

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता कमी तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सततची विक्री आणि कच्च्या तेलाचे वाढत्या दराचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारात (Stock Market) दिसून आला. (Why stock market down today) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ७६,६५० पर्यंत खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० अंकांनी घसरून २३,२२६ वर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर झोमॅटाचा शेअर्स सुमारे ३ टक्के घसरला. त्याचबरोबर एम अँड एम, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, कोटक बँक, बजाज फायनान्स, एशिया पेंट्स, आयसीआयसीआय बँक हे शेअर्सही घसरले. तर इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, टीसीएस हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी १.६ टक्के घसरले आहेत.