ITR Filing Last Date Update: तर तुम्ही हिट विकेट व्हाल... क्रिकेटच्या भाषेत आयकर विभागाचा ITR च्या शेवटच्या तारखेबाबत इशारा

ITR Filing Last Date Update
ITR Filing Last Date Updatepudhari
Published on
Updated on

ITR Filing Last Date Update: आज ३१ जुलै २०२६ रोजी इनकम टॅक्स रिटर्न अर्थात ITR फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही देखील अजून रिटर्न भरला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आयकर विभागाने करदात्यांना एक इशारा दिला आहे. विभागाने क्रिकेटची भाषा वापरत हिट विकेटचे उदारहण दिलं आहे.

आयकर विभागाने आयटीआर रिटर्न फाईल्सची डेटलाईन चुकवणे म्हणजे क्रिकेटमध्ये फलंदाज आपली विकेट स्वतःच उडवतो तशी आहे. ही एक अशी चूक आहे जी तुम्ही टाळू शकता. मात्र असं असलं तरी अनेक करदाता हे अगदी शेवटच्या तारखेची वाट पाहतात.

ITR Filing Last Date Update
ITR filing: मृत व्यक्तीचे ITR कोण भरू शकते? तिच्या मालमत्तेवर कोणाचा हक्क असतो? जाणून घ्या संपूर्ण नियम

आयकर विभाग काय म्हणतेय?

आयकर विभागाने सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केलं की आयटीआर १ आणि आयटीआर २ दाखल करण्याची ही शेवटची संधी आहे. जर वेळेत रिटर्न भरला तर दंड आणि व्याज दोन्ही वाचू शकते. वेळेत रिटर्न न भरता तुम्ही ही प्रक्रिया फ्री हिटमध्ये बदलू शकता.

ITR Filing Last Date Update
ITR Filing 2026: ITR भरण्याची शेवटची तारीख कोणती? उशीर झाला तर भरावा लागणार 5 हजारांचा दंड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज ई-व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे?

आता करदात्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. ३१ जुलै रोजी रिटर्न अपलोड करण्यासोबतच ई-व्हेरिफिकेशन देखील गरजेचे आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे. नियमानुसार जर एखाद्या करदात्याने ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरला तर त्याचे ई-व्हेरिफिकेशन करण्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे. म्हणजे तर आज रिटर्न भरला तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ई-व्हेरिफिकेशन करू शकता.

ITR Filing Last Date Update
ITR filing last date: करदात्यांसाठी मोठी बातमी! ITR भरण्यासाठी आजच शेवटची संधी! फक्त एका दिवसाचीच मुदतवाढ

IDS कापल्यानंतरही आयटीआर भरला नाही तर?

जर एखाद्या करदात्याने ३० दिवसांच्या कालावधीत व्हेरिफिकेशन केलं नाही तर व्हेरिफिकेशनची तारीख रिटर्न दाखल करण्याची तारीख मानली जाईल. अशा स्थितीत के रिटर्न विलेटेड श्रेणीत जाते. त्यामुळं दंड आणि व्याज लागू शकते.

जर ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही तर दाखल केले गेलेले रिटर्न हे पूर्णपणे अमान्य होतं. यात काही कायदेशीर दिलासा मिळतो. मात्र व्हेरिफिकेशन करणं करदात्यांसाठी आवश्यक आहे. त्यात विनाकारण विलंब करणे योग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news