डॉ. वसंत पटवर्धन
गेल्या आठवड्यात बाजाराला दोन सुट्ट्या होत्या. 17 तारखेला महावीर जयंती व 19 तारखेला गुडफ्रायडे आणि हनुमान जयंती. या सुट्ट्यांमुळे बाजार फक्त तीन दिवस चालू राहिला. गुरुवारी 18 तारखेला निफ्टी व निर्देशांक अनुक्रमे 11752 व 39140 वर बंद झाले. येस बँक 256 रुपये, बजाज फिनसर्व्ह 7571 रुपये, हिंद पेट्रोलियम 267 रुपये, इंडियन ऑईल 156 रुपये, भारत पेट्रोलियम 363 रुपये, मुथुट फायनान्स 616 रुपये, स्टरलाईट टेक्नॉलॉजी 197 रुपये, हेग 2017 रुपये, दिवाण हौसिंग फायनान्स 157 रुपये, ओ एन जी सी 161 रुपये, जिंदाल स्टेनलेस हिस्सार 88 रुपये, मन्नापूरम फायनान्स 124 रुपये, बजाज फायनान्स 3014 रुपये, फिलीप्स कार्बन 167 रुपये, अशोक बिल्डकॉन 132 रुपये असे भाव होते.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने रिअल टाईम ठशरश्र ींळाश तत्त्वावर पेट्रोल खरेदी करण्यासाठी ट्रेडिंग डेस्क उघडले आहे. त्यामुळे तिला किमान योग्य भावात पेट्रोल आयात करता येईल. आपल्या एकूण खरेदीच्या 30 टक्के म्हणजे 1॥ कोटी टन किमान भावाने खरेदी करू शकते. पूर्वी 2017 मध्ये सिंगापूरमधून ती अशी खरेदी करायची.
ग्राफाईट इंडिया रोज खालीच जात आहे आणि आता तो 451 रुपयांपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षभरातील कमाल भाव 1127 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर फक्त 2.61 पट दिसते. रोज 10 लक्ष शेअर्सच्या वर व्यवहार होतो. जोखीम घेऊ इच्छिणार्या जिगरबाज निदेशकांनी काही प्रमाणात त्यात खरेदी करावी. स्टरलाईट टेक्नॉलॉजीने मार्च 2019 तिमाही व वर्षाचे आकडे जाहीर करण्यासाठी 23 एप्रिलला संचालकांची सभा बोलावली आहे. हेगही सध्या 3.02 पट गुणोत्तराला म्हणजेच 2018 रुपयाला उपलब्ध आहे.
महिंद्र अँड महिंद्र फिनान्शिअल 418 रुपयाला मिळत आहे. पिरामल एन्टरप्राइझेसचा भाव सध्या 2650 रुपये आहे. 2018-2019 वर्षाचे विक्री व नफ्याचे तिचे आकडे 26 एप्रिलला जाहीर होतील. त्याच दिवशी या वर्षासाठी लाभांशही जाहीर होईल. अशोका बिल्डकॉच्या एका संयुक्त प्रकल्पाला 423 कोटी रुपयांचे एक कंत्राट मिळाले आहे. हे काम 36 महिन्यात पुरे करायचे आहे.
जिंदाल स्टील (गडथ डींशशश्र) आपल्या विजयानगरच्या कारखान्याची उत्पादनक्षमता 18 हजार कोटी रुपये गुंतवून 1.8 कोटी मेट्रिक टन वर्षाला करणार आहे. सध्या हा शेअर 300 रुपयाला उपलब्ध आहे. रोज 70 ते 75 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. गेल्या वर्षभरातील त्याचा कमाल भाव 427 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर 7.95 पट दिसते. कंपनीने नुकतीच 56 कोटी डॉलर्सचे ऑफ शेअर कर्जरोखे विक्रीला काढले होते.
बजाज फायनान्स पुढील दोन आठवड्यात आपले मार्च 2019 चे आकडे जाहीर करील. अॅक्सिस बँक 2018 जुलैमध्ये किमान 482 रुपयांच्या भावाला पोचला होता तो आता 779 रुपयांपर्यंत गेला आहे.
व्होल्टँप ट्रान्स्फॉर्मर्स 1148 रुपयांपर्यंत वर चढला आहे. तो अजूनही 15 टक्के वर जाऊ शकतो. छचऊउ आपली उत्पादनक्षमता कशी वर्धिष्णू आहे याबद्दल सिंगापूरला एक बैठक घेणार असून पोलाद कंपन्यांनी आपली लोहमाती (खठजछ जठए) घेण्याबद्दल आवाहन करणार आहे. सध्या तिचे उत्खनन 5.3 कोटी टन वर्षाला आहे. पुढील तीन वर्षात म्हणजे मार्च 2022 पर्यंत ती क्षमता 8 कोटी टनापर्यंत नेण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी ती 2,218 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या वर्षात नगरनार इथे ती आपला कारखाना सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू करेल. त्यामुळे कंपनीची विक्री 1.7 अब्ज डॉलर्सने वाढेल. बैलदिला क्षेत्रातून विशाखानगर बंदरात ती आपल्या मालाची वाहतूक करेल. दीर्घ मुदतीसाठी हा शेअर घेण्यासारखा आहे.
डी सी बी बँकेचे 2018-2019 पूर्ण वर्षाचे आकडे जाहीर झाले आहेत. तिचे एकूण उत्पन्न 3391.65 कोटी रुपये आहे. करोत्तर नफा 325.37 कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन 10.33 रुपये आहे. बँकेचे भाग भांडवल 309.55 कोटी रुपये आहे. मार्च 2018 ला संपलेल्या वर्षासाठी तिचे एकूण उत्पन्न 2723 कोटी रुपये होते. मार्च 2018 वर्षासाठी नक्त नफा 245.54 कोटी रुपये होता.
एप्रिल संपता संपता जास्त कंपन्यांचे पूर्ण वर्षाचे आकडे उपलब्ध असतील. ते बघूनच यापुढे कुठे गुंतवणूक करायची ते ठरवावे लागेल. औद्योगिक कंपन्यांचे आकडे जरी उत्तम येणार असले तरी, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर होईपर्यंत गुंतवणुकीत सावधानता हवी. सर्वसाधारणपणे नरेंद्र मोदी आणि भाजप हेच सत्तारूढ व्हावेत असे जरी असले तरी हलवून खुंटा बळकट होईपर्यंत सतर्क राहणे आवश्यक ठरेल. उत्तरेकडील एका ज्योतिषाच्या सांगण्यानुसार भाजपला किमान 280 जागा मिळाव्यात. शिवसेना व अन्य मित्रपक्षांचा आकडा धरून हा आकडा 310 पर्यंत जावा. त्यांचा राजयोग अजूनही जबरदस्त आहे. त्यामुळे निर्देशांक व निफ्टीत उत्तरोत्तर वाढच होत जाईल. निवडणुकीचे निकाल काहीही असले तरी वित्तीय कंपन्या, धातू कंपन्या, संगणन कंपन्या यांचे भाव सुधारतच जातील. वर्षभरात डोळस गुंतवणूक जर केली तर वर्षाला 25 टक्के नफा सुटायला हरकत नाही.
या लेखमालेतून वेळोवेळी शेअरबाजाराचा परामर्श घेतला जाईलच.