स्टेट बँकेने गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात 3622 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स) विक्री केली. माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती बँकेने दिली. गेल्या लोकसभेच्या वा विधानसभेच्या निवडणुकीत एक टक्क्यापेक्षा अधिक मते मिळवलेल्या राजकीय पक्षांनाच हे रोखे विकत घेण्याची मुभा आहे. या रोख्यांची मुदत 15 दिवसांची असते व तेवढ्या काळात एखाद्या बँकेच्या खात्यामार्फत हे रोखे वटवून घेण्याची परवानगी या पक्षांना असते.