

HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे खातेधारक असाल आणि Google Pay, PhonePe, Paytm किंवा थेट UPI वापरत असाल, तर हा अपडेट नक्की लक्षात ठेवा.
बँकेच्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 1:30 वाजेपर्यंत (एकूण 90 मिनिटे) HDFC बँकेच्या UPI सेवा पूर्णपणे बंद राहतील. या काळात बँकेच्या सिस्टीमचे मेंटेनन्स व अपडेटिंग केले जाणार आहे
बँकेने सांगितले आहे की या मेंटेनन्सच्या काळात खालील सेवा प्रभावित होतील:
UPI ट्रान्झॅक्शन: HDFC खात्यातून पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य होणार नाही.
Google Pay, PhonePe, Paytm सारख्या थर्ड-पार्टी अॅप्स: या अॅप्सवरून HDFC खात्यातून व्यवहार अयशस्वी होऊ शकतात.
रुपे क्रेडिट कार्ड पेमेंट: रुपे क्रेडिट कार्डद्वारे होणारे काही व्यवहार पूर्ण होणार नाहीत.
व्यापाऱ्यांचे पेमेंट: HDFC खात्याशी लिंक असलेल्या व्यापाऱ्यांना ग्राहकांकडून येणारे UPI पेमेंट स्वीकारण्यात अडचणी येऊ शकतात.
बँकेने ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सल्ला दिला आहे की
महत्वाचे व्यवहार, बिल पेमेंट किंवा मनी ट्रान्सफर मेंटेनन्स सुरू होण्याआधी पूर्ण करावेत.
रात्रीच्या वेळेत पेमेंट करायचे असल्यास पर्याय म्हणून दुसरे खाते किंवा वॉलेट वापरावे.
HDFC बँकेने ग्राहकांना सांगितले आहे की या काळात ते PayZapp डिजिटल वॉलेट वापरू शकतात.
PayZapp द्वारे बिल पेमेंट, रिचार्ज, ऑनलाइन खरेदी, मनी ट्रान्सफर करता येते.
KYC नसल्यास महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येतो.
KYC पूर्ण असल्यास व्यवहाराची मर्यादा 2 लाख रुपये प्रति महिना इतकी आहे.
व्यवहार पासवर्ड, पिन आणि बायोमेट्रिकद्वारे सुरक्षित राहतात.
HDFC बँकेची नेट बँकिंग सेवा मात्र २४x७ उपलब्ध राहील.
नेट बँकिंगमधून 200 पेक्षा जास्त प्रकारचे व्यवहार करता येतात.
फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट, FD उघडणे, क्रेडिट कार्ड पेमेंट यांसारखे व्यवहार नेट बँकिंगवरून सुरू राहतील.
जर तुम्ही व्यापारी असाल आणि ग्राहकांकडून UPI पेमेंट घेत असाल, तर ही वेळ लक्षात घेऊन पेमेंट कलेक्शनची योजना करा.
मोठे व्यवहार, EMI पेमेंट किंवा ऑनलाइन शॉपिंगचे पेमेंट आधीच करून घ्या.
1:30 नंतर सेवा पुन्हा सामान्य होईल आणि UPI ट्रान्झॅक्शन पूर्ववत सुरू होतील.