सेन्सेक्स- निफ्टी 'रेड झोन'मध्ये बंद, पण टाटा कंपनीच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

Stock Market | शेअर बाजारात आज नेमकं काय घडलं?
Stock Market, BSE benchmark Sensex, NSE Nifty
सेन्सेक्स, निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. झाले.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीकडे राहिलेला कल, कमकुवत दुसऱ्या तिमाहीतील कमाईचे अंदाज तसेच वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि.११) दिवसभर भारतीय शेअर बाजारात (Stock Market) चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) २३० अंकांनी घसरून ८१,३८१ बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,९६४ वर स्थिरावला. विशेषत: आज बँकिंग, ऑटो शेअर्समध्ये घसरण झाली.

Sensex Today : कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्सवर टीसीएस, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, मारुती, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वधारून बंद झाले.

BSE Sensex
सेन्सेक्सवरील शेअर्सची आजची स्थिती.(BSE)
NSE Nifty
निफ्टी आज ३४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,९६४ वर स्थिरावला.(NSE)

'या' शेअर्समध्ये विक्री

आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स शेअर्समध्ये विक्री दिसून आली. यामुळे बँकिंग आणि फायनान्सियल निर्देशांक घसरले. निफ्टी बँक ०.७ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.६ टक्के घसरला. दरम्यान, पर्सिस्टंट सिस्टीम्स, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी आयटी ०.६ टक्के वाढला.

मेटल्स शेअर्समध्ये चौफेर खरेदी

मेटल्स शेअर्समध्ये ३ दिवसांच्या घसरणीनंतर आज चौफेर खरेदी दिसून आली. यामुळे निफ्टी मेटल निर्देशांक जवळपास १ टक्के वाढून बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.४ टक्के वाढला.

Trent कंपनीचे शेअर्स वधारले, जाणून घ्या कारण

टाटा समूहातील ट्रेट कंपनीचा शेअर्स (Trent Share Price) आज बीएसईवर ३ टक्क्यांनी वाढून ८,३०९ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स २.५ टक्के वाढीसह स्थिरावला. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा (Noel Tata) यांची नियुक्ती झाली आहे. ख्यातनाम उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाची धुरा नोएल टाटा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. तर नोएल टाटा हे ट्रेंटचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रेंटचे शेअर्स आज वधारले.

जागतिक बाजार

अमेरिकेतील अपेक्षेपेक्षा जास्त महागाईमुळे काल गुरुवारी येथील निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद झाले होते. याचे पडसाद आज भारतीय बाजारात दिसून आले.

Stock Market, BSE benchmark Sensex, NSE Nifty
म्युच्युअल फंडधारक आहात?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news