अर्थभान : बीएस 6 मुळे जुनी वाहने होणार ‘डम्प्ड?’ | पुढारी

अर्थभान : बीएस 6 मुळे जुनी वाहने होणार ‘डम्प्ड?’

नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षात देशात भारत स्टेज 6 (बीएस 6 ) उत्सर्जन मानांकने लागू झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील बीएस 4 ची वाहने ‘डम्प्ड’ करावी लागतील, असे बजाज ऑटो कंपनीने नमूद केले आहे. पुणेस्थित या कंपनीच्या आर्थिक वर्ष 2018-19 चा वार्षिक अहवाल नुकताच जाहीर केला. त्यामध्ये  मोटारसायकल, तीन चाकी आणि क्वाड्रीसायकल्स 1 एप्रिल 2020 पासून बीएस 6 च्या नव्या मानांकनांप्रमाणे असतील. पण आमचे प्रतिस्पर्धीही यासाठी सज्ज आहेत का, याबाबत साशंकता आहे. मात्र आता बीएस 6 ची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

Back to top button