सलग दुसऱ्या दिवशी बाजारात रिकव्हरी, सेन्सेक्स २२४ अंकांनी वाढून बंद, निफ्टी सपाट

Stock Market | कोणते शेअर्स राहिले तेजीत?
Stock Market, Sensex, Nifty
आज सेन्सेक्स २२४ अंकांनी वाढून ७६,७२४ वर बंद झाला. (file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) बुधवारी (दि.१५) सलग दुसऱ्या दिवशी रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) आज २२४ अंकांनी वाढून ७६,७२४ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,२१३ वर स्थिरावला. आज रियल्टी शेअर्समध्ये अधिक तेजी राहिली. तर फार्मा, ऑटो आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये विक्रीचा माहौल राहिला. कमाईच्या वाढीच्या मंदीच्या चिंतेमुळे बाजारातील एकूण वाढीवर मर्यादा राहिली.

भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. ऑटो, बँकिंग आणि फार्मा शेअर्सच्या कमकुवत कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने दुपारच्या व्यवहारात तेजी गमावली आणि त्यांनी सपाट पातळीवर व्यवहार केला. पण त्यानंतर सेन्सेक्स वधारून बंद झाला.

रियल्टी निर्देशांकची अव्वल कामगिरी

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी रियल्टी निर्देशांकची अव्वल कामगिरी राहिली. रियल्टीने १.४ टक्के वाढ नोंदवली. तर निफ्टी ऑटो निर्देशांक ०.५ टक्के घसरला. निफ्टी ऑटोवर महिंद्रा आणि महिंद्राचा शेअर्स सुमारे ३ टक्के खाली आला. बीएसई मिडकॅप ०.१ टक्के आणि स्मॉलकॅप ०.३ टक्के वाढला.

Zomato Share Price | झोमॅटो तेजीत

सेन्सेक्सवर झोमॅटो शेअर्स ४.३ टक्के वाढला. एनटीपीसी, पॉवर ग्रिड हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्के वाढून टॉप गेनर्स ठरले. त्याचबरोबर कोटक बँक, टेक महिंद्रा, मारुती, रिलायन्स, एलटी हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले. तर दुसरीकडे एम अँड एम, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ ते २.७ टक्क्यांपर्यंत घसरले.

Reliance Share Price | रिलायन्सचा शेअर्स १ टक्के वाढला

हेवीवेट रिलायन्सचा शेअर्स आज १.१ टक्के वाढला. अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स २.८ टक्के वाढला. गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर आयटी शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली.

Stock Market, Sensex, Nifty
सेक्शन ‘87 अ’ : मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर दिलासा देणारी तरतूद, जाणून घ्या सविस्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news