Stock Market | सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला, 'या' हेवीवेट शेअर्समध्ये विक्री

Nifty २६ हजारांच्या खाली घसरला
Stock Market Updates Sensex Nifty
आज सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

संमिश्र संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात (Stock Market) आज सोमवारी (दि.३०) घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ७०० अंकांनी घसरून ८४,९०० च्या खाली आला. तर निफ्टी (Nifty) सुमारे २०० अंकांच्या घसरणीसह २५,९८० वर व्यवहार करत आहे. मुख्यतः रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि आयसीआयसीआय या हेवीवेट शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, रिलायन्स (Reliance Industries), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एम अँड एम, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एसबीआय, पॉवर ग्रिड हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. त्याचबरोबर नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि टीसीएस हे शेअर्सही घसरले आहेत. तर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, टायटन या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही लाल रंगात व्यवहार करत आहेत.

मेटल शेअर्स तेजीत

दरम्यान, मेटल शेअर्स तेजीत व्यवहार करत आहे. निफ्टी मेटल निर्देशांक १ टक्के वाढला आहे. तर निफ्टी बँक, ऑटो, फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी, मीडिया, रियल्टी, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस निर्देशांक घसरले आहेत.

गुंतवणूकदारांची सावध भूमिका

गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल आणि गव्हर्नर मिशेल बोमन यांच्या भूमिकेकडे लागले आहे. ते आज आणखी व्याजदर कपातीबाबत संकेत देण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांची आज सावध भूमिका दिसून येत आहे.

Stock Market Updates Sensex Nifty
लाखाचा टप्पा गाठण्यास सोनेही आतूर!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news