पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान शेअर बाजारात आज बुधवारी (दि. १६) सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स (Sensex) ३१८ अंकांनी घसरून ८१, ५०१ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ८६ अंकांच्या घसरणीसह २४,९७१ वर स्थिरावला.
सेन्सेक्स ३१८ अंकांनी घसरून ८१, ५०१ वर बंद.
निफ्टी २५ हजारांच्या खाली घसरला.
क्षेत्रीय निर्देशांकांत आयटी आणि ऑटो टॉप लूजर्स
सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स २.८ टक्के घसरला.
मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. आजही बाजारात (Stock Market Today) अस्थिरता राहिली. आज आयटी आणि ऑटो शेअर्समधील घसरणीचा बाजाराला फटका बसला. निफ्टी आयटी आणि निफ्टी ऑटो प्रत्येकी १ टक्के घसरले. निफ्टी आयटीवर इन्फोसिस, कोफोर्ज आणि LTIMindtree आदी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. फायनान्सियल, बँकिंग आणि रियल्टी निर्देशांक वगळता आज सर्व क्षेत्रात घसरण झाली.
सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स २.८ टक्के, इन्फोसिस २ टक्के, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, टायटन, कोटक बँक, आयटीसी, इंडसइंड बँक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले. तर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, रिलायन्स, एशियन पेंट्स हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.
निफ्टीवर ट्रेंट, एम अँड एम, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर एचडीएफसी लाईफ, डॉ. रेड्डी, ग्रासीम, एचडीएफसी बँक हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले.