

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेंशन ही आजाराची समस्या आजच्या धावपळीच्या युगात झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे ३०% लोकसंख्येला हाय बीपीचा त्रास आहे. विशेष म्हणजे, अनेकांना हा आजार झालेला असतो तरीही त्याची जाणीव होत नाही.
ही स्थिती गंभीर झाल्यावरच तपासणीतून निदान होते की रुग्ण बराच काळ हायपरटेंशनचा सामना करत होता. सुरुवातीस काही लक्षणं दिसत असली तरी ती दुर्लक्षित केली जातात. यामुळे पुढे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर यांसारखे प्राणघातक धोके निर्माण होऊ शकतात.
सामान्यतः एखाद्या व्यक्तीचा बीपी 120/80 असणे अपेक्षित आहे. जर हा 130/80 च्या पुढे गेला, तर तो वाढलेला मानला जातो. ही स्थिती वेळेवर ओळखून उपचार सुरू करणे आवश्यक असते.
सुरुवातीला बीपी थोडा वाढतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास तो हळूहळू गंभीर होतो.
त्यामागची मुख्य कारणं म्हणजे
थकवा, झोपेचा अभाव
मद्यपान व धूम्रपान
जास्त चरबीयुक्त आहार
स्थूलता (ओबेसिटी)
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे
हाय बीपीमुळे होणारे धोके:
या आजारात सुरुवातीस कोणतेही लक्षण दिसत नाही. परंतु, जेव्हा बीपी खूप वाढतो तेव्हा
डोकेदुखी,
चक्कर येणे,
धूसर दिसणे,
नाकातून रक्त येणे,
जबड्यात वेदना
ही गंभीर लक्षणं दिसू लागतात. यामुळे किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुसे यांच्यावर विपरीत परिणाम होतो. काही वेळेस मल्टी ऑर्गन फेल्युअर होण्याचीही शक्यता असते.
सुरुवातीलाच उपचार सुरू केल्यास हायपरटेंशनपासून होणारे धोके कमी करता येतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास आर्टरी तपासून घ्याव्यात.
जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.
मद्यपान आणि धूम्रपान बंद करणे
संतुलित आहार घेणे
नियमित व्यायाम
पूर्ण झोप घेणे
सखोल वैद्यकीय तपासणी
स्ट्रेस मॅनेजमेंट
या सवयी स्वीकारल्यास हाय बीपी नियंत्रित करता येतो.