'मुहूर्त ट्रेडिंग'मध्ये गुंतवणूकदारांची ३.३९ लाख कोटींची कमाई

Diwali Muhurat trading | कोणते शेअर्स वाढले?
Diwali Muhurat trading
दिवाळीनिमित्त शेअर बाजारात शुक्रवारी (१ नोव्हेंबर) एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र झाले.(Pudhari Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनिमित्त शेअर बाजारात शुक्रवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी ६ ते ७ दरम्यान एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र (Diwali Muhurat Trading 2024) झाले. भारतीय कालगणनेनुसार काल शुक्रवारी संवत्सर २०८१ची (Samvat 2081) सुरुवात झाली. यानिमित्ताने झालेल्या मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स ३३५.९६ अंकांनी वाढून ७९,७२४.१२ वर बंद झाला. तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक ९९ अंकांच्या वाढीसह २४,३०४ वर स्थिरावला.

गुंतवणूकदार मालामाल

यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.३९ लाख कोटींनी वाढून ४४८.१० लाख कोटींवर पोहोचले. १ नोव्हेंबर रोजी बाजार भांडवल ४४८.१० लाख कोटींवर गेले. याआधी गुरुवारी ३१ ऑक्टोबर रोजी बाजार भांडवल ४४४.७१ लाख कोटी होते. याचाच अर्थ मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान गुंतवणूकदारांनी ३.३९ लाख कोटींची कमाई केली.

सेन्सेक्सवर ३० पैकी २८ शेअर्स हिरव्या रंगात

सेन्सेक्सवरील ३० पैकी २८ शेअर्सनी हिरव्या रंगात व्यवहार केला. सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स ३.२९ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला. त्याचसोबत अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, एनटीपीसी, कोटक बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्सही वाढले. सेन्सेक्सवरील दोन शेअर्स घसरून बंद झाले. त्यात एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा शेअर्सचा समावेश होता. बीएसईवर आज तेजीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक राहिली. या निर्देशांकावर एकूण ३,६४८ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. यातील ३,०३६ शेअर्स तेजीसह बंद झाले. तर ५४२ शेअर्समध्ये घसरण झाली. तर ७० शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

Auto, PSU bank निर्देशांक आघाडीवर

क्षेत्रीय पातळीवरील तेजीत ऑटो आणि पीएसयू बँक निर्देशांक आघाडीवर राहिले. निफ्टी ऑटो निर्देशांक १.२ टक्के वाढला. निफ्टी पीएसयू बँक ०.७ टक्के वाढून बंद झाला.

हे एक तासाचे ट्रेडिंग शूभ मानले जाते. कारण हे संवत २०८१ ची सुरु होण्याचे प्रतिक आहे. लक्ष्मी पूजन मुहूर्तावर गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये व्यवहार करण्याची संधी मिळावी यादृष्टीने गुंतवणूकदारांसाठी हे ट्रेडिंग आयोजित केले जाते.

Diwali Muhurat trading
संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news