

आयकर भरणाऱ्या करदात्यांसाठी मोठी बातमी आहे. सीबीडीटीने (CBDT) पुन्हा एकदा २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. पूर्वीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ होती. ही तारीख आधी १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली होती
ही मुदत वाढवण्यामागे मोठे कारण म्हणजे आयकर विभागाच्या वेबसाइटची संथ गती आणि तांत्रिक अडचणी. अनेक कंपन्यांनी तसेच वैयक्तिक करदात्यांनी फॉर्म डाउनलोड करण्यात आणि सबमिट करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे करदात्यांना दिलासा देत कर विभागाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे.
तुम्ही जर कोणत्याही कारणामुळे १६ सप्टेंबरपर्यंत रिटर्न दाखल करू शकत नसाल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उशीरा रिटर्न भरून दाखल करण्याची संधी मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा, उशीरा रिटर्न म्हणजे कायदेशीररीत्या विलंबाने दाखल केलेला आयकर परतावा.
आयकर विभागाच्या नियमानुसार, उशीरा रिटर्न तुम्ही निर्धारण वर्ष संपण्याच्या तीन महिने आधी किंवा कर निर्धारण पूर्ण होण्यापूर्वी, जे आधी असेल तेव्हा दाखल करू शकता.
जर तुम्ही अंतिम तारखेनंतर रिटर्न भरला तर तुम्हाला कलम २३४एफ (Section 234F) अंतर्गत विलंब शुल्क भरावे लागेल.
बहुतेक करदात्यांसाठी हे शुल्क ₹५,००० आहे.
५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी हे शुल्क फक्त ₹१,००० आहे.
म्हणजेच, १६ सप्टेंबरनंतर रिटर्न भरताना थोडा आर्थिक भार वाढणार आहे, पण रिटर्न भरता येणार नाही असे नाही.
शक्यतो अंतिम तारखेपूर्वीच रिटर्न दाखल करा, म्हणजे विलंब शुल्क वाचेल.
जर काही कारणाने उशीरा रिटर्न भरावा लागला, तरी घाबरू नका, कारण कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ती संधी उपलब्ध आहे.