Digital burnout | काय आहे डिजिटल बर्नआऊट?

Digital burnout
Digital burnout | काय आहे डिजिटल बर्नआऊट?
Published on
Updated on

कृती शर्मा

डिजिटल युगात बरेचजण घरून (वर्क फ्रॉम होम) काम करतात. घरून काम केल्याने वेळ, प्रवास आणि ऑफिस टाईम वाचतो. असे असले तरी त्याचे मानसिक आरोग्यावरही काही घातक परिणाम होतात आणि यालाच डिजिटल बर्नआऊट असेही म्हणतात.

रिमोट वर्क अर्थात वर्क फ्रॉम होममुळे लोक घरून काम करू शकतात, पण याचसोबत बराच वेळ स्क्रीनसमोर बसणे, सतत नोटिफिकेशन्स येणे, काम आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन साधता न येणे, यामुळे त्यांना मानसिक थकवा जाणवू लागतो. त्याचा शारीरिकही परिणाम होतो.

डिजिटल बर्नआऊट का वाढतोय?

सतत ऑनलाईन राहण्याचा ताण : ईमेल, मेसेजेस, मीटिंग्स यामुळे लोकांना नेहमी कामात असल्यासारखे वाटते. यामुळे तणाव, चिंता आणि झोपेच्या समस्या वाढतात.

घर आणि ऑफिस एकच होणे : घरून काम करताना लोकांना ब्रेक घेताना किंवा काम बंद करताना नकळत अपराधीपणाची भावना येते. यामुळे मानसिक थकवा येतो.

वाढता स्क्रीन टाईम : सतत ऑनलाईन मीटिंग्स, वाढता लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर यामुळे डोळ्यांना त्रास, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होते. याला स्क्रीन फटीग म्हणजेच स्क्रिनमुळे येणारा थकवा असे म्हणतात.

सामाजिक संपर्क कमी होणे : फक्त ऑफिसमध्ये होणार्‍या गप्पा, टीमसोबत घालवलेला सगळा वेळ, एकमेकांसोबत मिळून केलेले काम यामुळे एकटेपणा आणि निराशा वाढू शकते.

स्वतःला सिद्ध करण्यासाठी येणारे दडपण : लोकांना वाटते की, त्यांनी नेहमी व्यस्त दिसले पाहिजे.

यामुळे जास्त काम, मल्टिटास्किंग आणि शेवटी बर्नआऊटचा परिणाम होतो.

या समस्यांना कसे हाताळाल?

नियम तयार करा की, कामाचे तास उलटल्यावर परत कसलाही मेसेज नको : ठरलेल्या वेळांमध्येच मीटिंग करणे, कामाचे तास संपल्यानंतर ईमेल्स करू नये, त्यांना प्रतिसाद देऊ नये, असे नियम स्वतःसाठी लागू करा.

अधूनमधून ब्रेक घ्या : दर तासाला छोटासा ब्रेक घ्या, एका जागी न बसता केलेली मीटिंग किंवा काही वेळ स्क्रीन बंद ठेवणे फायदेशीर ठरेल.

मानसिक आरोग्याला प्राधान्य : कामाचा ताण, मानसिक आरोग्य याबाबत मोकळेपणाने बोला आणि सहकार्‍यांशी चर्चा करा.

काम-घर यांचा समतोल राखा : कुटुंबासाठी वेळ काढा, मानसिक आरोग्याशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, समुपदेशनाची मदत घ्या आणि तणावमुक्त राहायला शिका.

कामाचे कौतुक करा : काम करताना कर्मचार्‍यांचे कौतुक केल्याने त्यांचे मनोबल वाढते. कामाचे कौतुक केल्यास त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते आणि तणावही कमी होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news