लॅप्रोस्कोपीक अर्थात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे काय? ती कधी आणि का केली जाते?

हर्निया, अॅपेंडिस म्हणजे काय? उपचारासाठी लॅप्रोस्कोपीचा वापर कसा होतो?
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे काय? - डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे
लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे काय? - डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे
Published on
Updated on

डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे, स्वरूप लेझर व लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल. विटा (जि. सांगली)

संपर्क : मोबाईल - 9421139298, Email - swaroophospitalvita@gmail.com, www.swaroophospitalvita.com

लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यांसाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी त्रासाची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने पोटातील अवयवासंबंधी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. लॅप्रोस्कोपीचा शोध लागण्यापूर्वी पोट उघडून शस्त्रक्रिया कराव्या लागत होत्या. त्यामुळे रुग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. तसेच त्यातल्या जखमा आकाराने मोठ्या व खोल असल्याने त्या भरुन यायला वेळ लागायचा, तसेच काही वेळा पू होणे, संसर्ग (इन्फेक्शन) याचा धोका राहायचा त्यामुळे रुग्णालयात जास्त दिवस रहावे लागत होते. पण आता लॅप्रोस्कोपीक तंत्रज्ञानामुळे खूप फरक पडला आहे. लॅप्रोस्कोपीक (दुर्बिणीद्वारे) शस्त्रक्रियेमुळे पोटावरील त्वचेस कमी छेद करावा लागत असल्याने वेदना कमी होतात. रुग्ण लवकर घरी जाऊन काही दिवसांतच आपले दैनंदिन कामकाज सुरू करू शकतो.

लॅप्रोस्कोपी ही पोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ही अतिशय कमी जोखमीची तसेच कमीत कमी टाक्यांची प्रक्रिया आहे. शरीरावर मोठे छेद न करता केवळ दोन ते तीन छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. हे छेद तीन ते चार मिलीमीटरचे असतात. लॅप्रोस्कोप हा एक लांब आणि पातळ नलिकेसारखा असतो. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि उच्च-रिझोल्युशन असलेला कॅमेरा असतो. जो पोटातील अवयवाचे प्रतिबिंब १५ ते २० पट मोठे करून दाखवण्याचे काम करतो. पोटावर लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटामध्ये ५ मी. मी. आकाराच्या छोट्या नळीतून घातली जातात. या साधनांच्या आणि पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात. लॅपरोस्कोपीमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातील अवयवांची खुली शस्त्रक्रिया न करताही प्रत्यक्ष तपासणी करता येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्या डॉक्टरांना बायोप्सी (अवयामधील तपासणी आवश्यक असलेल्या भागाचा तुकडा घेणे) नमुने देखील घेता येतात.

Dr. Shivprasad Mhetre and Shrutika Mhetre
डॉ. शिवप्रसाद आणि डॉ. श्रृतिका म्हेत्रे यांनी विट्यात लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध केली आहे.

लॅप्रोस्कोपी का केली जाते?

लॅप्रोस्कोपी बहुतेक वेळा पोटातील अवयवाची आतून तपासणी करून तो अवयव किंवा त्या अवयवाचा अनावश्यक भाग काढण्यासाठी केली जाते किंवा ओटीपोटातील वेदनांचा स्रोत ओळखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी वापरली जाते.

नॉन-इन्व्हेसिव्ह - पोटाबाहेरून तपासणी करावयाच्या पद्धती जेव्हा निदान करण्यास अक्षम असतात तेव्हा लॅप्रोस्कोपीच्या मदतीने तपासणी महत्वाची ठरते.

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कधी केली जाते?

जगभरात सध्या रुग्णावर उपचार करण्यासाठी लॅप्रोस्कोपीक तंत्राचा वापर केला जातो. लॅप्रोस्कोपीक प्रक्रियेद्वारे आता अपेंडिसची शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इन्गायनल हर्निया, हिपेटोबिलरी, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा आजार, स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया गर्भाशयाचे विकार संबंधी शस्त्र केल्या जातात शिवाय कोलोरेक्टल कॅन्सर, जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर यांसारख्या इतर अवयवांवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पटकन आराम मिळू शकतो. परंतु प्रत्येक रुग्णाचा आजार व वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊन लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे
डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया कशी केली जाते?

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया ही सामान्य भूल देऊन केली जाते. पोटाला ५ ते १० मिलीमीटरचा छेद घेवून पोटामध्ये कॅमेरा घातला जातो. त्यानंतर पोटामध्ये कार्बनडाय ऑक्साईड गॅस आवश्यक प्रेशरमध्ये पंप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनव्दारे नळीतून टाकली जाते. ज्यामुळे पोटामध्ये पोकळी निर्माण होवून

आतील अवयव स्पष्ट दिसतात तसेच कॅमेरा मार्फत पोटातील दृश्य पाहण्यास डॉक्टरांना मदत मिळते व ऑपरेशन सुलभ होते. ही यंत्रणा येण्यापूर्वी शस्त्रकियेसाठी पोटावर ६ ते १२ इंच लांब कट करावे लागत असे पण लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेमध्ये ३ ते ४ लहान छेद ५ मी मी आकाराचे असतात म्हणून यास की होल सर्जरी (Key hole surgery) असे म्हटले जाते.

लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेचे काही फायदे

  • शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा रक्तस्त्राव कमी होतो.

  • पोटाच्या भिंतीचे (Abdominal wall) कार्य अधिक चांगले होते.

  • आतड्यांचे कार्य योग्यपद्धतीने चालते.

  • शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना जाणवतात.

  • जखम लवकर भरुन येते.

  • शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात जास्त दिवस राहण्याची गरज भासत नाही.

  • रुग्णाच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होऊन तो दैनंदिन काम करु शकतो.

  • ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी असते.

  • कमीत कमी छेद असल्याने हर्निया विकार होणे टाळले जाते.

  • काही वेळा पोटातील अवयवातील गुंतागुंत बाह्य तपासणीतून न दिसणारी असल्यास निदान करण्यासाठी लॅप्रोस्कोपी केली जाते.

लॅप्रोस्कोपी शस्त्रकियेनंतर रिकव्हरी

रूग्ण शस्त्रकियेसाठी आवश्यक भूल प्रकियेतून बाहेर आल्यावर काही रूग्णाना थोडा त्रास होवू शकतो. काही अंशी खांद्यांवर वेदना होवू शकतात. शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीतच कमी होतात आणि वेदना राहत नाहीत. सामान्यता शस्त्रकियेच्या दुसऱ्या दिवशी पेशंटला हालचाली करण्यास सांगितले जाते. अल्प अशा पट्टीसह दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला जातो.

Swarup Hospital Vita
स्वरूप लेझर व लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल विटा ( जि. सांगली)

लॅप्रोस्कोपी कोणत्या रूग्णासाठी उपयुक्त ठरते?

अपेंडिसायटीस आन्त्रपुच्छशोथ

कोलीलिथॉसिस पित्तपिशवी मधील खडे असणे.

स्वादुपिंडाचे विकार

फॅब्रॉइड युटेरस, गर्भाशयाचे विकार, गर्भाशयाच्या गाठी होणे, स्त्री बीजभोवती गाठी होणे.

हर्निया विकार म्हणजेच आन्त्रवृद्धी होणे

अपेंडिसबाबतची माहिती

अपेडिंसला मराठी भाषेत आन्त्रपुच्छशोथ असे म्हटले जाते. नावाप्रमाणेच तो मानवाच्या पोटातील मोठ्या आतड्याचा एक भाग असतो. आकाराने साधारणतः करंगळी सदृश्य असा जन्मताच सर्वाच्या शरीरात अनावश्यक अवयव असतो. लहान आतड्यातील मल मोठ्या आतड्यात जाताना काही अंशी मल अपेंडिसच्या पोकळीमध्ये अडकतो व जंतूसंसर्ग होतो. अशा वेळी अपेंडिसला सुज येते. पोटात दुखणे, उलटी मळमळ व ताप येणे ही लक्षणे दिसतात. त्यावेळी पोटाची सोनेग्राफी केल्यास अपेंडीसायटीसचे निदान होते अशा परिस्थितीत रूग्णास त्वरीत उपचार करावा लागतो. बऱ्याच वेळा अपेंडिस काढून टाकण्याची शस्त्र क्रिया करावी लागते. त्यास अपेंडिसेकटॉमी म्हटले जाते. ही शस्त्रकिया सध्या बहुप्रचलित लॅप्रोस्कोपी पद्धतीव्दारे केली जाते. ज्यामध्ये दुर्बिणीव्दारे पोटातील अवयवची पाहणी करून अपेंडिसचा भाग मुळातुन काढून टाकला जातो. ही शस्त्रकिया कमीतकमी छेद घेवून केल्यामुळे रिकव्हरी जलद होते. हा लॅप्रोस्कोपी शस्त्रकियेचा फायदा असतो.

हर्निया म्हणजे काय?

उदराच्या आंतरभागातील दाब सतत वाढल्या मुळे त्याचा परिणाम आन्त्रास आवरण करणाऱ्या पेशी स्नायू तसेच वृषणभागी होतो. काही वेळा नाभी प्रदेशी बेंबीजवळ वाढत जाणारा फुगवटा तयार होतो. पोटाच्या पुढच्या किंवा बाजूच्या भागी तसेच पूर्वीच्या शस्त्रकियेच्या जागी काही प्रसंगी अशी स्थिती जाणवते त्यास हर्निया असे म्हटले जाते. स्थुलता, जलोदर आदी कारणाने सुद्धा मांस पेशी ताणल्या जावून हर्निया होवू शकतो.

हर्नियाचे किती प्रकार आहेत?

१. जंखाप्रदेशी व वृषणभागी होणारा हर्निया -

हर्नियाचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. याला Inguinal Hernia नावाने देखील ओळखले जाते. हे प्रामुख्याने जांघ, जांखेच्या ठिकाणी होतो.

2. फेमोरल हर्निया फेमोरल हर्निया- (Femoral hernia) प्रामुख्याने पोटचे जांघ जांघापर्यंत रक्तवाहिन्याच्या बाजूस तयार होतो.

३. अंबिलीकल (नाभी) हर्निया- यात नाभी हर्निया आहे (Umbilical Hernia) नावाने देखील ओळखले जाते. नावाप्रमाणेच, या प्रकारचे हर्निया प्रामुख्याने अंबिलीकस म्हणजेच बेंबीशी संबंधित आहे,

४. हायटस हर्निया :- पोटामध्ये आमंशाजवळच्या स्नायूमध्ये कुमकुवता येवून या प्रकारचा हर्निया होण्याची शक्यता असते.

हर्निया होण्याची कारणे

हर्निया हे मुख्यतः या सहा घटकांमुळे होऊ शकतो.

१. पोटातील स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे हर्निया होऊ शकतो.

२. बऱ्याच काळासाठी खोकला - एखाद्या व्यक्तीस दीर्घ काळापर्यंत खोकला असेल तर हर्निया होऊ शकतो.

३. जास्त वजन असणे - ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे, त्याला हर्निया होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. काही वेळा वजन नियंत्रणात आणण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया किंवा लिपोसक्शन करावे लागू शकते.

४. वय अधिक असणे. ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला हर्निया होण्याची जास्त शक्यता असते कारण या अवस्थेत त्याच्या शरीराच्या स्नायू खूप कमजोर झालेले असतात.

५. विशिष्ट प्रकारचे आजार - प्रोस्टेट ग्रंथींचा आजार, मूत्रमार्गाचे आजार किंवा यकृताच्या समस्या, जलोदरसारख्या समस्या असतील तर हर्नियाची समस्या असू शकते. काही वेळा प्रोस्टेटची शस्त्रकिया करावी लागू शकते.

६ जन्मत: असणाऱ्या समस्या - काही बालकांमध्ये जन्मापासून पोटाच्या भिंतीतील स्नायूंतील गत दोषामुळे हर्निया स्थिती होते. तसेच काही मुलांमध्ये वृषण भागी पाण्यासारखा द्रव जन्मत: जमा असतो. त्यास हायड्रोसिल असे म्हणतात. अशा वेळी ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

७. पोट विकारासाठी केलेल्या टाक्याच्या शस्त्रक्रियेनंतर हर्निया होण्याची शक्यता असते.

हर्नियाची लक्षणे

  • हर्नियामध्ये खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसत असतील तर वेळीच निदान आणि उपचार होणे आवश्यक असते.

  • पोटावर सूज - विशेष करून पोटाच्या ज्या भागात स्नायूत कमजोर असतात तेथे ही सूज येते.

  • बध्दकोष्टता - सातत्याने पोट साफ होत नसल्यास आतड्याच्या आतील भागाचा दाब पोटाच्या बाहेरील भिंतीवर पडून हर्नियाची लक्षणे दिसतात.

  • पोटात व छातीत दुखणे - बऱ्याच लोकांना छातीत, पोटात आमंशयाच्या ठिकाणी वेदना होतात. अशा वेळी सेवन केलेल्या अन्नाचे पचन होण्यास आतड्याच्या हालचाली नीट होत नसल्याने वेदना, पोट फुगणे अपचन ही लक्षणे होतात. हायटस हर्निया मध्ये ही लक्षणे दिसतात.

  • उलट्या - उलट्या गंभीरपणे घेतल्या जात नाहीत. परंतु कधीकधी उलट्या हे हर्नियाचे लक्षण असू शकते. ज्या रूग्णांना पूर्वीचा हर्नियाचा त्रास आहे. अशामध्ये आतड्याचा भाग हर्नियाच्या ठिकाणी अडकल्यास हे लक्षण दिसते.

  • चालताना आणि बसताना अडचणी येणे - हर्नियाची समस्या वाढली की व्यक्तीस चालताना किंवा बसण्यात अडचण येते.

हर्नियाचा उपचार कसा करावा ?

सामान्यत: हर्निया हा शस्त्रकिया करून पूर्ण बरा होणारा आजार आहे. अशा रूग्णांमध्ये लक्षणानुसार तात्पुरते उपचार करून पुढील तपासण्या सोनोग्राफी, कार्डिओग्राम, रक्त तपासणी नंतर आवश्यक शस्त्रकियाचा सल्ला दिला जातो. यात ओपन मेथड म्हणजे टाक्यांची शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपी मेथड म्हणजेच बिन टाक्यांची शस्त्रकिया या पद्धती वापरल्या जातात. दोन्ही पद्धतीमध्ये हर्नियामधील पोटाच्या स्नायू दुरूस्त करून त्यात शरीरास अपाय न करणारी जाळी (पॉलिप्रोपेलिन मेश) बसवली जाते. लॅप्रोस्कोपीव्दारे ही प्रक्रिया होत असल्याने यामध्ये व्रण किंवा जखम राहत नाही. तसेच आजारही त्वरीत बरा होता तसेच पुन्हा हर्निया होण्याचा कमी असतो. यास लॅप्रोस्कोपीक हर्निया रीपेअर असे म्हणतात.

विटा येथील स्वरूप लेझर व लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल

स्वरूप हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपी व लेसर शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच झाले.
स्वरूप हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपी व लेसर शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच झाले.

सध्या जागतिक स्तरावरील ही अत्याधुनिक उपचार पद्धत डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे यांच्या स्वरूप लेझर व लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल विटा ( जि. सांगली)  येथे उपलब्ध आहे. येथे आज पर्यंत अनेक रूग्णांनी लॅप्रोस्कोपी करून ते बरे झालेले आहेत.

३ ऑक्टोबर २०२४ ते ७ ऑक्टोबर २०२४ या काळात विट्यातील स्वरूप हॉस्पिटलमध्ये अपेंडिस, गर्भाशय विकार, पित्ताशय विकार व हर्नियाग्रस्त रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपी व लेसर शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ सर्जन डॉ. गणेश पाडळकर, लॅप्रोस्कोपी कार्य व लेसर सर्जन डॉ. संदीप माळी डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे, प्रख्यात लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अमुल पावसकर यांनी रुग्ण सेवा दिली.

स्वरूप हॉस्पिटल मध्ये अपेंडिस, गर्भाशय विकार, पित्ताशय विकार व हर्नियाग्रस्त रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपी व लेसर शस्त्रक्रिया शिबिर झाले.
स्वरूप हॉस्पिटल मध्ये अपेंडिस, गर्भाशय विकार, पित्ताशय विकार व हर्नियाग्रस्त रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपी व लेसर शस्त्रक्रिया शिबिर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news