

शरीराच्या अंतर्गत भागात निर्माण झालेली समस्या आपली लक्षणे शरीराच्या बाहेर दर्शवतेच. ही लक्षणे ओळखून वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. वेळेवर मदत न मिळाल्यास विकारात वाढ होऊ शकते. एंजिओएडेमा या विकारात अंतत्वचेला सूज येते. ही सूज पित्ताने उठणार्या फोडांसारखी दिसत असली तरी ती वेगळी असते. कारण, पित्त उठते तेव्हा त्वचेच्या वरच्या बाजूला सूज येते. अनेक रुग्णांमध्ये पित्त आणि एंजिओएडेमा या दोन्ही परिस्थिती एकाच वेळी आढळून येतात. एंजिओएडेमाची समस्या अॅलर्जिक प्रतिक्रियेमुळे होऊ शकते. या प्रतिक्रियेमुळे हिस्टेमाईन तसेच इतर रसायने शरीरातील रक्तापर्यंत पोहोचतात. शरीरातील प्रतिकार शक्ती जेव्हा एखाद्या अॅलर्जीशी सामना करत असते तेव्हा हिस्टेमाईन शरीरात स्रवतात.
अर्थात, यामागची कारणे समजू शकली नसली तरीही प्राण्यांच्या त्वचेवर आलेले पुरळ, पाणी, सूर्यप्रकाश किंवा तीव— सूर्यकिरणे यांच्या संपर्कात आल्याने काही विशेष पदार्थ जसे अंडी, मासे, दूध, बेरीज यांचे सेवन, हवेतील परागकण, एखाद्या औषधाचे सेवन किंवा किड्यांचा दंश यामुळेही एंजिओएडेमा ही समस्या निर्माण होऊ शकते.
या त्रासाचे मुख्य लक्षण आहे ते
म्हणजे त्वचेच्या आत येणारी सूज
विशेषतः ओठ, डोळे यांच्या जवळपास, हात, पाय आणि गळ्यावरही ही सूज दिसू शकते. ही सूज पसरू शकते आणि तिथे वेदना होऊ शकतात. शिवाय खाजही येऊ शकते. त्याशिवायही इतर काही लक्षणे दिसतात-
पोटामध्ये तीव— वेदना होणे
श्वास घेण्यास त्रास
सूजलेले तोंड
ही लक्षणे तीव— होऊ लागली तर वैद्यकीय मदत तातडीने घेतली पाहिजे. एंजिओएडेमावर उपचार करूनही
सुधारणा दिसत नसेल, सूज खूप जास्त वाढली किंवा वेदना आणि त्रास असह्य होत असल्यास श्वास घेण्यात अडचणी येणे, चक्कर आणि बेशुद्धी सारखी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.
या विकाराबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, गंभीर स्थिती निर्माण झाल्यास तातडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या त्रासामुळे जर काही अॅलर्जिक रिअॅक्शन निर्माण झाली तर बर्याचदा अॅड्रिनिलचे इंजेक्शन रुग्णाला दिले जाते. मात्र, आनुवंशिक आजार असेल तर मात्र हे इंजेक्शन प्रभावी ठरू शकत नाही. अशा वेळी इतर उपाय केले जातात.
एंजिओएडेमाची ही समस्या शरीरात कोणत्याही प्रकारचा तरल पदार्थ साठल्यामुळे निर्माण झाली तर तीअधिक गंभीर होते. अशा वेळी अॅलर्जीचे स्रोत असलेल्या गोष्टींपासून लांब राहणे ईष्ट ठरते. एंजिओएडेमा या विकारात अंतत्वचेला सूज येते. ही सूज पित्ताने उठणार्या फोडांसारखी दिसत असली तरी ती वेगळी असते. पित्त उठते तेव्हा त्वचेच्या वरच्या बाजूला सूज येते.
महेश बरामदे