्रीप्शन ४१.६६ पट झाले. इश्यू प्राईस रु. ५७४ होती. तो ६१३ रुपयांना ओपन झाला. शुक्रवारचा भाव रु. ५८७.६०.

Millworks Technologies हा IPO बाजारात २१ जुलै रोजी किस्ट झाला. एकूण सबस्क्रीप्शन १९३ पट झाले. शेअरची इश्यू प्राईस रु. ३३१ होती. तो रु. ६२८.९० ला म्हणजे जवळजवळ दुप्पट भावाने किस्ट झाला. शुक्रवारचा शेअरचा भाव आहे रु. ७६४.३०.

Caliber Mining & Logistics चा शेअर २४ जुलैला किस्ट झाला. तो १४६ पट सबस्क्राईब झाला. रु. ४२४ इश्यू प्राईस असणारा हा शेअर रु. ५००.२५ ला किस्ट झाला. शुक्रवारचा भाव रु. ५२८.२०.

येणाऱ्या सप्ताहासाठी लक्ष ठेवावे असे काही शेअर्स

1) Titan

2) Muthoot Finance

3) OFSS

4) Sai Life Sciences

5) Sandhar Oil Refineries

6) Persistent Systems

7) TD Power System

8) Karur Vysya Bank

9) Uflex

10) Schaeffler

ज्या बातम्यांच्यामुळे शेअर्सच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे किंवा अशाच सकारात्मक घटनांमुळे शेअर्स वाढतात, अशा काही सप्ताहातील घटना.

१) HCL Technologies ने ओडिशा सरकारबरोबर रु. १४२५७ कोटींचे डेटा सेंटर उभारणीचा करार केला.

२) Coforge ने एका युरोपिअन क्लायंटकडून AI Transformation ची २३० मिलीयन डॉलर्सची ऑर्डर मिळवली.

३) Citi ने Astral चे Buy रेटींग कायम ठेवले आणि टार्गेट प्राईस रु. १९०० ठेवली. सध्याचा भाव रु. १४६०.१०

४) अरविंद फार्माने A1 Biochems च्या CRO Unit चा ८० टक्के स्टेक १३.६ मिलीयन डॉलर्सना खरेदी केला.

५) गांधार ऑईल रिफायनरीजचे एम. डी. यांनी सन २०२७ मध्ये रु. ४५०० कोटींचा रेव्हेन्यू मिळण्याचा आशादाय प्रकट केला.

६) ॲक्सिसने इंडियन हॉटेल्सचे Buy रेटींग कायम ठेवून टार्गेट प्राईस रु. ८३० केली. सध्याचा भाव रु. ७२७.४५

मागील सप्ताहात काही कंपन्यांनी अशिय दमदार असे Q1 रिझल्टस सादर केले. त्यापैकी काही खालीलप्रमाणे.

१) Shriram Finance चा प्रॉफीट वार्षिक ६० टक्क्यांनी वाढला. कंपनीची Asset growth आणि Credit demand मजबूत आहे. शेअरचा भाव रु. १००६.

२) Indusind Bank चा नेट प्रॉफीट ४७ टक्क्यांनी वाढून रु. १००० कोटींच्या पुढे गेला. शेअर भाव रु. ९९७.४५

३) HFCL मागील वर्षी रु. ३२ कोटींच्या तोट्यात होती. तिने आता रु. २२९ कोटींचा प्रॉफीट दर्शवला आहे. शिवाय रेव्हेन्यू ११९ टक्क्यांनी वाढून दुप्पटीपेक्षा अधिक झाला आहे. AI Data centers कडून कंपनीला फायबर मायर्सची प्रचंड डिमांड आहे. आपल्याला आठवत असेल याच आपल्या लेखमालेतून हा शेअर आपण Recommend केला होता. AI आणि Data Centers च्या Fiber Cables ना असलेल्या प्रचंड मागणीमुळे हा शेअर रु. ५०० पर्यंत जाईल असे म्हटले होते.

शेअरचा शुक्रवारचा भाव रु. १९७.०५ आहे.

४) Tata Consumer products चा प्रॉफिट २८.४ टक्क्यांनी वाढला.

५) SBI Life Insurance चा प्रॉफिट २२ टक्क्यांनी वाढला.

६) SBI Cards चा प्रॉफिट १९.५ टक्क्यांनी वाढला.

७) Hindustan Zinc चा नेट प्रॉफिट तब्बल १४५ टक्के वाढून रु. ५००० कोटींच्या पुढे गेला.

८) OFSS (oracle Financial Services Ltd.) चा नेट प्रॉफिट १२१ टक्क्यांनी तर रेव्हेन्यू ६९ टक्क्यांनी वाढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news