पुढारी ऑनलाईन डेस्क
पहिला संभोग ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट असते. परंतु तो आनंददायी असेलच असे नाही. अनेकदा संभोगापूर्वी केलेल्या कल्पना पहिला संभोग करताना सत्यात उतरत नाहीत. कारण अनुभवाअभावी आणि ज्ञानाअभावी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जातात. तसेच काही चुकीच्या कल्पनाही मनाशी बाळगलेल्या असतात. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पडते. याचा भावी कामजीवनावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून पहिला संभोग करताना येणाऱ्या अडचणींची पूर्वकल्पना असणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयी लैगिक समस्या तज्ज्ञ डॉ. राहुल पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
डॉ. पाटील सांगतात, विवाहपूर्व मार्गदर्शन यामध्ये जर मानवी काम जीवनाची शास्त्रीय माहिती दोघांनी घेतली तर अडचण येण्याचं कारण नसतं. पण अडचणी ज्या येतात, या मागे मुख्य कारण आहे ते म्हणजे काम जीवना विषयीचा अभ्यास कमी असणं. स्त्रीमध्ये अडचण म्हटलं तर पहिला तिला संभोग वेदना वेदनादायी वाटू शकतो. दुसरा ती स्त्री दबावाखाली असेल म्हणजे ती तिच्या घरच्यांना सोडून दुस-या घरी आलेली असते, त्यामुळे पतीच्या घरी रुटीन लागायला वेळ लागतो. तीसरी आहे स्त्रीला आतापर्यंत शरीर झाकण्याचा जो काही संस्कार केलेला आहे आणि अचानक लग्नानंतर एका पुरुषासमोर चार भिंतींच्या आत तिला निर्वस्त्र व्हावं लागतं यात तिला संकोच वाटू शकतो. चौथं आहे; लग्नानंतरच्या पहिल्या रात्री पतीसोबत संभोग करताना तिची वासना वाढेलच असंही काही नाही. पाचवं असं आहे की, पुरुषाच्या लिंगाच्या आकाराविषयी गैरसमज असेल तर ती स्त्री संभोगाला तयार होणार नाही किंवा तिला भीती वाटेल. याच्यामुळे नेमकं पुरुषावरसुद्धा दबाव येतो की पहिल्या रात्री आपण चांगला शारीरिक संबंध करू दाखवावा नाहितर मग स्त्री काय म्हणेल. या सक्तीखाली पुरुष जर सेक्स करायला तयार झाला त्याच्या लिंगामध्ये ताठरता कदाचीत येऊ शकणार नाही. किंवा विर्यपतन लवकर होईल. तसेच लिंगावरची स्किन मागे आली नाही तर जोरात धक्का बसल्यामुळे लिंगाची स्किन फाटू शकते. याला बोली भाषेत शीर तुटण असं म्हणता. खरतरं शीर तुटत नसते. जर जोडप्याने अभ्यास करून जर बरोबर सेक्स केला तर कुणालाही काही त्रास होत नसतो. स्त्रीचे योनी द्वार पटल फाटत असताना तिला वेदना वेदना होते हे सत्य आहे. पण जे अतिशोयोक्तीपूर्ण सांगतात की, प्रचंड वेदना होतात आणि खूप रक्तस्त्राव होतो; वास्तविक त्या लोकांचा चूकीचा समज झालेला असतो, म्हणून ते तसं म्हणतात. या सर्वांला एक चांगली ट्रीटमेंट आहे ती म्हणजे, विवाहाच्या आधीच किंवा विवाह केल्यानंतर पहिल्या सेक्स आधी सेक्सबाबतची परिपूर्ण माहिती डॉक्टरांकडून करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या सेक्समध्ये आनंद मिळतो आणि अडचणी जवळजवळ येत नाहीत.