Share Market | तेजीसाठी ट्रीगरची प्रतीक्षा, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी 'या' शेअर्सवर लक्ष ठेवा

उत्तम शेअर्स निवडण्यासाठी अनेक निकष, जाणून घ्या सविस्तर
market-awaits-trigger-for-rally
तेजीसाठी बाजाराला ट्रीगरची प्रतीक्षाPudhari File Photo
Published on
Updated on
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

ट्रीगर्सच्या अभावामुळे Range bound मार्केट राहील, असे मागील लेखात म्हटले होते. मागील सप्ताहातील निफ्टीचा Low होता 24462 आणि High होता 25062. म्हणजे केवळ 600 पॉईंटस्च्या रेंजमध्ये बाजार पूर्ण आठवडा फिरत राहिला. निफ्टी आणि सेन्सेक्स अर्धा ते पाऊण टक्के घसरले, तर बँक निफ्टी पूर्णपणे फ्लॅट राहिला. निफ्टीचे 24800 च्या वर क्लोजिंग (24853.15) बँक निफ्टीचे 55000 च्या वर क्लोजिंग (55398.25) आणि सेन्सेक्सचे 81000 च्या वर क्लोजिंग (81721.08) ह्या बाबी तेजीचा झेंडा अजूनही मिरवत आहेत.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी येईल, असे मागील लेखात म्हटले होते. प्रत्यक्षात Nifty mid cap 100 Index मध्ये पाव टक्का तेजी आली, तर Nifty small cap 100 Index मध्ये तब्बल अडीच टक्के तेजी आली.

TBO Tek ही एक ट्रॅव्हल डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म कंपनी आहे. इंटरनॅशनल टूरिझम, बुकिंग्ज, हॉटेल बुकिंग्ज ह्यांमध्ये ती कार्यरत आहे. अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ती आपल्या व्यवसायात करते. मागील एका महिन्यात हा शेअर जवळपास 25 टक्के वाढला आहे. नुकतेच कंपनीने 2024-25 चे निकाल जाहीर केले. रेव्हेन्यूमध्ये 21 टक्के, तर प्रॉफिटमध्ये 27 टक्के वाढ आहे. कंपनीजवळ रु. 1450 कोटी रोकड रक्कम आहे. अशा Cash Rich कंपन्यांच्या शोधात गुंतवणूकदारांनी नेहमी असावे. कंपनी ज्या गतीने आणि ज्या प्रकारे आपला व्यवसाय विस्तार करत आहे, तो अचंबित करणारा आहे. शुक्रवारी हा शेअर दहा टक्क्यांहून अधिक वाढला (रु. 1321) कंपनीचा ROCE 26.4 टक्के, तर ROE 25.2 टक्के आहे. प्रॉफिट ग्रोथ 24.8 टक्के आहे. कंपनीने शेअर होल्डिंग पाहिले तर DII 32 टक्के आणि ऊखख कॉन्ट्रिब्युशन 18 टक्के आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रत्येकाने हा शेअर घेऊन ठेवण्याचा विचार करावा.

Emcure Pharma ही अलीकडेच लिस्ट झालेली फार्मा कंपनी. कंपनीची बॅलन्स शीट आणि साल. दर सालचे आर्थिक निकाल अतिशय उत्कृष्ट आहेत. मागील आठवड्यात तिने आपले निकाल सादर केले, ज्यामध्ये 67 टक्के प्रॉफिट ग्रोथ दिसून आली. आठवड्यात हा शेअर 20 टक्क्यांहून अधिक वाढला. शुक्रवारचा त्याचा बंदभाव 1284.40 असून अल्पावधीतच तो 1500 आणि त्यानंतर 2000 ला पोहोचेल. गुंतवणूकदारांनी त्याचा अधिक अभ्यास करावा.

Reliance Power आणि Tata Tele-services ह्या शेअर्सच्या व्हॅल्यूममध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून आली. रिलायन्स पॉवरने गेल्या दहा दिवसांमध्ये 36 टक्के वाढ दर्शवली आहे. तोट्यातून कंपनीचे नफ्यात येणे, ग्रीन एनर्जीकडे वाटचाल आणि भूतान सरकारची Investment arm असलेली Druk Holding and Investments Ltd ह्या कंपनीशी करार ह्या गोष्टी रिलायन्स पॉवरच्या तेजीमागे आहेत. (CMP Rs. 5194)

टाटा टेली सर्व्हिसेसचा शेअर सप्ताहात 25 टक्के वाढला. (रु. 76.20) टाटा सन्सने टाटा टेली सर्व्हिसेसच्या विस्तारासाठी भांडवल पुरवण्याचे ठरविल्यामुळे शेअरमध्ये तेजी आली.

आपल्याला जेव्हा मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी बाजारात गुंतवणूक करायची असते Stock Selection तेव्हा कसे करावे, असा प्रश्न पडतो. उत्तम शेअर्स निवडण्यासाठी अनेक निकष आहेत. शिवाय, आजच्या प्रगत अशा इंटरनेट माध्यमांवर माहितीचा चौफेर माराही होत असतो. परंतु, रेडिमेड माहिती घेऊन आपण बाजारतज्ज्ञ बनू शकत नाही. लार्ज कॅप शेअर्सचे विश्व पहिल्या 100 शेअर्सपर्यंत मर्यादित आहे. विशेषतः Nifty Next 50 हा एक उत्तम निर्देशांक आहे. परंतु, मिड कॅप शेअर्सचा आवाका लार्ज कॅपपेक्षा थोडा मोठा आहे आणि स्मॉल कॅप शेअर्सचा तरी विस्तृत आहे. शिवाय, मायक्रो कॅप शेअर्सची आवाका कहाणी वेगळीच! अशावेळी चांगले मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स कसे निवडायचे?

ह्यासाठी BSE वर दोन उत्कृष्ट निर्देशांक आहेत. BSE Mid Cap Select आणि BSE Small Cap Select.

BSE Mid Cap Select इंडेक्समध्ये टॉप 30 मिड कॅप कंपन्यांचा समावेश आहे. क्लीन बॅलन्सशीट आणि लिक्विड फंडस् मार्केट लीडर्स अशा कंपन्यांचा इंडेक्समध्ये समावेश होतो. BSE Small Cap Select इंडेक्समध्ये 60 कंपन्या समाविष्ट आहेत. त्यांची निवडदेखील वरील धर्तीवरच केली जाते. ह्या दोन्ही इंडेक्समधील कंपन्यांचे शेअर्स इतर शेअर्सच्या तुलनेत कमी Volatile आणि अधिक Safe समजले जातात.

APL Apollo Tubes, Ashok Leyland, AU Small Finance Bank, Aurobindo Pharma, Bhel, Bharat Forge, CG Power ह्या मिड कॅप सिलेक्ट इंडेक्समधील काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत. तर Amara Raja, Angel One, Apar Industries, Cochin Shipyard, IEX, KEC ह्या स्मॉल कॅप सिलेक्ट इंडेक्समधील काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत.

BSE चा शेअर मागील सप्ताहात 65 टक्के खाली आला. कारण होते बोनस शेअर्स बीएसईन आपल्या भागधारकांना 2ः1 ह्या प्रमाणात बोनर्स शेअर्स इश्यू केले आहेत. बोनस शेअर्सपूर्वी BSE च्या एका शेअरची किंमत रु. 6996 होती. ती बोनसनंतर रु. 2332 वर अ‍ॅडजस्ट झाली. सोमवार, 26 मे रोजी हे शेअर्स भागधारकांना Alot होतील.

येत्या सप्ताहासाठी ट्रेडर्ससाठी, काही शेअर्स उत्कृष्ट संधी दाखवत आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे :

Emcure Pharma - Rs. 1284.40

Clean - Rs. 1433.20

BSE - Rs. 2448

Heg - Rs. 495.30

MCX - Rs. 6492.50

Refex Industries - Rs. 405.35

Newgen Software - Rs. 1260.95

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news