'हिंडेनबर्ग'नंतर अदानींना दुसरा मोठा धक्का; काही क्षणात उडाले २.२५ लाख कोटी

Adani Group stocks : लाचखोरीच्या आरोपानंतर अदानींचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत कोसळले
 Adani Group stocks
लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी कंपन्यांचे शेअर्स आज २० टक्क्यांपर्यंत घसरले.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हिंडेनबर्ग'नंतर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोरीचा (US bribery charges) आरोप निश्चित करण्यात आला आहे. याचे पडसाद आज गुरुवारी (दि.२१) शेअर बाजारात उमटले. अदानी समुहातील काही कंपन्यांचे शेअर्स आज २० टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे अदानींच्या शेअर्सचे बाजार भांडवल २.२५ लाख कोटींनी कमी होऊन १२ लाख कोटींवर आले. अमेरिकेची शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्गने २०२३ च्या सुरुवातीला अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा केला होता. त्यावेळीही अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर आज गुरुवारचा (दि. २१ नोव्हेंबर) दिवस अदानी समुहासाठी सर्वात वाईट दिवस ठरला. त्यांच्या बाजार भांडवलात घट झाली आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट

तसेच फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अब्जाधीश गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत १०.५ अब्ज डॉलर्सची घट होऊन ती ५९.३ अब्ज डॉलरवर आली आहे.

अदानींवर लाचखोरीचा आरोप

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन फेडरल कोर्टात गौतम अदानी यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात अधिकाऱ्यांवर सिक्युरिटीज फसवणूक, वायर फ्रॉड आणि फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत आरोप ठेवण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि हे प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

अदानी समुहाने आरोप फेटाळले

दरम्यान, अदानी समुहाने गौतम अदानींवर आरोप फेटाळून लावले आहेत. अदानी समुहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "अदानी ग्रीनच्या संचालकांवर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप बिनबुडाचे असून ते आम्ही फेटाळत आहोत. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनेच म्हटल्याप्रमाणे, "हे आरोपपत्रातील आरोप आहेत आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादींना निर्दोष मानले जाते." आम्ही शक्य सर्व कायदेशीर मार्ग शोधू."

Adani Group stocks : अदानी एंटरप्रायजेससह तीन शेअर्स २० टक्क्यांनी घसरले

सौरऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी लाचखोरी आणि सुमारे ३ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा अदानींवर आरोप आहे. या आरोपानंतर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स २० टक्क्यांनी घसरून २,२५७ रुपयांवर आला. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्सला २० टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. अदानी पोर्ट्स शेअर्सदेखील २० टक्के घसरला. त्याचबरोबर अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट्स, एसीसी आणि अदानी विल्मर हे शेअर्स सुमारे १० टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहेत.

अदानींवरील लाचखोरीच्या आरोपाचे शेअर बाजारात पडसाद

अदानींवरील लाचखोरीच्या आरोपाचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. आज सका‍ळच्या सत्रात सेन्सेक्स ७५० हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टी २०० अंकांनी खाली आला होता. दरम्यान, दुपारी १ च्या सुमारास सेन्सेक्स ५४२ अंकांनी घसरून ७७,०२६ वर तर निफ्टी २०० अंकांच्या घसरणीसह २३,३१६ वर व्यवहार करत होता.

 Adani Group stocks
अदानींवर अमेरिकेत २६५ दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचा आरोप, शेअर्स धडाधड कोसळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news