

वसंत माधव कुळकर्णी
‘एचएसबीसी बिझनेस सायकल फंड’ हा या फंड गटातील सर्वात जुना फंड आहे. या फंडाने ऑगस्ट महिन्यात 13 वर्षे पूर्ण केली आहेत. बिझनेस सायकल फंड गटात हा फंड सर्वात यशस्वी आणि जुना फंड आहे. गौतम भूपाल (1 जून 2023 पासून) आणि सोनल गुप्ता (5 जुलै 2021 पासून), हे या फंडाचे नियुक्तनिधी व्यवस्थापक आहेत.
अनेकदा निधी व्यवस्थापक सेक्टर रोटेशन या बद्दल बोलतात. जेव्हा अर्थव्यवस्था आणि उद्योगांवर समष्टी अर्थशास्त्रीय परिमाणांचा परिणाम होतो, त्यामुळे तेव्हा व्यवसायांच्या सेवा आणि उत्पादनांच्या मागणीत विस्तार किंवा कमकुवतपणा येतो, ही आवर्तने ओळखून त्यानुसार गुंतवणूक कमी किंवा अधिक करणे म्हणजे सेक्टर रोटेशन. सामान्यतः, आर्थिक चक्राचे चार टप्पे जे व्यवसायांचे वैशिष्ट्य देखील दर्शवतात, त्यामध्ये विस्तार, शिखर, मागणीतील घसरण आणि मंदी यांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रे आवर्तनाच्या विविध टप्प्यांना तसेच प्रचलित बाजार परिस्थिती (मूल्यांकन, रोकड सुलभता इ.) यावर आधारित, फंड व्यवस्थापक त्यांच्या गुंतवणुका बदलतात. या रणनीतीचा अवलंब करणारे फंड म्हणजे ‘बिझनेस सायकल फंड’ होय. एचएसबीसी बिझनेस सायकल फंड हा या फंड गटातील सर्वात जुना फंड आहे. या फंडाने ऑगस्ट महिन्यांत 13 वर्षे पूर्ण केली आहेत. बिझनेस सायकल फंड गटात हा फंड सर्वात यशस्वी आणि जुना फंड आहे. गौतम भूपाल (1 जून 2023 पासून) आणि सोनल गुप्ता (5 जुलै 2021 पासून), हे या फंडाचे नियुक्तनिधी व्यवस्थापक आहेत.
वर उल्लेख केल्यानुसार आवर्तनाच्या प्रत्येक टप्प्याची स्वतःची गतिशीलता असते. विस्ताराच्या कालखंडात, आर्थिक क्रियाकल्प तेजीत असतात. औद्योगिक क्षमता वापर (कपॅसिटी युटिलायझेशन) वेगाने वाढते. सरकारी भांडवली खर्चात वाढ होते आणि बँकांच्या कर्ज वाटपात वाढ होते, जरी ग्राहक सढळ हाताने खर्च करतात. अशा परिस्थितीत, वित्तीय सेवा, ग्राहक विवेकाधिकार, स्थावर मालमत्ता आणि धातू चांगले परतावे देतात. तर माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण इत्यादींतून निधी व्यवस्थापक बाहेर पडतात. आवर्तनाच्या शिखरावर जेव्हा व्याजदर जास्त असतात आणि खासगी भांडवली खर्च देखील सुरू होतो, तेव्हा आधी नमूद केलेले बहुतेक परिमाणे सशक्तअसतात आणि आणि सातत्याने वाढ होत असते. मागणी घटण्याच्या टप्प्यात, बहुतेक आर्थिक परिमाणे आणि उद्योग घटक घसरणीच्या स्थितीत असतात. भांडवली खर्चातही लक्षणीय घट होते. या काळात माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, ग्राहकाभिमुख वस्तू आणि उपयुक्तता (युटिलिटी) पसंतीची उद्योग क्षेत्रे असतात. एचएसबीसी बिझनेस सायकल फंड व्यावसायिक आवर्तनांवर उद्योग क्षेत्रांची निवड करतो. उद्योग क्षेत्रे आणि त्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या निवडीसाठी ‘टॉप-डाऊन’ रणनीतीचा अवलंब करतो. परंतु कंपन्यांची निवड मूल्यांकन, कंपनीची ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रकातील गुणोत्तरे आणि व्यवस्थापन गुणवत्ता विचारात घेऊन केली जाते.
एक संकल्पना म्हणून, बिझनेस सायकल फंड ठीक वाटतात. परंतु, सेक्टर रोटेशन हे एक असे कला आहे जे नियमित डायव्हर्सिफाईड फंड देखील नियमितपणे करणे अपेक्षित आहे. तथापि, उद्योग आणि आर्थिक आवर्तनांवर आधारित पोर्टफोलिओ रोटेशन बिझनेस सायकल फंडांचे अधिक असते. एचएसबीसी बिझनेस सायकल फंड वगळता, इतर कोणत्याही योजनेचा ट्रॅक रेकॉर्ड पाच वर्षांपेक्षा जास्त नाही आणि म्हणूनच या फंडाची निवड केली आहे. या फंडाचा पाच वर्षांचा चक्रवाढ वार्षिक परतावा 19.66 टक्के आहे, जो निफ्टी 500 टीआरआयला 3.23 टक्केअधिक आहे. हा फंड कोअर पोर्टफोलिओचा भाग नसला तरी अनेक गुंतवणूकर सतत नावीन्याच्या शोधात असतात अशा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा सॅटेलाईट भागाचा हिस्सा व्यापणारा नक्कीच आहे. उच्च जोखीमांक असलेल्या गुंतवणूकदार एचएसबीसी बिझनेस सायकल फंड लहान एसआयपीचा वैविध्य आणण्यासाठी नक्कीच विचार करू शकतात.