ICICI Prudential Equity and Debt Fund | पाव शतकाचा साथीदार

ICICI Prudential Equity and Debt Fund
ICICI Prudential Equity and Debt Fund | पाव शतकाचा साथीदार
Published on
Updated on

वसंत माधव कुळकर्णी

आज आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंडाचा 25 वा वर्धापन दिन आहे. हा फंड ‘एग्रेसिव्ह हायब्रिड’ फंड गटात मोडतो. मालमत्ता क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या या फंडाची सप्टेंबरअखेर 46,392 कोटींची मालमत्ता होती. हा फंड मुख्यत्वे सेवा निवृत्तीच्या जवळ असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी किंवा ज्यांची कमी जोखीम घेण्याची इच्छा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी आदर्श साधन आहे. या फंड गटातील सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍यांपैकी हा एक फंड आहे. या फंडाने 3 नोव्हेंबर 1999 ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 15.34 टक्के दराने परतावा दिला आहे.

‘एग्रेसिव्ह हायब्रिड’ फंडांना एकूण मालमत्तेपैकी किमान 65 ते 80 टक्के मालमत्ता समभाग आणि कमाल 35 ते 20 टक्के मालमत्ता रोखे साधनात गुंतवावी लागते. हा फंड एका प्रारूपाचे अनुसरण करून रोखे आणि समभाग यांच्यातील समतोल साधत असतो. अनेक निकषांपैकी निर्देशांक मूल्यांकन हा महत्त्वाचा निकष आहे. उर्वरित निकषांमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक संकेत (महागाईचा दर 10 वर्षे मुदतीच्या रोख्यांचा परतावा). समभाग पोर्टफोलिओ मल्टिकॅप घटनेचा आहे. गुंतवणूक योग्य मूल्यांकन असलेल्या आणि सुद़ृढ ताळेबंद असलेल्या कंपन्या खरेदी करून मूल्यांकन अनुकूल नसलेल्या कंपन्यांची विक्री करण्याचा एक विरोधाभासी द़ृष्टिकोनदेखील निधी व्यवस्थापक स्वीकारतात.

फंडाचे उद्योगक्षेत्र वाटप बाजार आवर्तनानुसार बदलते. 2018 ते 2020 पर्यंत त्यांनी दूरसंचार, वीज, धातू आणि तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक करून एक विरोधाभासी भूमिका घेतली, ज्या प्रत्येक क्षेत्राचा पोर्टफोलिओत 10-15 टक्के वाटा होता. कोरोनापश्चात या उद्योग क्षेत्रांनी अर्थपूर्ण योगदान दिले. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत बँकिंग आणि वित्तीय सेवा, वीज, दूरसंचार, आरोग्यनिगा या क्षेत्रांचे प्राबल्य आहे. तर माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख वस्तू यांच्यातील गुंतवणूक कमी केली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत कायम लार्जकॅपचे प्राबल्य असल्याचे दिसून येते.

लार्ज-कॅप कंपन्यांचे प्रमाण सरासरी 61 टक्के असून, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप यांचा गेल्या पाच वर्षांत अनुक्रमे 4.5 टक्के आणि 4 टक्के सरासरी वाटा आहे. रोखे गुंतवणूक किमान 20 टक्के राखली आहे. व्याजदर कमी अथवा वाढण्याच्या द़ृष्टिकोनानुसार ‘एकृअल’ आणि ड्यूरेशन रणनीतीमध्ये बदल करत अल्प (1 ते 3 वर्षे) आणि दीर्घ मुदतीच्या (5 ते 20 वर्षे) रोख्यांत गुंतवणूक केली जाते. वाढत्या दर परिस्थितीत, फंड कमी पत असलेल्या (नॉन-ट्रिपल ए) रोख्यात जे आकर्षक एकृअलला प्राधान्य देतात. उदाहरणार्थ, 2020 ते 2021 दरम्यान वाढत्या व्याज दर कालावधीत, कमी पत असलेल्या रोख्यांचे प्रमाण 24 टक्क्यांवर पोहोचले. जेव्हा व्याज दर कपात अपेक्षित होती (ऑक्टोबर 2024 पासून) ड्यूरेशनचा फायदा घेण्यासाठी दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक केली. 2024-2025 मध्ये त्यांनी ‘ट्रिपल ए’ आणि सरकारी रोख्यांत 17 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक वाढविली. सध्या हे सुमारे 15 टक्क्यांवर आहेत, तर ‘नॉन-ट्रिपल ए’ 5 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.

कामगिरी : गेल्या 10 वर्षांमधील पाच वर्षांच्या रोलिंग परताव्यावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, फंडाने सरासरी वार्षिक 16.4 टक्के परतावा दिला आहे, जो फंड गट सरासरी 12.5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हा फंड टॉप क्वार्टाइलमध्ये असलेला फंड आहे. सध्या बाजार सर्वकालीन निर्देशकाजवळ असल्याने जोखीम व्यवस्थापनाच्या द़ृष्टिकोनातून नवीन गुंतवणूक या फंडात करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news