Weight loss Fruits : वजन कमी करायचं? ‘या’ फळांपासून लांब रहा…

वजन कमी करायचं? ‘या’ फळांपासून लांब रहा…
  Weight loss Fruits : वजन कमी करायचं? ‘या’ फळांपासून लांब रहा…
Weight loss Fruits : वजन कमी करायचं? ‘या’ फळांपासून लांब रहा…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या शर[राला जीवनसत्वे, पोषक तत्वे, क्षार मिळावे म्हणून खूपजणांना दररोज फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आहार तज्ज्ञां‍च्या मते नाष्ट्याला किमान एकतरी फळ (Weight loss Fruits) खावे आणि डायटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते दिवसभरात किमान पाच फळांचे सेवन केले तर ह्रदयरोग, रक्तदाब, कॅन्सरचा धोका कमी संभवतो. जे लोक वजन कमी करण्याचा उद्देश ठेवतात ते आपल्या डायट प्लॅनमध्ये फळे आणि हिऱव्या भाज्यांचा समावेश करतात. डॉक्टर आणि आहार तज्‍ज्ञ डॉ. मायकल मोस्ले (Dr. Michael Mosley) यांच्या मते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी काही फळांचे सेवन करु नये. कारण ही फळे (Weight loss Fruits) तुमचे वजन वाढवतात. पाहूया ती फळे कोणती आहेत ते.

Weight loss Fruits : फळांचे सेवन करणे

मायकल मोस्ले यांच्या मते ज्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांनी फळांचे सेवन करणे हे फायदेशीर आहे. जर का तुम्ही वजन कमी करत असाल आणि डायट फॉलो करत असाल तर, त्यांनी सफरचंद, जांभळे, द्राक्षे, एवोकॅड अशा फळांचे सेवन केले तर चालेल कारण या फळांमध्ये कमी प्रमाणात साखर असते. पण आंबा, खरबूज, अननस ही फळे वजन कमी करताना शक्यतो टाळावे कारण यामध्ये नैसर्गिक साखर अधिक असते.

डॉ.माइकल मोस्ले यांच्या मते आंब्यामध्ये ४५ ग्रॅम, द्राक्षे २३ ग्रॅम, एवोकॅड मध्ये १.३३ ग्रॅम साखर असते. ज्या लोकांना वजन कमी करायचे (Weight loss Fruits)आहे त्यांनी आंबे, केळी यांचे सेवन टाळावे; पण ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी मात्र जरुर या फळांचे सेवन केले तरी चालेल.

वजन कमी करण्यासाठी साखर आणि मीठ याचे अधिक प्रमाणात असलेले पदार्थ टाळावेत. त्याचबरोबर पॅकिंग पदार्थ बिस्कीट, चिप्स टाळावेत, असाही सल्‍ला डॉ.मायकल मोस्ले देतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news