Share Market Today : सेन्सेक्स वधारला; पण पुन्‍हा 'घसरणी'चे वारे

पुनर्प्राप्तीनंतर विक्रीचा सपाटा, सेन्सेक्स ४०० पेक्षा अधिक अंकांनी घसरला
Share Market opening bell
भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम राहिला आहे.(file photo)
Published on
Updated on

Share Market Today : आठवड्यात दोन दिवस सतत विक्रीनंतर आज (दि. ३) शेअर बाजारातील व्‍यवहारांना सकारात्‍मक सुरुवात झाली. सेन्सेक्स ११९ ८१,४९२ ने वाढला. निफ्टी ७० निर्देशांक २४,७८६ वर उघडला. बँक निफ्टी २०१ निर्देशांक ५६,१०४ वर उघडला. मात्र अवघ्‍या काही मिनिटांमध्‍ये विक्रेत्यांनी पुन्‍हा एकदा बाजारात वर्चस्व दाखवले. विक्रीचा सपाटा सुरु झाल्‍याने सेन्सेक्स ४०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्ये झालेल्या विक्रमी वाढीनंतर खाजगी बँकांमध्ये विक्री सुरू झाली. त्यामुळे तिथेच घसरण दिसून आली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपची सकारात्‍मक कामगिरी

आज रुपया ८५.३८ च्या तुलनेत ८५.५३ डॉलवर उघडला. प्रादेशिक निर्देशांकांमध्‍ये सुरुवातीच्‍या व्‍यवहारात सर्व क्षेत्रांमध्ये मध्यम खरेदी दिसून आली. मात्र नंतर गुंतवणुकदारांनी नफ्‍याला प्राधान्‍य दिले. निफ्टी सुमारे ७० अंकांनी घसरला आणि २४६५० च्या जवळ पोहोचला. नवीन शिखर गाठल्यानंतर, बँक निफ्टीवरही थोडासा दबाव आहे. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप पुन्हा एकदा सकारात्‍मक कामगिरी करताना दिसले. दरम्यान, ब्लॉक डीलमुळे येस बँक ८ टक्क्यांनी घसरली आणि फ्युचर्समध्ये टॉप लॉसर बनली. दुसरीकडे, १३.४४% शेअरच्या ब्लॉकनंतर APTUS VALUE सुमारे ८ टक्क्यांनी घसरला आहे. यासोबतच, OLA इलेक्ट्रिकमध्येही ब्लॉक डील झाली आणि शेअर ६ टक्क्यांनी खाली आला आहे. येथे संरक्षण क्षेत्रातील शेअर्सची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. डिफेन्स इंडेक्स सुमारे दीड टक्क्यांनी मजबूत झा. भारत डायनॅमिक्स आणि माझगाव डॉक फ्युचर्समध्ये टॉप गेनर्स बनले. कोचीन शिपयार्ड आणि गार्डन रीचमध्येही ४ टक्क्यांनी वाढ झाली.

Share Market opening bell
Operation Sindoor: पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला; भारतीय स्ट्राईकमुळे कराची बाजार रक्तबंबाळ

आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम

आंतरराष्ट्रीय पातळीवर टॅरिफवरून अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा वाढला आहे. चीनने अमेरिकेवर पूर्व टॅरिफ कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेवर नवीन टॅरिफ लादले आहेत. या तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ८० डॉलरने वाढून ३४०० डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर चांदी ५ टक्क्यांनी वाढून ३५ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत २,१०० रुपयांनी प्रति १० ग्रॅमवर ​​वाढून ९८,००० रुपयांवर पोहोचली, तर चांदी ४,००० रुपयांच्या वाढीसह १ लाख रुपयांवर बंद झाली. कच्च्या तेलाची किंमत २ टक्क्यांनी वाढली आणि त्याची किंमत प्रति बॅरल ६५ डॉलरवर पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news