Stock Market | शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार, कोणते घटक महत्त्वाचे? | पुढारी

Stock Market | शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार, कोणते घटक महत्त्वाचे?

भरत साळोखे (संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.)

गतसप्ताहात निफ्टीने 0.84 टक्के व सेन्सेक्सने 0.81 टक्क्यांची वाढ नोंदवली. निफ्टी 22619 अंक वाढला, तर सेन्सेक्सने प्रथमच 74501.73 अंकांच्या विक्रमी सर्वोच्च पातळ्यांना म्हणजेच लाईफटाईम हायला स्पर्श केला. या वाढींमध्ये काही समभागांचा मोलाचा हातभार लागला. त्यात चौदाशेंच्या खाली गेलेल्या HDFC बँकेने आपल्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आणि बाजार, विशेषतः परदेशी ब्रोकरेज कंपन्या या निकालांवर बेहद्द खूश झाल्या. ( stock market )

संबंधित बातम्या 

Retail Deposits मध्ये वाढ आणि Corporate Credit मध्ये घट या दोन बाबी अनुक्रमे बँकेचा विस्तार वाढवल्यास आणि जोखीम कमी करण्यास निश्चितच हातभार लावणार्‍या आहेत. मॅक्वायरे मॉर्गन स्टॅन्ले, एचएसबीसी, नोमुरा या सर्व ब्रोक्रेज फर्म्सनी बँकेची Target Price
वाढवल्यामुळे शेअरमध्ये चांगली तेजी आली. अमेरिकन मार्केटमध्ये एचडीएफसी बँकेचा ADR सात टक्के तेजीत होता. त्यामुळे या आठवड्यात रिलायन्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हे निफ्टीचे प्रमुख भागीदार घसरलेले असतानाही एचडीएफसी बँकेच्या तेजीमुळे प्रमुख निर्देशांक तेजीत बंद झाले.

या व्यतिरिक्त आणखी एक आशादायक बाब म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये पुन्हा सुरू झालेली तेजी. गतसप्ताहात निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्स सात टक्क्यांनी वाढला. विशेष म्हणजे, बहुतेक सर्व म्युच्युअल फंडसनी स्मॉल आणि मिड कॅप फंड नवीन गुंतवणुकीसाठी बंद केलेले असताना ही तेजी दिसून येत आहे. मागील वर्षातील स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समधील अभूतपूर्व तेजीची भूरळ अद्यापही सामान्य गुंतवणूकदारांना पडलेली आहे.

पाच तारखेला जाहीर आलेले रिझर्व्ह बँकेने पतधोरण ही गतसप्ताहातील उल्लेखनीय घटना पाच विरुद्ध एक अशा बहुमताने रेपो रेट 6.5 टक्के म्हणजेच ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला. हा असाच निर्णय होणार हे बहुतेक सर्व तज्ज्ञ सांगत असतानाही महागाई आवाक्यात असताना आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर रेपो रेट कमी होईल अशी आशा शेअर बाजाराला होती. ‘महागाईचा हत्ती जंगलात परत गेला आहे’ या शब्दांत गव्हर्नरनी महागाई कमी झाल्याची कबुलीही दिली. जोडीला Economic Growth robust असल्याची ग्वाही दिली.

शासनाने 2024 साठी जीडीपीवाढीचा वाढवलेला अंदाज (7.6 टक्के) manufacturing PMI चौदा वर्षांच्या विक्रमी पातळीवर असणे Strong Services PMI आणि परकीय चलनाचा भरपूर साठा इतक्या सार्‍या जमेच्या बाबी असूनही रेपो रेट काही लाटेवर स्वार झालेल्या Real Estate Sector ला आणखी बळ मिळाले असते. या सगळ्यांमधून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दर कमी केल्याशिवाय रिझर्व्ह बँक व्याज दर कमी करणार नाही.

Ireda चा शेअर आठवड्यात साडे सव्वीस टक्क्यांनी वाढला (cmp रु. 176.40) पाचपैकी तीन दिवस तो Upper Circuit वर बंद झाला. अतिशय मजबूत कर्जपुरवठा आणि 24200 कोटींची प्रस्तावित भांडवल उभारणी या बातम्यांनी Ireda ला बळ दिले. 29 नोव्हेंबर 2023 रोजी हा शेअर रु. 50 या दराने बाजारात लिस्ट झाला. म्हणजे केवळ सहा महिन्यांच्या आत हा शेअर जवळपास चौपट झाला आहे.

KEC International hr RPG ग्रुपची एक अतिशय प्रथितयश कंपनी Engineering Procurement and Construction क्षेत्रांत ती काम करते. सर्व जगभर तिचा विस्तार असून आज 30 देशांमध्ये तिचे Projects सुरू आहेत. 2024 साठी मिळालेल्या प्रचंड ऑर्डर्सनी शेअरने या आठवड्यात रु. 838.85 चा सार्वजनिक उच्चांक नोंदवला. (CMP रु. 758.85)

TVS motors ने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट करून दिले आहेत. एक वर्षापूर्वी 1100 रुपये भाव असणार्‍या या शेअरचा आजचा भाव 2071 रुपये आहे. लक्षणीय Sales Growth दाखवल्यामुळे हा शेअर सातत्याने तेजी दाखवतो आहे. I-Qube
या तिच्या Electric Scooter चा मार्केट शेअर 19 टक्के आहे. Electric Two Wheelers च्या क्षेत्रात TVS motors आली तेव्हा Ola, Ather, Bajaj आदींच्या स्पर्धेत ती पाचव्या क्रमांकावर होती. आज तिचे स्थान या क्षेत्रात दुसर्‍या क्रमांकावर आहे. Gensot Engineering, ABFRL, Mankind Pharma या शेअर्सनीही गतसप्ताहात चांगली कामगिरी केली. (  stock market )

Back to top button