Income Tax Return Penalty | सावधान! ITR फाइल करताना ही चूक झाली तर जाल थेट तुरुंगात, 200 टक्के दंडही लागू शकतो

Income Tax Return Penalty | आपण जर इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरत असाल, तर यंदा अधिकच सावध राहण्याची गरज आहे.
Income Tax Return Penalty |
Income Tax Return PenaltyAI Image
Published on
Updated on

Income Tax Return Penalty

आपण जर इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरत असाल, तर यंदा अधिकच सावध राहण्याची गरज आहे. कारण, आयकर विभागाने नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. ITR फाईल करताना जर आपण उत्पन्न लपवले, चुकीच्या पद्धतीने कर सवलतीचा दावा केला किंवा उत्पन्नाचा स्त्रोत चुकीचा दिला, तर आपल्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

Income Tax Return Penalty |
Stock Market Closing | बाजारात पुन्हा अस्थिरता, सेन्सेक्स १७० अंकांनी घसरून बंद, नेमकं काय घडलं?

दंडासोबत तुरुंगवासाचीही शक्यता

आयकर विभागाकडे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मजबूत यंत्रणा आहे. त्यामुळे अशी कोणतीही फसवणूक लगेच उघड होते. ही चूक जरी अनावधानाने झाली तरी उत्पन्नावर देय कराच्या 200 टक्के दंडासह 24 टक्के व्याजही भरावे लागू शकते.

जर विभागाला वाटले की, तुम्ही हेतुपुरस्सर फसवणूक केली आहे, तर तुमच्यावर जेलची कारवाई होऊ शकते. विशेष बाब म्हणजे, तुम्ही जर चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा इतर कोणाच्या मदतीने ITR भरत असाल आणि एखादी चूक झाली, तरी जबाबदारी तुमचीच राहील.

Income Tax Return Penalty |
Income Tax Refund Delay | इन्कम टॅक्स रिफंडला 'ब्रेक'! तोपर्यंत परतावा मिळणार नाही; जाणून घ्या कारण

ITR फाइल करताना टाळाव्यात या चुका:

  • चुकीचा ITR फॉर्म निवडणे

  • कोणताही पुरावा नसताना टॅक्स कपात (डिडक्शन) मागणे

  • भाडे किंवा व्याजातून मिळणारे इतर उत्पन्न लपवणे

  • प्रवास किंवा जेवणखर्च यासारखे वैयक्तिक खर्च व्यवसायिक खर्च म्हणून दाखवणे

  • बनावट भाडेकरार किंवा पावत्यांवरून HRA क्लेम करणे

जर आयकर विभागाला वाटले की तुम्ही जाणूनबुजून फसवणूक करत होता, तर नंतर रिटर्न दुरुस्त करूनही सुटका होणार नाही. दंड भरावा लागणारच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news