आयसीआयसीआय – प्रू थिमॅटिक अ‍ॅडव्हान्टेज फंड

आयसीआयसीआय – प्रू थिमॅटिक अ‍ॅडव्हान्टेज फंड
Published on
Updated on

हा फंड ऑफ फंड्स आहे. म्हणजे या फंडातील गुंतवणूक प्रत्यक्ष स्टॉक्समध्ये न होता इतर फंडांमध्ये होते. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ही भारतातील बलाढ्य अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. तिने प्रवर्तित केलेल्या सर्व प्रकारच्या फंडांची संख्या खूप मोठी आहे. ओघाने तिच्याकडे थिमॅटिक आणि सेक्टर फंडही मोठ्या प्रमाणावर आहेत.

Thematic फंडांची माहिती आपण यापूर्वी याच लेखमालेतून घेतली आहे. Thematic फंड हे sectoral फंडांपेक्षा अधिक व्यापक स्वरूपाचे असतात. कारण त्यांनी निवडलेल्या Theme शी संबंधित अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये ते गुंतवणूक करतात. उदा. Infrastructure ही संकल्पना असेल तर तिच्याशी सिमेंट, मेटल्स, पॉवर, ट्रान्स्पोर्ट वगैरे सेक्टरसही जोडली जातात. त्यामुळे Thematic फंडांमधील गुंतवणूक अधिक वैविध्यपूर्ण होते.

आता कोणत्या वेळी कोणत्या सेक्टर्सशी निगडित फंडांमध्ये गुंतवणूक करायची? कारण अर्थव्यवस्थेमध्ये एकच क्षेत्र सर्वकाळ तेजीमध्ये राहत नाही. सर्व क्षेत्रांमध्ये तेजी-मंदीचे चढउतार सतत चालू असतात. मागील दहा-पंधरा वर्षांचाच काळ पाहिला तर भारतामध्ये कोणत्या काळात कोणत्या क्षेत्रात धमाल सुरू होती, ते खालील कोष्टकावरून लक्षात येईल.

अ. क्र. काळ तेजीचे क्षेत्र

1 1998-2000 आय.टी.
2 2003-2006 इन्फ्रा अँड पॉवर
3 2008-2013 कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑटो
4 2012-2013 एक्स्पोर्ट ओरिएंटेड कंपनीज
5 2013-2018 फायनान्शिअल कंपनीज
6 2020-2021 फार्मा, आयटी

भारतीय मनुष्य सहजासहजी शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत नाही. दहा ठिकाणी सल्ला घेऊन (तोही आप्‍त, मित्र, सहकारी याचा त्याने निर्णय घेईपर्यंत त्या सेक्टरमधील तेजी उताराला लागलेली असते. याची दोन ठळक उदाहरणे देता येतील. सन 1998 ते 2000 या काळात आय टी सेक्टरमध्ये प्रचंड तेजी होती. फेब्रुवारी 1999 ते फेब्रुवारी 2000 या एका वर्षात आयटी सेक्टरने 74 टक्के रिटर्नस् दिले ते पाहून ज्यांनी 2000 मध्ये आयटी कंपन्यांमध्ये किंवा आयटी सेक्टर फंडामध्ये गुंतवणूक केली, त्यांचे हात चांगलेच पोळून निघाले. कारण फेब्रुवारी 2000 ते फेब्रुवारी 2001 या वर्षामध्ये याच आयटी सेक्टरने उणे 67 टक्के रिटर्नस् दिले. दुसरे उदाहरण याच्या विरुद्ध आहे. 2015 पासून 2020 पर्यंत फार्मा सेक्टर मंदीत होते. त्यामुळे ज्यांनी फार्मा सेक्टरकडे या काळात संपूर्णपणे पाठ फिरवली होती, त्यांचा 2020-21 मधील फार्मा सेक्टरमधील तेजी पाहूनच भ्रमनिरास झाला.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोणत्या थिमॅटिक फंडामध्ये किंवा सेक्टर फंडामध्ये गुंतवणूक करावी, हे ठरवणे फारच कठीण जाते. अर्थव्यवस्थेमधील चरलीे एलेपेाळल ऋरलीेीीं चा अभ्यास करून सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली पाहिजे, नजीकच्या काळात कोणते क्षेत्र बहरात येईल, कोणत्या क्षेत्रातून काढता पाय घेतला पाहिजे, या सर्व गोष्टी ध्यानात येण्यासाठी तज्ज्ञांची विशेष गरज आहे. आयसीआयसी प्रुडेन्शिअलने ही गरज बरोबर ओळखली आणि 1 जानेवारी 2013 रोजी त्यांच्या ICICI Prudential Thematic Advantage Fund बाजारात आणला.

हा फंड ऑफ फंड्स आहे. म्हणजे या फंडातील गुंतवणूक प्रत्यक्ष स्टॉक्समध्ये न होता इतर फंडांमध्ये होते. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल ही भारतातील बलाढ्य अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. तिने प्रवर्तित केलेल्या सर्व प्रकारच्या फांडांची संख्या खूप मोठी आहे. ओघाने तिच्याकडे थिमटिक आणि सेक्टर फंडही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामधीलच इतर निवडक थिमॅटिक आणि सेक्टर फंडांमध्ये थिमॅटिक अ‍ॅडव्हान्टेज फंडामधील गुंतवणूक केलेली आहे. इतर कंपन्यांच्या उत्कृष्ट सेक्टर फंडांमध्येही गुंतवणूक केली जाते. उदा. या फंडामधील जवळपास दहा टक्के गुंतवणूक ही युटीआय ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅड लॉजिस्टिक्स फंड आणि फ्रँकलिन एशियन इक्विटी फंड या दोन फंडांमध्येदेखील आहे. फांडाचा 31 ऑक्टोबर 2021 चा पोर्टफोलिओ पाहिला तर त्यामधील गुंतवणूक किती Diversified
आहे, ते लक्षात येते. आयसीआयसीआय प्रू यूएस ब्ल्यूचिप इक्विटी फंड आणि फ्रँकलीन एशियन इक्विटी फंड या इंटरनॅशनल फंडातील गुंतवणुकीमुळे या फंडाला आंतरराष्ट्रीय Exposur ही मिळते. ऑक्टोबर 2021 च्या अखेर फंडाच्या पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे.

scheme name                                                       Aug.21                                Sept.21                              Oct.21
ICICI pru infrastructure fund                                    51%                                      28%                                22%
ICICI pru Banking and Fin. ser. fund                         18                                         17                                    4
ICICI pru Exports and Services fund                          10                                         9                                    8
ICICI pru Pharma Healthcare and Diagnastic fund     9                                           8                                   17
ICICI pru FMCG Fund                                                  5                                           3                                    –
ICICI pru Technology fund –                                        –                                           –                                     9
UIT Transportation and Logistic fund                          –                                           5                                     7
Franklin Asian Equity fund                                          4                                            3                                     3
ICICI pru US Bluechip Equity fund                               –                                           12                                   14
ICICI pru Floation Interest fund                                   2                                          10                                    11
Short Term Debt and NET fund                                  1                                            5                                      5

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, इन्फ्रा, बँक्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस, हेल्थकेअर, एफएमसीजी, टेक्नॉलाजी, ट्रान्स्पोर्ट, लॉजिस्टिकस अशा विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार्‍या फंडांमध्ये या फंडाची गुंतवणूक आहे. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे दरमहा Sector Rebalancing केले जाते. उदा. इन्फ्रास्टक्‍चर फंडात ऑगस्ट महिन्यात 51 टक्के गुंतवणूक होती, ती ऑक्टोबरमध्ये 22 टक्क्यांपर्यंत कमी केली गेली. तर ट्रान्स्पोर्टेशन आणि लॉजिस्टिक फंडामध्ये ऑगस्ट महिन्यात काहीही गुंतवणूक नव्हती, ती सप्टेंबरमध्ये 5 टक्के नवीन करून ऑक्टोबरमध्ये 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली.

या एका फंडामध्ये अनेक फंडांची वैशिष्ट्ये आपल्या दिसून येतील. बाजारामध्ये Opportunities fund असतात. विविध कारणांमुळे विविध सेक्टरर्समध्ये खरेदीच्या संधी उपलब्ध होतात. Opportunities फंड अशा वेळी योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्या संधीचा फायदा उठवतात. या फंडातही तुमच्या लक्षात येईल की, Floating Interest fund आणि Short Term Dept आणि Net current asset मध्ये ऑगस्टमध्ये जी गुंतवणूक 3 टक्के होती, ती ऑक्टोबरमध्ये 16 टक्के झाली. लिक्विड स्वरूपात रक्‍कम फंड मॅनेजरच्या हाताशी असेल तर बाजारात खरेदीच्या नवीन संधी साधता येतील.

Aggressive sector Rebalancing हे सर्वस्वी फंड मॅनेजरच्या कौशल्यावर आणि अभ्यासावर अवलंबून असते. या फंडाने स्थापनेपासून म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये साडे पंधरा टक्के असा अत्यंत आकर्षक परतावा दिला आहे. टॅक्सेशनच्या द‍ृष्टीने विचार केला, तर फंड ऑफ फंड्स हे डेट कॅटॅगरीमध्ये वर्गीकृत होतात. तेव्हा या फंडांमध्ये तुम्ही तीन वर्षे गुंतवणूक केली, तर तीन वर्षांनंतर तुम्हाला Indexation चा लाभ मिळेल.

तुम्हाला जर एकाच वेळी अनेक सेक्टर किंवा थिमॅटिक फंडांची लाभ उठवायचा असेल, तर या एका फंडामध्ये अवश्य गुंतवणूक करावी. पण आपला गुंतवणुकीचा द‍ृष्टिकोन किमान पाच वर्षांचा ठेवावा. आपली जोखीम क्षमता विचारात घ्यावी.

(लेखक अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.चे संचालक आहेत)
– भरत साळोखे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news