गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रमाणात दुप्पट वाढ

गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रमाणात दुप्पट वाढ
Published on
Updated on

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे सध्या मानसिक आजाराचे प्रमाण फार वाढले आहे. एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की मानसिक आजार, न्यूरोसायकियाट्रिक अपंगत्व आणि सिगारेट, दारू तसेच इतर नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा (कॅन्सर) धोका दुपटीने वाढला आहे.

गर्भाशयांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. जगभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने महिलांचा मृत्यू होतो. अशा वेळी स्मीअर चाचणी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्याचा एक चांगला मार्ग आहे. ही चाचणी केल्याने कॅन्सर जडला आहे की नाही ते सहज कळते; मात्र अनेक स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात.

'द लॅन्सेट पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, १९४० ते १९९५ दरम्यान जन्मलेल्या चार कोटींहून अधिक महिलांचा समावेश या संशोधनात करण्यात आला होता. संशोधकांनी मानसिक आजार, न्यूरोसायकियाट्रिक अपंगत्व आणि ज्यांची चाचणी झाली नाही अशा पदार्थांचा वापर यांची नियमितपणे चाचणी घेतलेल्या स्त्रियांशी तुलना केली. या संशोधनात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

'कॅरोलिएका इन्स्टिट्यूट'च्या या संशोधनात आढळून आले आहे की, अमली पदार्थ, दारू, सिगारेट, ड्रग्ज यांचे नियमित सेवन करणाऱ्या महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचा धोका वेगाने वाढतो. अधिकतर महिला या ड्रग्जचे सेवन केल्याने या आजाराच्या बळी ठरल्या आहेत, असेही दिसून आले आहे. त्यामुळे महिलांनी या पदार्थांचे मर्यादित सेवन केले तसेच मानसिक तणाव घेतला नाही तर कदाचित त्यांचा हा आजार होण्यापासून बचावही होऊ शकतो.

'कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेतील औषध विभागातील वरिष्ठ संशोधक म्हणतात की, महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग होऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येक महिलेने नियमित चाचणी करणे गरजेचे आहे. कारण, यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होईल. मासिक पाळीदरम्यान जोरदार रक्तस्राव, पोटदुखी, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव, योनीतून स्राव, लघवी करताना अस्वस्थता ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news