सेक्टरल फंड : आडवाटेचा फंड

Published on
Updated on

भरत साळोखे

सुरक्षिततेच्या द‍ृष्टिकोनातून पाहिले, तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड मानले जातात. सेक्टर फंडात गुंतवणुकीचा सल्‍ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्‍लागार तुम्हाला क्‍वचितच भेटेल.कोणतेही सेक्टर दीर्घकाळ तेजीमध्ये राहील, याची खात्री देता येत नाही…

इक्‍विटी फंडांच्या वर्गीकरणाचा विचार करत असताना सेबीने नवव्या क्रमांकावर दोन प्रकारच्या फंडांना एकाच वर्गवारीमध्ये समाविष्ट केले आहे. ते दोन फंड म्हणजे Sector Funds आणि Thematic Funds.  खरे पाहता हे दोन्ही फंड एकाच प्रकारचे आहेत, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु त्या दोहोंमध्ये मोठा फरक आहे. Sectoral Funds हे एकाच Sector मध्ये गुंतवणूक करतात, तर Thematic Funds हे एका Theme ला  अनुसरून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामध्ये एकापेक्षा अनेक Sector चा  अंतर्भाव होऊ शकतो. कसे ते आपण पुढे पाहूच!

सेबीच्या बंधनानुसार Sectoral Fund मधील किमान 80 टक्के गुंतवणूक ही त्या Sector शी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्येच झाली पाहिजे. शिवाय कोणत्या सेक्टरवर आधारित तो फंड आहे, याचाही स्पष्ट निर्देश फंड बाजारात येण्यापूर्वी करणे अनिवार्य आहे.

भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जवळपास 40 सेक्टर्स आहेत. परंतु अगदी प्रमुख सेक्टर्सचाच विचार करायचा तर ती खालीलप्रमाणे आहेत.

1) बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स

2) मेटल्स

3) ऑटोमोबाईल्स

4) फार्मा, हेल्थकेअर

5) एफएमसीजी

6) आय.टी.

7) इन्फ्रा अ‍ॅण्ड रिअ‍ॅल्टी

8) सिमेंट

9) कन्झ्युमर ड्युरेबल्स

10) अ‍ॅग्री

सर्व अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्या वेळोवेळी वेगवेगळे सेक्टरल फंड सुरू करीत असतात. कोणतेही सेक्टर हे 'सदाबहार' नसते. शासनाच्या नियोजनातील फेरबदल, बाजाराची स्थिती, ग्राहकांचा कल, काही असंभाव्य गोष्टी या सर्वांमुळे सर्व सेक्टर्स खालीवर होत राहतात. अलीकडेच उदाहरण घ्यायचे, तर अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून IT सेक्टर हे दोलायमान राहिलेले आहे. भारतातील बहुतेक आघाडीच्या आय.टी. कंपन्यांचा Income  Source हा प्रामुख्याने अमेरिकाच आहे. आणि ट्रम्प यांचा out sourcing आणि H1B visa यांविषयीचा द‍ृष्टिकोन काहीसा प्रतिकूल असल्यामुळे  भारतातील आयटी सेक्टरही खालीवर होत आलेले आहे.

सुरक्षिततेच्या द‍ृष्टिकोनातून पाहिले, तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड मानले जातात. सेक्टर फंडात गुंतवणुकीचा सल्‍ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्‍लागार तुम्हाला क्‍वचितच भेटेल. याचे कारण शेअर मार्केटमधील किंवा म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीच्या यशाचे मर्म म्हणून ज्या दोन गोष्टी सांगितल्या जातात; त्या म्हणजे Stay Longterm (दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा) आणि Follow a Systematic Investment way (दरमहा नियमित गुंतवणूक करा) या दोन्ही गोष्टी आदर्श असल्या तरी सेक्टर फंडामध्ये गुंतवणूक करताना त्या आजिबात कामी येत नाहीत. कारण कोणतेही सेक्टर दीर्घकाळ तेजीमध्ये राहील, याची खात्री देता येत नाही. इ. स. 2009 ते 2015 ही सात वर्षे औषध कंपन्यांच्या भरभराटीचा काळ होता. 2009 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी फार्मा फंडामध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 2015 अखेर 35 टक्के परतावा मिळाला. म्हणजे सात वर्षात त्यांची सातपट गुंतवणूक झाली. परंतु त्यानंतर आजअखेर हे सेक्टर Under Perform करते आहे.

वरील विवेचनातून आपल्या  लक्षात आले असेलच, की सामान्य गुंतवणूकदारांनी या फंडामध्ये गुंतवणूक करू नये. म्युच्युअल फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य जे Diversification त्यालाच या सेक्टर फंडामध्ये फाटा दिला जात असल्यामुळे ते अतिजोखमीचे असतात. आर्थिक सुबत्ता असणार्‍या आणि थोडी जास्तच जोखीम घेऊ शकणार्‍या गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा अल्पसा हिस्सा (कमाल 10 टक्के) सेक्टर फंडामध्ये गुंतवावा. त्यापूर्वी खालील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. 

1) तुम्हाला माहिती असलेल्या सेक्टरची निवड करावी.

2) यात भरपूर जोखीम आहे, याची नोंद घ्यावी.

3) SIP चा अवलंब न करता  एकरकमी गुंतवणूक करावी. 

4) बाजाराची आणि गुंतवणूक केलेल्या सेक्टरची अद्ययावत माहिती घेत रहावे.

5) अपेक्षित परतावा मिळाला की रक्‍कम काढून द्यावी.

सेक्टर फंड हा विषय थोडा क्लिष्ट असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या सल्‍लागाराचा सल्‍ला घेऊनच यामध्ये गुंतवणूक करावी. सध्या भारतात खालीलप्रमाणे प्रमुख सेक्टर फंड आहेत.

 







अ. क्र.    फंडाचे नाव  सेक्टर

 
 1.  आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंड  बँकिंग अ‍ॅण्ड फाई. सर्व्हिसेस

 
 2.  एल अ‍ॅण्ड टी इन्फास्ट्रक्‍चर फंड  इन्फास्ट्रक्‍चर 
 3.  निप्पान इंडिया फार्मा फंड  फार्मा
 4.  आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्‍चर फंड  इन्फ्रास्ट्रक्‍चर
 5.  युटीआय ट्रान्स्पोर्टेशन अ‍ॅण्ड लॉजिस्टीक फंड  ट्रान्सस्पोर्टेशन 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news