Gen Z Drinking Habits | मद्यपान नकोच! जनरेशन Z चा नवा फिटनेस मंत्र सोशल मीडियावर व्हायरल

Gen Z Drinking Habits | तरुणाईचा नवा ट्रेंड: मद्यपानाला रामराम, आरोग्यदायी लाइफस्टाइलला पसंती
Gen Z Drinking Habits
Gen Z Drinking HabitsCanva
Published on
Updated on

Gen Z Drinking Habits

आजची तरुण पिढी म्हणजेच मिलेनियल्स आणि जनरेशन Z आता आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागली आहे. पार्टी असो किंवा गेट-टुगेदर, आता हे लोक अल्कोहोलऐवजी नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा लो-अल्कोहोल मॉकटेल्स पिण्याकडे जास्त कल दाखवत आहेत.

निल्सेनIQच्या एका सर्व्हेनुसार, भारतातील ३४% ग्राहक आता पूर्णपणे अल्कोहोल न पिण्याचा किंवा कमी अल्कोहोल घेण्याचा पर्याय निवडतात. हा आकडा जगातील सरासरीपेक्षा दुप्पट आहे. यातील निम्म्याहून अधिक लोक हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत.

Gen Z Drinking Habits
Star Health Insurance News | स्टार हेल्थच्या ग्राहकांवर मोठा परिणाम, 22 सप्टेंबरपासून कॅशलेस सुविधा बंद होणार का? जाणून घ्या सविस्तर

भारतीय तरुणाईचा बदलता ट्रेड, आरोग्य प्रथम!

तरुणाई आता फिटनेस, हेल्दी आहार आणि मेंटल हेल्थवर जास्त लक्ष देते आहे. त्यामुळे मद्यपान कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. यामुळे झोप नीट होते, शरीरावर वाईट परिणाम होत नाही आणि दुसऱ्या दिवशी कामात अडथळा येत नाही.

आकडेवारी सांगते…

  • भारतातील ५४% लोक म्हणतात की त्यांना अल्कोहोल नको किंवा अगदी थोडे चालेल.

  • उत्तर भारतात हा आकडा ५४%, पश्चिम भारतात ४३% आणि दक्षिणेत ३७% आहे.

  • १८ ते ३४ वयोगटातील तब्बल ५३% लोकांनी मद्यपान कमी केले आहे.

  • ५५ वर्षांवरील लोकांमध्ये हा आकडा फक्त १३% आहे.

Gen Z Drinking Habits
Why Planes Are White | विमानांना पांढराच रंग का दिला जातो? कारण जाणून व्हाल थक्क!

मॉकटेल्स आणि हेल्दी ड्रिंक्सला मागणी

तरुण पिढी आता रंगीत, चविष्ट आणि हेल्दी मॉकटेल्स पसंत करते. नॉन-अल्कोहोलिक बिअर, ज्यूस बेस्ड कॉकटेल्स, फ्लेवर्ड सोडा हे नवीन पर्याय लोकप्रिय होत आहेत.

या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या नवीन फ्लेवर्स, झिरो अल्कोहोल बिअर, हेल्दी मॉकटेल्स मार्केटमध्ये आणत आहेत. यामुळे फूड आणि ड्रिंक इंडस्ट्रीत नवा बिझनेस निर्माण झाला आहे.

सामाजिक फायदा

मद्यपान कमी झाल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम कमी होतात, अपघाताचे प्रमाण घटते आणि घरातील वातावरणही शांत राहते.

तरुणाई आता केवळ मजेसाठी नाही तर स्वतःच्या आरोग्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. मॉकटेल्स आणि नॉन-अल्कोहोलिक पेये आता पार्टीमध्ये नवा ट्रेंड बनले आहेत. भविष्यात हा ट्रेंड अजून वाढेल असे तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news