Google Pay pocket money feature | गूगल पे वरील काय आहे ‘पॉकेट मनी’ फीचर?

Google Pay pocket money feature |
Google Pay pocket money feature | गूगल पे वरील काय आहे ‘पॉकेट मनी’ फीचर?
Published on
Updated on

डॉ. धनंजय देशपांडे, सायबर सुरक्षातज्ज्ञ

मागील एक-दोन दिवसापासून ‘जी पे’ला लॉग इन झालात की तिथं एक नवीन आयकॉन बटन ‘पॉकेट मनी’ हे दिसत आहे. ! पण याला टच करू नका. तुमच्या खात्यातील पैसे जातील. अनेकांचे गेले आहेत असं म्हणून अनेकजण अजून गोंधळ वाढवत आहेत. काय आहे हे फीचर?

वास्तविक हे फिचर प्रामुख्याने लहान मुले किंवा घरातील अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी डिझाईन केलेले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे पालकांसाठी डिजिटल पद्धतीने ‘पॉकेट मनी’ देण्याचे एक साधन आहे.

या फिचरची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत ः पालकांचे नियंत्रण यात असून, पालक त्यांच्या मुलांच्या गूगल पे खात्यावर ठराविक रक्कम मर्यादित स्वरूपात सेट करू शकतात. पालकांसाठी हे सोयीचे आहे कारण मुलांना प्रत्यक्ष रोख रक्कम (कॅश) देण्याऐवजी डिजिटल पद्धतीने पैसे देता येतात, ज्यामुळे खर्चावर लक्ष ठेवणे सोपे जाते. सुरक्षित व्यवहाराच्या द़ृष्टीने मुले पालकांनी सेट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत आणि प्रत्येक व्यवहारानंतर पालकांना त्याचे नोटिफिकेशन मिळते. डिजिटल साक्षरतेसाठी लहान मुलांना जबाबदारीने पैसे कसे खर्च करावेत, हे शिकवण्यासाठी याचा वापर होतो. हे तुमच्या फोनवर का दिसत आहे? जर तुमच्या घरातील एखाद्या लहान मुलाचे खाते तुमच्या गुगल फॅमिली ग्रुपशी जोडलेले असेल, तर तुम्हाला हा सिम्बॉल दिसू शकतो. गुगल पे सध्या काही विशिष्ट वापरकर्त्यांसाठी अशा नवीन फीचर्सचे अपडेटस् रोल-आउट करत आहे.

याचा वापर करायचा नसेल, तर गुगल पे च्या ‘सेटिंग्स’मध्ये जाऊन तुमच्या फॅमिली किंवा पेमेंट प्रोफाईलमध्ये बदल करू शकता. या फीचरमध्ये दोन भूमिका असतात. पहिली म्हणजे प्रायमरी युजर (पालक) ज्यांच्या बँक खात्यातून पैसे जातात आणि पूर्ण कंट्रोल त्यांच्या हातात असतो. दुसरी भूमिका म्हणजे सेकंडरी युजर (मुल/ दुसरी व्यक्ती) जी स्वतःच्या फोनवरून पेमेंट करू शकते; पण पैसे पालकांच्या खात्यातून जातात. तुम्ही मंथली लिमिट सेट करू शकता, ज्यात पालक 15,000 रुपयांपर्यंत मासिक खर्च मर्यादा सेट करू शकतात.

यात दोन प्रकारचे कंट्रोल आहेत. फुल डेलिगेशनमध्ये मुलाला ठराविक लिमिटमध्ये स्वतः पेमेंट करता येते आणि अप्रूव्हल मोडमध्ये प्रत्येक पेमेंट आधी पालकांची मंजुरी लागते. लाईव्ह ट्रॅकिंगमुळे पालकांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनची ताबडतोब नोटिफिकेशन मिळते आणि खर्च ट्रॅक करता येतो. सेफ्टी कंट्रोल अंतर्गत कधीही अ‍ॅक्सेस पॉज किंवा रिमूव्ह करू शकतात. विशेष म्हणजे मुलांना स्वतंत्र बँक अकाउंटची गरज नाही. याचा फायदा म्हणजे मुलांना डिजिटल पेमेंट शिकायला मदत होते, पालकांना पूर्ण नियंत्रण आणि सुरक्षितता मिळते, खर्चावर नियंत्रण म्हणजेच बजेट डिसिप्लिन राहते आणि फायनान्शिअल लिटरसी वाढते.

समजा, तुम्ही तुमच्या मुलाला 3000 रुपये पर मंथ लिमिट दिली, तर तो दुकानात क्यू आर स्कॅन करून पेमेंट करू शकतो; पण 3000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाही आणि तुम्हाला प्रत्येक खर्चाची माहिती येते. सध्या तरी त्या फीचरकडे ‘आर अँड डी’ स्वरूपात पाहून व तटस्थ राहून काही काळ जाऊ द्यावा, इतर मंडळी जे ते फिचर वापरत असतील, त्यांचा अनुभव नंतर समजून घ्यावा आणि तो तुम्हाला सुटेबल असेल तर ते फिचर वापरायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news