

16 एप्रिल 2025 रोजी देशभरातील सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या वाढीचा कल अधिक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर मंगळवारी 93,353 रुपयांवरून कमी होऊन 93,102 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, चांदीचा दर 92,929 रुपयांवरून 95,030 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 50 रुपयांनी वाढून 96,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. 99.5 टक्के शुद्धतेचे सोने म्हणजेच 23 कॅरेटचे सोने 50 रुपयांनी वाढून 96,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
वाढत्या मागणीमुळे चांदीचा दर तब्बल 2,500 रुपयांनी वाढून 97,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सोमवारच्या तुलनेत हा दर 2.63 टक्क्यांनीनी वाढला आहे.
सामान्यत: पाहायला गेल्यास सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक आर्थिक, राजकीय व सामाजिक घटक कारणीभूत असतात. सध्या भारतात सोन्याचा भाव ₹96,450 पर्यंत गेला आहे, त्यामागची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे:
जागतिक बाजारातील अस्थिरता – अमेरिका, युरोपमध्ये आर्थिक अस्थिरता किंवा बँकिंग संकट निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक मानतात.
डॉलरची कमजोरी – डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यास आयात करताना सोनं महाग पडतं.
महागाईचा दर वाढणे – महागाई वाढल्यावर लोक भांडवलाच्या सुरक्षिततेसाठी सोन्यात गुंतवणूक करतात.
सण-उत्सव व लग्नसराई – भारतात सण-उत्सव किंवा लग्नसराईमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढते, त्यामुळे दर वाढतात.
मध्यवर्ती बँकांची खरेदी – काही देशांच्या केंद्रीय बँका सोनं खरेदी करत असल्यास जागतिक मागणी वाढते.
पुरवठा कमी असणे – खाणीतून सोन्याचा उत्पादनाचा दर कमी झाल्यास पुरवठ्यावर परिणाम होतो आणि किंमत वाढते.