शेअर बाजार घसरणीसह बंद, पण Mid-SmallCap शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Closing | कोणते शेअर्स राहिले तेजीत?
Stock Market Closing
भारतीय शेअर बाजारात दबाव कायम राहिला आहे. (AI-generated)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्यांचा आणि त्यांच्या संभाव्य महागाई वाढीचा तसेच मंदावलेल्या कार्पोरेट कमाईचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारांतील घसरणीचा मागोवा घेत आज गुरुवारी (दि.२०) भारतीय शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम राहिले. सेन्सेक्स २०३ अंकांनी घसरून ७५,७३५ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,९१३ वर स्थिरावला.

मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्सची दमदार कामगिरी

क्षेत्रीय पातळीवर ऑटो, मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर, रियल्टी, पीएसयू बँक, १ ते २ टक्के वाढले. तर बँक निर्देशांक ०.५ टक्के घसरला. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची कामगिरी चांगली राहिली. बीएसई मिडकॅप (BSE MidCap) १.१ टक्के आणि स्मॉलकॅप १.३ टक्के वाढून बंद झाला.

BSE Market Cap | बाजार भांडवलात वाढ

दरम्यान, आज २० फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३ लाख कोटींनी वाढून ४०४.८७ लाख कोटींवर पोहोचले. १० फेब्रुवारी रोजी ते ४०१.७८ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची वाढ झाली.

कोणते शेअर्स घसरले, कोणते तेजीत?

सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, मारुती, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, आयटीसी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर एनटीपीसी, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, पॉ‍वर ग्रिड हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले.

निफ्टी ५० वर श्रीराम फायनान्सचा शेअर्स ४ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर एनटीपीसी, एम अँड एम, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टाटा कन्झ्यूमरचा शेअर्स १.६ टक्के घसरला.

बेंचमार्क निर्देशांक विक्रमी उच्चांकावरून १३ टक्क्यांनी घसरले

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण कायम आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत भारतातील बेंचमार्क निर्देशांक सुमारे ३ टक्के घसरले आहेत. तर सप्टेंबरच्या अखेरच्या त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास १३ टक्क्यांनी खाली आले आहेत. तर मिडकॅप त्यांच्या उच्चांकावरून १७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक २१ टक्क्यांनी मागे पडले आहेत.

Stock Market Closing
'Tesla'च्या EV कारची भारतात एप्रिलपासून विक्री, जाणून घ्या किती असेल किंमत?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news