

Emergency Fund Planning
जर तुम्ही 'हातावर पोट' असणारे असाल किंवा तुम्हाला दर आठवड्याला किंवा महिन्याला ठराविक रक्कम मिळत नसेल, तर अशा परिस्थितीत पैसे बाजूला काढणे कठीण वाटू शकते. पण, थोडीशी रक्कम बाजूला काढल्यासही मोठी आर्थिक सुरक्षा लाभू शकते. आणीबाणीचा निधी म्हणजे रोख रकमेचा साठा असतो, जो विशेषतः अनपेक्षित खर्च किंवा आर्थिक अडचणींसाठी म्हणून बाजूला ठेवलेला असतो. कार दुरुस्ती, घराची दुरुस्ती, वैद्यकीय बिले किंवा उत्पन्नाचे नुकसान ही काही याची सामान्य उदाहरणे आहेत. सर्वसाधारणपणे, आणीबाणीतील बचत मोठ्या किंवा लहान अनपेक्षित खर्च किंवा पेमेंटसाठी वापरली जाऊ शकते, जी तुमच्या नेहमीच्या मासिक खर्चाचा भाग नसतात.
बचत न करता, आर्थिक धक्का-अगदी किरकोळ जरी असेल तरी तुम्हाला मागे नेऊ शकतो, आणि जर त्याचे रूपांतर कर्जात झाले, तर त्याचा संभाव्यतः कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. संशोधन असे सूचित करते की, जे लोक आर्थिक धक्क्यातून सावरण्यासाठी संघर्ष करतात, त्यांच्याकडे भविष्यातील आणीबाणीपासून संरक्षण करण्यासाठी कमी बचत असते. ते क्रेडिट कार्ड किंवा कर्जावर अवलंबून राहू शकतात, ज्यामुळे कर्ज होऊ शकते, जे सामान्यतः फेडणे अधिक कठीण असते.
तुमच्या बचतीसाठी एक विशिष्ट ध्येय ठेवल्यास तुम्हाला सतत प्रेरणा मिळू शकते. तुमचे आपत्कालीन निधी जमा करण्याचे ध्येय तुम्हाला योग्य मार्गावर नेवू शकते, खासकरून जेव्हा तुम्ही सुरुवात करत असाल.
बचत करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि तुम्ही त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे. अशी मानसिकता आणि चिकाटी हा बचतीचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही दररोज, आठवड्यातून किंवा प्रत्येक पगारानंतर विशिष्ट रक्कम बाजूला काढू शकता. शक्य असल्यास तुम्ही जास्त बचत करू शकता आणि तुमची बचत जलदगतीने वाढलेली पाहू शकता.
तुमच्या बचतीची नियमितपणे तपासणी करण्याचा मार्ग शोधा. तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेची स्वयंचलित सूचना मिळवा किंवा तुमच्या योगदानाचा हिशोब लिहून ठेवा. तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवल्याने तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.
जर तुम्ही तुमच्या बचत सवयीचे पालन करत असाल, तर तुम्ही जे साध्य केले आहे त्याचे कौतुक करा. स्वतःला बक्षीस देण्यासाठी काहीही मार्ग शोधा आणि जर तुम्ही तुमचे ध्येय गाठले असेल, तर पुढील ध्येय निश्चित करा.
आणीबाणीच्या बचत निधीमध्ये तुमच्याकडे किती फंड असणे आवश्यक आहे, हे आपापल्या परिस्थितीवर व आर्थिक कमाईवर, राहणीमानावरही अवलंबून असते. भूतकाळात तुम्हाला आलेल्या सर्वात सामान्य प्रकारच्या अनपेक्षित खचांबद्दल आणि त्यांची किंमत किती होती याचबद्दल आपला इमर्जन्सी फंड किती असावा, हे निश्चित करता येईल. एरवी, सर्वसाधारणपणे आपल्या ६ महिने ते वर्षभराच्या खर्चाइतकी रक्कम आपल्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून वाजूला काढून ठेषणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, आपला महिन्याचा खर्च २० हजार रुपये असेल, तर आपत्कालीन खर्चासाठी साधारणपणे १ लाख २० हजार रुपये ते २ लाख ४० हजार रुपये आपल्याकडे इमर्जन्सी फंड असावा, हे गृहितक आहे.