दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी… | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या शुक्रवारी 23 एप्रिल रोजी सुरुवातीला निर्देशांक 47,800 वर होता, तर निफ्टी 14,350 च्या आसपास होता. काही शेअर्सचे भाव पुढीलप्रमाणे होते.

हेग 2036 रुपये, ओएनजीसी 102 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 147 रुपये, मन्‍नापुरम फायनान्स 144 रुपये, बजाज फायनान्स 4635 रुपये, फिलिप कार्बन 204 रुपये (यावेळचा चकाकता हिरा म्हणून त्याबद्दल पुढे जास्त माहिती दिली आहे.) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 87 रुपये, अशोक बिल्डकॉन 84 रुपये, जे कुमार इन्फ्रा 181 रुपये, रेप्को होम्स 314 रुपये, मुथुट फायनान्स 1150 रुपये, केईआय इंडस्ट्रीज 497 रुपये, लार्सेन अँड ट्रुब्रो 3973 रुपये, भारत पेट्रोलियम 417 रुपये, इंडिया बुल्स हाऊसिंग 175 रुपये, चेन्‍नई पेट्रो 98 रुपये, महाराष्ट्र बँक 22 रुपये, स्टील स्ट्रीप्स 661 रुपये, पीएनबी हाऊसिंग 362 रुपये.

वरील सर्व शेअर्समध्ये वर्षभरात दीर्घकालीन किमान 20 टक्के भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणार्‍यांसाठी वरील शेअर्स नफा देणारे ठरतील. पोलादचे शेअर्स जसजसे वर जातील तसतसे ग्राफाईट इंडिया व हेग हे शेअर्सही वर जातील. या दोन्ही शेअर्सबद्दल पूर्वीच्या लेखात माहिती दिलेली आहे. ती अवश्य बघावी.

अर्थव्यवस्थेला भरती येत असते त्या वेळी क्रेडिट व डेबिट कार्डाचा उपयोग करून शेअर घेणे लाभदायक ठरत असते. त्यामुळे या दोन्हीही कार्डांची मुदत पुढील दोन वर्षे तरी असायला हवी. एचडीएफसी बँकेला मात्र रिझर्व्ह बँकेने या कार्डाची संख्या वाढवू नये, असे ध्वनित केले  आहे. त्याचा फायदा आयसीआयसीआय बँकेला होत आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये बँकेच्या क्रेडिट कार्डाच्या संख्येत वाढ झाली आहे. बँकेने जानेवारी 2021 पर्यंत कार्डाच्या संख्येत वाढ झाल्यामुळे बँकेच्या क्रेडिट कार्डात 1 कोटी कार्डांची भर पडली आहे. आयसीआयसीआय बँकेनंतर दुसर्‍या क्रमांकावर एसबीआय कार्ड आहे. डिसेंबर 2020 मध्ये या कार्डांची संख्या 1.14 कोटी होती. एसबीआय कार्डानंतर तिसर्‍या क्रमांकावर अ‍ॅक्सिस बँक आहे. त्यांची वितरित क्रेडिट कार्डांची संख्या 69 लाखांच्या आसपास आहे. मात्र अमेरिका, जपान व युरोपियन राष्ट्रे यांच्या संदर्भात आपल्याकडील क्रेडिट कार्डांची संख्या कमीच आहे. अमेरिकेत दर कुटुंबात किमान दोन कार्डे तरी असतात. अमेरिकेत कार्ड तर प्रत्येक कुटुंबात निदान दोघांकडे तरी असते. या कार्डाद्वारे अनेक जण शाळा व कॉलेजस्ची फीही भरतात. कारण एका डॉलरला एक युनिट इतके सैल त्यांना वापरासाठी मिळतात. त्याचा उपयोग परदेशी प्रवासासाठीही होतो.

आपल्या देशात म्युच्युअल फंड्स जास्त लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडील व्यवस्थापनाखाली असलेल्या जिंदगीचा आकडा 32 लाख कोटी रुपयांच्या वर आहे. तरीही हे फंड बहुतांशी तोट्यातच आहेत. तरीही त्यापैकी 5 फंड वार्षिक 3600 कोटी रुपयांचा नफा मिळवतात. व्यवस्थापनाखालील जिंदगीचा विचार करता अव्वल स्थानावर एसबीआय म्युच्युअल फंड तिसर्‍या स्थानावर आहे. सध्या 43 म्युच्युअल फंड्स आहेत.

म्युच्युअल फंडापैकी अग्रस्थानी असलेल्या बिर्ला म्युच्युअल फंडाची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) लवकरच होणार आहे. ही कंपनी आदित्य बिर्ला सनलाईफ ही असणार आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यंदाच्या तिच्या विमा हप्त्यात नवीन धारकांकडून 1.84 लाख कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला आहे. त्याचवेळी अस्तित्वात असलेल्या विमाधारकांना महामंडळाने 1.34 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत. या वर्षात नवीन 2 कोटी पॉलिसींची विक्री झाली.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news