सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी प्यावे
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
हवामानातील थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांचा प्रसार आपल्या शरीरावर होत असतो. धावपळीच्या युगात आपले आरोग्य फिट आणि चांगले राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे. या उपायाने मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत होत असते. तसेच विविध जीवघेण्या आजारावर ही मीठ पाणी उपयुक्त ठरत आहे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात एक छोटा चमचा काळे मीठ घालून ते विरघळल्यानंतर प्यावे. हे पाणी गुणकारी पेय आहे. त्यामुळेच मिठ पाण्याचे फायदे जाणून घेऊयात…
१) मिठात खनिजे असतात
मीठ पाण्यात अनेक खनिजे असल्याने हे मीठ पाणी आपल्या शरीरास हानिकारक असणाऱ्या जीवाणूविरोधात काम करत असते. यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. काळ्या मिठात ८० पेक्षा जास्त खनिजे असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.
२) मधुमेह आणि स्थूलपणा कमी होतो
मीठ पाण्यामुळे आपल्या शरीरातील स्थूलपणा व मधुमेह कमी करण्यास मदत होते. फक्त मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. मीठ पाण्याने वजन कमी होवून मधुमेह कमी होण्यास मदत होते.
३) वजन कमी होते
काळे मीठ कोमट पाण्यात घालून प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी घटल्याने शरीराचा स्थूलपणा कमी होतो. त्यामुळे वजन कमी होते.
४) शरीरातील पचन संस्था मजबूत करते
मीठ पाण्यामुळे तोंडातील लाळ निर्मिती करणार्या ग्रंथी अधिक कार्यरत होत असतात. त्यामुळे एन्झाईम्स (नैसर्गिक मीठ), हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि प्रथिने पोटातील अन्न पचवण्याचे कार्य करत असतात. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्न पचवण्यास एन्झाईम्स निर्माण करत असते.
५) हाडे आणि स्नायू मजबूत करते
काळे मीठ आणि कोमट पाण्यात मिसळून रोज प्यायल्यास शरीरातील पोटॅशिअम कमी होते. त्यामुळे स्नायू मजबूत होऊन चांगले आरोग्य लाभते. वाढत्या वयोमानानुसार शरीरातील खनिजे आणि कॅल्शिअमचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हाडे कमकुवत होऊन दुखू लागतात. रोज नियमित सकाळी मीठ पाणी पिल्याने हाडांना खनिजांची पूर्तता होऊन हाडे मजबूत होतात.
६) त्वचा उजळू लागते
मीठ पाणी पिल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. या पाण्याने त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूमे, काळे डाग अशा समस्या दूर होतात. मिठाच्या पाण्यात क्रेमिया असल्यामुळे त्वचा रोगांशी लढून त्वचा उजळण्यास मदत होते.
७) पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते
मीठ पाण्याने शरीराला पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होत असतो. यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होऊन त्वेचेची लवचिकता वाढण्यास ही मदत होते. त्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होत असते.
८) झोप लागण्यास मदत होते
मीठ पाण्यामुळे शरीरातील रक्तात कार्टिसोल, अॅड्रिनल वाढण्यास मदत होते. ही सर्व हार्मोन्स तणावाशी निगडित आहेत. ह्या हार्मोन्सचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास झोप चांगली लागते. अनिद्रेची समस्या असल्यास काळे मीठ घातलेले पाणी प्यावे.
९) डिटॉक्सिफिकेशन
काळे मीठ पाण्यात डिटॉक्सिफिकेशन असल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास उपयुक्त ठरत असते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडल्याने अवयवांना नुकसान पोहचत नाही.
