Garlic Pickle Recipe | हिवाळ्यात लसुण लोणचे खाण्याचे जबरदस्त फायदे; वाढेल शरीराची ऊब! जाणून घ्या सोपी रेसिपी

Garlic Pickle Recipe | हिवाळ्याच्या दिवसात गरमागरम जेवणासोबत एखादं चविष्ट लोणचं मिळालं की संपूर्ण थाळीच उठून दिसते.
Garlic Pickle Recipe
Garlic Pickle Recipe
Published on
Updated on

हिवाळ्याच्या दिवसात गरमागरम जेवणासोबत एखादं चविष्ट लोणचं मिळालं की संपूर्ण थाळीच उठून दिसते. अशाच लोकप्रिय आणि आरोग्यासाठी अत्यंत सकस मानल्या जाणाऱ्या लोणच्यांपैकी एक म्हणजे लसूणाचे लोणचे. भारतीय मसाल्यांचा सुगंध, सरसोंच्या तेलाची चव आणि लसणीतील औषधी गुण एकत्र आल्यावर तयार होणारं हे लोणचं शरीराला उब तर देतेच, पण अनेक आजारांपासूनही संरक्षण करतं.

Garlic Pickle Recipe
Winter Health Tips | हिवाळ्यात बदाम-अंजीरचे सेवन ठरते लाभदायक

दर्जेदार लसणीच्या सोललेल्या पाकळ्या सरसोंचं तेल, राई, मेथीदाणे, हळद, लाल तिखट, मीठ आणि हिंग यांच्या मिश्रणात मुरवून हे लोणचे तयार केलं जातं. ५ ते ७ दिवस लोणचे उन्हात ठेवल्यास त्यातील मसाले पूर्णपणे मिसळतात आणि लोणच्याला एकदम रसाळ, परिपक्व चव येते. एकदा चांगलं मुरल्यावर हे लोणचं अनेक महिने खराब न होता सुरक्षित राहू शकतं.

लसूणाच्या लोणच्याचे आरोग्यदायी फायदे

लसूणात नैसर्गिकरित्या एंटीबॅक्टेरियल व एंटीव्हायरल गुण असतात. त्यामुळे हिवाळ्यात होणारी सर्दी-जुकाम, खोकला आणि संसर्गापासून शरीराचं संरक्षण होतं. नियमित सेवन केल्यास इम्युनिटी वाढते आणि शरीर अधिक ऊर्जावान राहते.

लसूण हृदयासाठीही अतिशय हितावह मानला जातो. हे लोणचं रोज थोड्या प्रमाणात खाल्ल्यास वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय लसूण पचनशक्ती वाढवतो, सूज कमी करतो आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतो.

Garlic Pickle Recipe
WHO चा अलर्ट! हे 7 पदार्थ हृदयासाठी अतिशय घातक; आत्ताच सावध व्हा

लसूणाचे लोणचे बनवण्याची सोपी घरगुती रेसिपी

  • सोललेल्या लसणीच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरड्या करून घ्या.

  • कढईत सरसोंचे तेल गरम करून थंड होऊ द्या.

  • त्यात राई, मेथीदाणे, हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ मिसळा.

  • आता या मसाल्यात लसणीच्या पाकळ्या घालून नीट हलवा.

  • काचेच्या बरणीत भरून ५–७ दिवस उन्हात ठेवा.

  • मसाले मुरले की लोणचे तयार!

हे लोणचं फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर हिवाळ्यात शरीराला आतून ऊबही देते. चव आणि आरोग्य दोन्हीचा परफेक्ट संगम म्हणजे लसूणाचे लोणचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news