

प्रदीर्घ काळ घसरण अनुभवल्यानंतर गेल्या आठवड्यात बाजाराने (Stock Market) सलग पाच दिवस तेजीचा अनुभव घेतला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. निफ्टी आणि सेन्सेक्स साडेतीन टक्क्यांहून अधिक, तर निफ्टी बँक तब्बल सव्वापाच टक्क्यांनी वाढले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप स्टॉक्स् लार्जकॅप स्टॉकस्पेक्षा गुंतवणूकदारांचे आकर्षण अधिक बनले.
झाडून सगळे सेक्टरल इंडायसेस तेजीत न्हाऊन निघाले. रिअॅल्टी, मीडिया आणि सरकारी कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. हे इंडायसेस 7 ते 8 टक्क्यांनी वाढले. सर्वात कमी वाढ आयटी इंडेक्सने नोंदवली. पाऊण टक्क्याने डॉलर कोसळला, त्याचा हा परिणाम असावा.