FD 2.0: एफडी 2.0 उत्क्रांती: साधन म्हणून मुदत ठेवींचा Gen Z कसा करताय वापर?

FD 2.0: शेअर बाजारातील चढउतार आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर Gen Z आता मुदत ठेवींना नव्या पद्धतीने वापरत आहे. FD 2.0 अंतर्गत तरुण गुंतवणूकदार लिक्विडिटी, सुरक्षितता आणि शॉर्ट-टर्म उद्दिष्टांसाठी एफडीचा वापर करत आहेत.
FD
FDPudhari
Published on
Updated on

श्री. एस. सुंदर, सहव्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ, श्रीराम फायनान्स

FD 2.0: गेल्या काही दशकांपासून भारतात गुंतवणूकीसारख्या आर्थिक जगतात मुदत ठेवी (एफडी) हा सर्वाधिक विश्वासार्ह आर्थिक पर्यांयापैकी एक उत्तम पर्याय ठरलेला आहे. गुंतवणूकीत सुटसुटीतपणा, सुरक्षितता आणि उत्पन्नाबाबत निश्चित हमी ही मुदत ठेंवींची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्टांमुळेच जुन्या जमान्यातील गुंतवणूकदार या पर्यायाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. परंतु आजच्या जमान्यात याच मुदत ठेवींबाबत एक आश्चर्यकारक असा वर्तनात्मक बदल नवीन पिढीतील गुंतवणूकदारांमध्ये घडताना दिसत आहे. सदैव प्रयोगशील असलेली आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्रास वापर करणारी जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z) ही पिढी मुदत ठेवींतील गुंतवणूकीबाबत मोठ्या प्रमाणात रस दाखवत आहेत. त्यांच्या वर्तनातील हा बदल खरोखर आश्चर्यकारक आहे, परंतु त्याचबरोबर तितकाच धोरणात्मकसुध्दा आहे.

गुंतवणूकदारांची ही नवीन पिढी मुदत ठेवींकडे ‘गुंतवणूक करा आणि विसरून जा’ अशा दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून अजिबात पाहत नाही. ही पिढी मुदत ठेवींचा वापर अतिशय कौशल्यपुर्ण पध्दतीने अल्प-मुदतीच्या संपत्तीच्या साधनांप्रमाणे करत आहेत. मुदत ठेवींतील गुंतवणूक त्यांना अनेक प्रकारे मदत करत आहेत. वित्तीय जोखीमेचे संतुलन साधण्यास, शिस्तबद्ध राहण्यास आणि जीवनशैलीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यास मुदत ठेवी त्यांना मदतयुक्त ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत भारताच्या आर्थिक जगतात घडत गेलेल्या बदलांचा साक्षीदार असलेली माझ्यासारखी व्यक्ती मुदत ठेवींचे आर्थिक जगतात पुनरागमन झाले आहे, अशा दृष्टीकोनातून या नवीन बदलाकडे पाहत नाही, तर एक उत्क्रांती म्हणून या बदलाकडे पाहते आणि माझ्यामते ही उत्क्रांती म्हणजे ‘एफडी २.०’ होय.

नवीन पिढी आणि नवीन आर्थिक मानसिकता

जनरेशन झेडचा (जेन-झी - Gen Z) पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोनावर सध्याच्या सतत बदलणाऱ्या युगाने प्रचंड प्रभाव टाकला आहे. हे युग या पिढीचा वित्तीय दृष्टीकोन साकारत चालले आहे. ही पिढी आर्थिक अस्थिरता, डिजिटल तंत्रज्ञानामुळे होणारी उलथापालथ आणि क्रिप्टोपासून आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांपर्यंत गुंतवणूक पर्यायांच्या प्रचंड संधी असलेल्या युगात वाढली आहे. जोखीम घेण्याच्या बाबतीत प्रचंड आत्मविश्वास असलेली परंतु त्याचबरोबर आपली आर्थिक बाजू सुरक्षित ठेवण्याबाबतही तितकीच जागरूक असलेली पिढी या युगामुळेच उदयास आली आहे.

या पिढीबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात अनेक महत्वाचे मुद्दे प्रकाशझोतात आले आहेत. भारतात जनरेशन झेडमधील (जेन-झी - Gen Z) ५५ टक्के व्यक्ती पुर्णपणे पगारावर अवलंबून आहेत आणि जागतिक सरासरीपेक्षा हे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यांची पैशाच्या विनियोगाची पध्दतही वेगळी आहे. ते आपल्या उत्पन्नातील सुमारे ४७ ते ४८ टक्के पैसा अन्न, फॅशन, प्रवास आणि ओटीटी यासारख्या घटकांवर खर्च करतात. लवचिकता आणि शिस्त या दोन्ही घटकांची आवश्यकता असलेली त्यांची जीवनशैली यातून प्रतिबिंबित होते. यामुळे या पिढीसाठी स्थिर त्याचबरोबर गुंतवणूकीचे अल्पकालीन आर्थिक पर्याय खरोखर उपयुक्त असल्याचा महत्वाचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे.

मुदत ठेवींबाबत त्यांची पुन्हा आवड निर्माण करणारी विविध कारणे पुढीलप्रमाणे:

१. वाढीशी कोणतीही तडजोड न करता त्यांना हवी स्थिरता

शेअरबाजाराशी संबंधित विविध वित्तीय पर्यांयामध्ये जनरेशन झेड गुंतवणूकदारांचा अतिशय मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. परंतु अलिकडच्या काळात शेअरबाजारात निर्माण झालेल्या उच्च अस्थिरतेने त्यांना महत्वपुर्ण शिकवण दिली आहे. गुंतवणूकीबाबत उच्च जोखीम उचलताना स्थिर स्वरुपातील वित्तीय गुंतवणूक पर्यांयाचाही आधार घेत वित्तीय संतुलन राखणे अतिशय आवश्यक आहे, ही महत्वपुर्ण शिकवण त्यांना मिळाली आहे. मुदत ठेवी त्यांना हीच शिकवण देतात आणि ती म्हणजे बाजारविरहीत शून्य जोखीम परंतु खात्रीशीर परतावा मिळण्याचे उत्तम साधन म्हणजे मुदत ठेवी होय. आपल्या जीवनात वाटचाल करताना अनेक तरुण व्यावसायिक जीवनशैलीसाठी करावा लागणारा खर्च आणि अल्पकालीन वित्तीय उद्दिष्टे यांची सांगड घालताना दिसतात. त्यामुळेच मुदत ठेवी त्यांना त्यांची रोख रक्कम विनावापर पडू न देता निधी साठवण्याचा एक सुनियोजित मार्ग प्रदान करतात.

२. डिजिटल-आधारित सुविधा

डिजिटल अॅप्सद्वारे स्वतः गुंतवणूक करण्याला म्हणजेच डू इट युवरसेल्फ (DIY) जनरेशन झेडची (जेन-झी - Gen Z) जोरदार पसंती आहे. स्वतःच्या नेतृत्वाखालील आर्थिक निर्णय घेण्याची प्रवृती त्यांच्यात कितीतरी प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. एकेकाळी कागदपत्रांआधारे आणि बँकांच्या शाखेत जाऊन केली जाणारी ही गुंतवणूक आता केव्हाही घरबसल्या करता येते. डिजीटल सुविधांमुळे तर अवघ्या दोन मिनिटांत करता येते. थोडक्यात ही गुंतवणूक पध्दत आता डिजिटल अनुभवात रूपांतरित झालेली आहे. निधीचे हस्तांतरण करणे, खरेदी आणि गुंतवणूकीसाठी जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z) पिढी सुगम आणि निर्बाध अॅपचा आधार घेतात. त्यांच्या या अॅप-आधारित वर्तनाचे प्रतिबिंब मुदत ठेवींच्या बाबतीतही दिसून येते. मुदत ठेव सुरु करणे, तिचे नूतनीकरण करणे किंवा तिच्यातून पैसे काढून घेण्यासाठी जनरेशन झेड डिजीटल पध्दतच वापरत आहे.

३. आकर्षक व्याजदर

मुदत ठेवींचे दर ७ ते ८ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने, तरुण गुंतवणूकदारांना पारंपारिक बचत खाती आणि अल्प जोखीम असलेल्या काही म्युच्युअल फंड योजनांच्या तुलनेत त्या अतिशय आकर्षक वाटतात. अल्पकालीन उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी त्यांना हा व्याजदर तोलामोलाचा वाटतो. जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z) वेगळ्या पद्धतीने कशा वापरू शकतात मुदत ठेवी जीवनशैली, पैशाचा विनियोग करण्याची पध्दत आणि डिजिटल-आधारित वित्तीय योजनांना असलेले प्राधान्य पाहता जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z) साठी मुदत ठेवी स्मार्ट तसेच व्यूहात्मक असे पर्याय बनू शकतात. दीर्घकालीन तसेच प्रदीर्घ काळासाठी विनियोगापासून राखीव निधीला दूर ठेवण्याऐवजी तरुण गुंतवणूकदार मुदत ठेवींचा अधिक लवचिक आणि योग्य हेतूने वापर करु शकतात:

अल्पकालीन मुदतीच्या ठेवीः प्रवास, गॅझेट्सची खरेदी किंवा स्वतःत कौशल्य वृध्दी यासारख्या जीवनशैलीशी आधारित उद्दिष्टांसाठी पैशांचे नियोजन आणि राखीव निधी उभारण्यासाठी अल्पकालीन मुदत ठेवींत (३ ते १२ महिने) ते आपला पैसा गुंतवू शकतात. त्यामुळे त्यांना बचत खात्यापेक्षा चांगला परतावा मिळतो. तसेच उत्साहाच्या भरात केल्या जाणाऱ्या खर्चाला पायबंद बसण्यासही मदत होते.

एफडी लॅडरिंगः यात मुदत ठेवी टप्प्याटप्प्याने विविध मुदतीच्या योजनांमध्ये विभागल्या जातात. त्यामुळे मोठी रक्कम एकरकमी एकाच मुदत ठेवीत गुंतवण्याऐवजी विविध मुदतींच्या ठेवींत ठेवल्याने टप्पाटप्प्यात पैसे मिळण्याचा मार्ग तयार होऊन त्यांना तरलता प्राप्त होते.

सहज मोडता येणाऱ्या डिजिटल एफडीः या योजना आपत्कालीन स्थितीत तत्काळ निधी पुरवण्याची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे अधिक प्रमाणात खर्च करण्याचा मोह टाळला जातो. यातून आर्थिक स्थिरता मिळते. तसेच त्या गुंतवणूकीसाठी सहज उपलब्ध आहेत आणि परताव्याबाबत आगाऊ अंदाज बांधता येतो.

रेट-शॉपिंगः अधिकाधिक परतावा मिळवण्यासाठी बँका आणि एनबीएफसींमध्ये चकरा मारुन चौकशी करण्यापेक्षा कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z)अॅप्स आणि सोशल मीडियाचा वापर करत संशोधन करतात. त्यामुळे डिजीटल मुदत ठेवी या जनरेशनझेड (जेन-झी - Gen Z)च्या सवयीशी अतिशय मिळतीजुळत्या आहेत.

एसआयपी स्टॅबिलायझरः उत्पन्नात अचानक निर्माण झालेली तफावत अथवा शेअरबाजारातील अस्थिरतेतही नियोजित मासिक गुंतवणूक म्हणजेच एसआयपी निरंतर सुरू राहण्यासाठी मुदत ठेवी सहाय्य करतात. त्यामुळे "एसआयपी स्टॅबिलायझर" म्हणूनही मुदत ठेवीचा वापर करता येतो. मुक्तपणे खर्च करणाऱ्या पण आर्थिक नियंत्रणाचे सुकाणू स्वतःच्या हातात ठेवणाऱ्या या पिढीसाठी या सूक्ष्म स्वरुपातील विविध रणनीती खूप उपयुक्त आहेत. जीवनशैलीच्या आकांक्षांशी कोणतीही तडजोड न करता त्यांच्याकडे येत असलेल्या निधीच्या प्रवाहाला विशिष्ट रचना प्रदान करणे, शिस्त लावणे आणि भविष्याचा वेध घेण्यास या अगदी लहानसहान उपाययोजना खूप मदत करतात.

आर्थिक क्षेत्रासाठी या बदलाचे महत्त्व

जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z) मधील जवळजवळ ४८ टक्के व्यक्ती आर्थिक शिक्षणासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. ऑनलाइन जगतात सदैव असलेले गोंधळाचे वातावरण आणि चुकीच्या माहितीचा भडीमार या सगळ्यांना दूर सारत स्वतःचे योग्य स्थान तयार करण्यासाठी मुदत ठेवीसारख्या साध्या, विश्वासार्ह योजनांना खूपच संधी आणि वाव आहे. डिजिटल-स्वरुपात मुदत ठेव योजना, रेट बूस्टर, नूतनीकरण पूर्वसूचना तसेच तरुण ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या परिपूर्ण डिजीटल अॅपच्या माध्यमातून वित्तीय संस्था या नवीन पिढीला साद घालत आहेत.

भविष्यातील वाटचाल

एफडी २.० या उत्कांतीमध्ये आज तरुण भारतीय त्यांच्या पैशांचा साठा अतिशय अनोख्या पध्दतीने उभारताना दिसत आहे. अतिशय जलद, डिजिटल पध्दतींचा अवलंब आणि वास्तविक जीवनातील उद्दिष्टांना अनुरूप ते निधी साठवत आहेत. जनरेशन झेड (जेन-झी - Gen Z) शिस्तबद्ध पध्दतीने वाटचाल करण्यासाठी "नंतर पाहूया" अशा विचारसरणीने अजिबात वागताना दिसत नाहीत. त्यांना सोपे, सुटसुटीत पर्याय हवे आहेत. राखीव निधी उभा करता येणे, आर्थिक गुंतवणूकीतील फो – मो (FOMO-फिअर ऑफ मिसिंग आउट) ही भावना टाळता येणे आणि आपल्या पोर्टफोलिओला अत्यंत आवश्यक अशी सुरक्षा प्रदान करणे, असे पर्याय त्यांना हवे आहेत.

आधुनिक काळातील मुदत ठेवी या पिढीच्या या मानसिकतेत अतिशय चपखलपणे बसतात. कारण त्या त्यांच्या जीवनशैलीच्या प्रवाहात कोणतीही ढवळाढवळ करत नाही आणि त्यांना तणावमुक्त असा हमखास परतावा प्रदान करतात. एकेकाळी जुनाट वित्तीय योजना या नजरेने पाहिल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजना आता स्मार्ट, बचतीसाठीच्या मुख्य आधारस्तंभ बनल्या आहेत. त्या जनरेशन झेडला (जेन-झी - Gen Z) संतुलित राहण्यास, राखीव निधी तयार करण्यास आणि त्यांची मोठी आर्थिक उद्दिष्टे सतत कार्यान्वित ठेवण्यास मदत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news