Stock Market | शेअर बाजार हिरव्या रंगात, पण अदानी शेअर्समध्ये घसरण कायम

जाणून घ्या आजचे मार्केट
stock Market Updates
सेन्सेक्स आज हिरव्या रंगात खुले झाले.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कालच्या घसरणीतून सावरत भारतीय शेअर बाजाराने (Stock Market Updates) शुक्रवारी (दि.२२) तेजीत सुरुवात केली. दोन्ही निर्देशांक मागील सत्रात पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर घसरले होते. पण जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान आज शुक्रवारी ते उच्च पातळीवर खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सेन्सेक्स ८०० हून अधिक अंकांनी वाढून ७७,९८० वर पोहोचला. तर निफ्टी २४२ हून अधिक अंकांनी वाढून २३,५९० वर गेला. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी १ टक्के वाढले आहेत. बीएसई मिडकॅप ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप ०.५ टक्के वाढला. दरम्यान, आजही अदानी समुहातील (Adani stocks) शेअर्समध्ये घसरण कायम राहिली आहे.

'या' शेअर्समधील तेजीचा बाजाराला आधार

अदानी समुहाच्या शेअर्समधील (Adani Stocks) मोठ्या घसरणीचा फटका काल गुरुवारी भारतीय शेअर बाजाराला बसला होता. पण आज बँकिंग आणि रिलायन्स सारख्या हेवीवेट शेअर्समधील तेजीमुळे बाजारातील वाढीला सर्पोट मिळाला.

अदानी समुहातील शेअर्सवर दबाव कायम

अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी दबाव कायम राहिला. एनएसईवर अदानी ग्रीन एनर्जीचा (Adani Green Energy share price) शेअर्स सर्वाधिक ११ टक्के घसरून १,०२१ रुपयांपर्यंत खाली आला. अदानी सोल्यूशन्स, अदानी एंटरप्रायजेस (Adani Enterprises shares), अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर हे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांच्या घसरणीसह खुले झाले.

अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टाने अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप केल्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, अदानी समुहाने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. दरम्यान, केनिया सरकारने गुरुवारी अदानी समुहासोबतचा विमानतळ आणि ऊर्जा करार रद्द केला. यामुळे अदानी समुहासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

Sensex Today : कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस, रिलायन्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ३ टक्के घसरणीसह टॉप लूजर ठरला.

stock Market Updates
अदानी समुहाला केनिया सरकारचा झटका! पॉवर ट्रान्समिशन करार केला रद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news