

आज मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. आपण हे कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मिळवू शकता. प्रॉपर्टी कार्ड मिळवणे महत्त्वाचे आहे. कारण, ते अनेक प्रकारे उपयुक्तठरते.
ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड प्रणालीमुळे जमिनीशी व मालमत्तेशी संबंधित व्यवहार सुरक्षित होतील आणि फसवणुकीला थारा उरणार नाही.
प्रॉपर्टी कार्ड किंवा प्रमाणपत्र हे एक स्मार्ट कार्ड आहे, ज्यामध्ये आपल्या मालमत्तेची सर्व माहिती समाविष्ट असते. भारत सरकारतर्फे हे कार्ड जारी केले जाते. हे कार्ड मालकी हक्काचा पुरावा म्हणून कार्य करते. यामुळे मालमत्तेचा अधिकृत दस्तऐवज तयार होतो. हे कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला सरकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो.
* गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
* मुख्य पृष्ठावर ‘ईधर्ती’ या पोर्टलवर क्लिक करा.
* यानंतर लॉगइन टॅबवर क्लिक करा.
* नंतर अर्जदाराला नवीन पृष्ठावर नेले जाईल.
* ‘न्यू युजर’ टॅबवर क्लिक करा.
* न्यू युजर रजिस्ट्रेशन पृष्ठावर ऑफिशियल रजिस्ट्रेशन’ आणि ‘अॅप्लिकंट रजिस्ट्रेशन असे दोन पर्याय दिसतील. त्यामध्ये ‘अॅप्लिकंट रजिस्ट्रेशन निवडा.
* दिलेल्या पर्यायांपैकी आधार / पॅन/ पासपोर्ट आदींपैकी एक दस्तऐवज क्रमांक प्रविष्ट करा.
* अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, लिंग आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा.
*. अर्जदाराच्या वडिलांचे/पतीचे नाव प्रविष्ट करा.
*. पत्ता विभागात राज्य, शहर, पिनकोड, घर क्रमांक आणि रस्ता प्रविष्ट करा.
* मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
* ‘नेक्स्ट’ बटणावर क्लिक करा.
* यानंतर पूर्वी भरलेली वैयक्तिक माहिती पुन्हा दाखवली जाईल.
* मालमत्ता तपशील विभागात — जमिनीचा प्रकार, मालमत्तेचा प्रकार, उपप्रकार, वसाहत, ब्लॉक क्रमांक, प्लॉट क्रमांक, लीज क्रमांक आणि मालमत्ता नाव प्रविष्ट करा.
* सुरक्षा तपशील प्रविष्ट करा.
* नोंदणी पूर्ण झाल्यावर थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन असा संदेश दिसेल.
* ‘अॅकनॉलेजमेंट’ वर क्लिक केल्यावर भरलेला अर्ज पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड होईल.
* नोंदणी फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रणालीकडून प्रॉपर्टी कार्ड जारी केले जाईल.
* . प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी, प्रिंट व डाऊनलोड करण्यासाठी ई-धर्ती पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. तेथे एक नकाशा उघडेल. त्या नकाशावर तुम्हाला हवी असलेली मालमत्ता शोधा. पत्ता टाका आणि एंटर दाबा. नेमकी मालमत्ता झूम करून निवडा. निवडल्यावर व्ह्यू प्रॉपर्टी या पर्यायावर क्लिक करा. कार्ड स्क्रीनवर उघडेल. त्यामध्ये जमीन कोणत्या प्रकारची आहे, तिची स्थिती, भागधारकांची माहिती आदी तपशील असतील. ऑफिस लोकेशन अँड कॉन्टॅक्टस्वर क्लिक करून कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा.
संकेतस्थळ : https://bhulekh.mahabhumi.gov.in/
प्रॉपर्टी प्रमाणपत्रासाठी अर्ज, नोटराईज्ड शपथपत्र, अर्जदाराचे निवेदन व एक छायाचित्र, व्हीआरओ चौकशी अहवाल, आरआय चौकशी अहवाल, प्रॉपर्टी प्रमाणपत्र (2 प्रती) (कार्यालयातर्फे तयार होणार) संलग्न कागदपत्रे, रुपये 50/- चे चलन, उपनिबंधक मूल्यांकन फॉर्म, नोंदणी किंवा वारसा दस्तऐवज, रेशन कार्ड
* स्पष्ट मालकी नोंदीमुळे फसवणुकीचा धोका कमी होतो
* कायदेशीर व्यवहार सुलभ होतात
* खरेदी, विक्री, किंवा तारण व्यवहारासाठी आवश्यक
* मालमत्ता कर आणि शहरी नियोजनासाठी उपयुक्त
* कर्जासाठी अर्ज करताना विश्वासार्हतेत वाढ