

PIB FACT Check on RBI Sold 12 Billion Dollar Gold Claim
मध्य पूर्व आशियामधील अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष काही केल्या थांबन्याचं नाव घेत नाहीये. याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने या संघर्षाच्या काळात परदेशी चलन मजबूत करण्यासाठी तसेच रूपयावरील दबाव कमी करण्यासाठी आपल्या राखीव कोट्यातील सोने विकल्याचा दावा केला होता. या वृत्तावर अखेर PIB ने स्पष्टीकरण दिले आहे. RBI ने सोने विकलेले नाही, असं PIB ने स्पष्ट केले आहे.
वृत्तात काय दावा केला होता?
ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या एका रिपोर्टनुसार २२ मे ला दोन आठवड्याच्या समाप्तीनंतर आरबीआयने जवळपास १२ डॉलर म्हणजे १.१४ लाख कोटी रूपयाचे सोने विकले. रिपोर्टमध्ये दावा केला होता की या काळात रिझर्व्ह बँकेने जवळपास ७.५ अब्ज डॉलर म्हणजेच ७१३.२३ अब्ज रूपये परदेशी चलन जमा केलं.
भारत हा जगातील तिसरा सर्वात जास्त कच्च तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळं पश्चिम आशियात वाढलेला संघर्ष थेट भारतातील तेलाच्या किंमतीवर प्रभाव पाडतो. त्यामुळं भारतावर अतिरिक्त आर्थिक दबाव पडतो. कच्च तेल आयात करण्यासाठी अधिक परदेशी चलन वापरावं लागतं. यामुळं परदेशी चलन साठा आणि रूपया या दोन्हीवर प्रभाव पडतो.
ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचे ज्येष्ठ अर्थतज्ञ अभिषेक गुप्ता यांनी दावा केला होता की, मिळालेल्या आकड्यावरून आरबीआयचे रिझर्व्ह गोल्ड मूल्य कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सोन्याच्या आयातीवरील शुल्क वाढल्यानंतर याच्या किंमती वाढायला हव्या होत्या. यावरूनच रिझर्व बँकेने सोने विक्री केली असल्याची शक्यता आहे.
PIB ने काय स्पष्टीकरण दिले?
PIB Fact Check या X अकाऊंटवरून या वृत्ताचं फॅक्ट चेक करण्यात आले आहे. हा दावा खोटे आणि निराधार असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले.