निफ्टी 25000 च्या जवळ, तेजीची सुनिश्चितता...?

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय
Sensex and Nifty
निफ्टी 25000 च्या जवळ, तेजीची सुनिश्चितता...?Pudhari File Photo
Published on
Updated on

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. विकास दर (GDP Growth) मंदावल्याचा हा परिणाम ! मागील दोन वर्षातील सर्वात कमी GDP वाढ असलेला जून-सप्टेंबर हा तिमाहीचा काळ! जोडीला तीव्र महागाई आणि रुपयाचाही विक्रमी निच्चांक! आरबीआयने व्याज दर तर कमी केलेच नाहीत. शिवाय चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यावरून 6.6 टक्क्यांपर्यंत कमी केला आणि महागाई दराचा अंदाजही 4.5 वरून 4.8 टक्के वाढवला.

बाजारावर याचा नकारात्मक परिणाम होऊन शिवाय नफा वसुली होऊन बाजारात अखेरच्या दिवशी विक्रीचा मारा होईल, असे वाटले होते. परंतु तसे काही घडले नाही. बाजाराची उर्ध्व दिशा त्यामुळे अधोरेखित झाली. सव्वा तीन टक्क्यांनी सप्ताहात वाढलेला निफ्टी 50 येत्या सप्ताहात 25000 चा स्तर लीलया पार करेल, अशी आशा करावयास हरकत नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी बँकही तीन टक्क्यांनी वाढून तेजीच्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडायसेस अनुक्रमे सव्वा पाच आणि सव्वा चार वाढले आहेत. सर्वच्या सर्व सेक्ट्ररल इंडायसेस जेव्हा तेजीत असतात तेव्हा ही तेजी सर्वंकष आणि आश्वासक असल्याचा विश्वास येतो. मीडिया, मेटल, रिअ‍ॅल्टी, ह्या सेक्टर्सनी आठवड्यात बहारदार कामगिरी केली. सरकारी बँकांची घोडदौड मागील आठवड्यातही अखंडित राहिली सशक्त होत Zeel (CMP Rs. 143.59,) Vedl (Rs. 501.40), Jindal Stainless (Rs. 741.60), Lodha (Rs. 1371.30) हे शेअर्स तेजी दाखवत आहेत. आयटी निर्देशांकांतील सर्वच शेअर्स कमी-अधिक प्रमाणात वाढत आहेत. सरकारी बँकांचा रथ आस्ते कदम प्रगतिपथावर आहे. सर्वच सरकारी बँका सप्ताहात वाढल्या असल्या तरी युको बँक साडेबारा टक्क्यांनी वाढून आघाडीवर आहे.

अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावलेला असला आणि महागाई दर वाढलेला असला तरी नोव्हेंबर महिन्यातील GST Collection चा आकडा मागील वर्षाच्या याच महिन्यापेक्षा साडेआठ टक्क्यांनी वाढून 1.82 लाख कोटींवर गेला. GST Collection मुळे सरकारी तिजोरीत भर पडून अंतिमतः अर्थव्यवस्थेचे चक्र वेगाने फिरत राहते. आणखी एक महत्त्वाची सकारात्मक बातमी म्हणजे सन 2025 च्या पहिल्या सहामाही मध्ये FDI (Foreign Direct Investment) YOY धर्तीवर पंचेचाळीस टक्क्यांनी वाढून 29.79 बिलीयन डॉलर्स झाली. केबल इंडस्ट्रीमधील एक मायक्रोकॅप कंपनी Delton Cables च्या शेअरने 6 डिसेंबर रोजी 52 Week High चा उच्चांक गाठला. (CMP Rs. 1140 ) मागील एका वर्षात ह्या शेअरने 337 टक्के रिटर्नस् दिले आहेत. सध्या हा शेअर 5 - day, 20 - day, 50 - day, 100 - day आणि 200 - day च्या Mooving Averages च्या वरती ट्रेंड करतो आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी त्यांच्या वाढीची गती अशीच अबाधित राहील. सन 2024-25 च्या दुसर्‍या तिमाहीत देशात 1 कोटी 18 लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली. ह्याचा सर्वाधिक फायदा (DSL) ला होता. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. कारण सप्टेंबर अखेर 13.5 कोटी, रजिस्टर्ड डिमॅट अकांऊटस् असणारी ती भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. शिवाय कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल अत्यंत दमदार आहेत. नेट प्रॉफीटमध्ये 49 टक्के तर उत्पन्नात 55 टक्के वाढ दर्शवणार्‍या CDSL चा शेअर सध्या All Time High च्या पातळीवर आहे. (CMP Rs. 1879.25) FIIS आणि DIIS आपली गुंतवणूक वाढवत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर येत्या सप्ताहातच हा शेअर रु. 2000 ची पातळी ओलांडेल असे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news