डॉ. विजयकुमार माने
हिपॅटिटिस बी हा हशि-बी या विषाणूमुळे होणारा यकृताचा गंभीर आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे केलेल्या संशोधनानुसार दोनशे कोटींपेक्षा अधिक लोकांना या विषाणूंचे संक्रमण झाल्याचे दिसून येते. संशोधनातील अंदाज आहे, की भारतात जवळपास चार कोटी याचे संग्राहक आहेत. हा विषाणू एच. आय. व्ही.च्या तुलनेत 50-100 टक्के अधिक घातक आहे. कारण, याचा बॅक्टेरिया शरीराच्या बाहेरही कमीत कमी 7 दिवसांपर्यंत जिवंत निरोगी व्यक्तीला प्रभावित करू शकतो; पण वेळेवर जर आपण या आजाराच्या लक्षणांची ओळख पटवली, तर जीव नक्की वाचू शकतो.
हा रोग असलेल्या बहुतांश लोकांना अनेक वर्षे लक्षणे काहीच दिसून येत नाहीत. जेव्हा हा विषाणू दीर्घ काळासाठी यकृतामध्ये राहतो तेव्हा मात्र साधारण अंगदुखी, वारंवार ताप येणे, भूक न लागणे , थकवा जाणवणे, उलटी, मळमळ, पोटदुखी लघवीचा रंग गडद होणे, काळ्या रंगाचे शौचाला होणे, डोळे किंवा लघवी पिवळी पडणे (कावीळ) शी लक्षणे दिसतात. पोटावर सूज येणे, पायावर सूज येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, अंगाला खाज येणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. कारण या आजारामध्ये जेवढे घातक व्हायरस आहेत त्यातील हा सर्वात घटक व जीवघेणा मानला जातो.
हा विषाणू एका व्यक्तीतून दुसर्या व्यक्तीमध्ये एकतर संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. हा एक असा व्हायरस आहे की याला शरीरातून पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकत नाही. हा व्हायरस फार शांतपणे अॅटॅक करतो आणि व्यक्तीला त्याची माहितीही कळत नाही. याची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह तपासणी आल्यानंतरसुद्धा कित्येक वर्ष रुग्णाला काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. दीर्घकाळासाठी व्हायरस शरीरात राहतो; पण व्यक्तीला काही त्रास नसतो; पण या व्हायरसमुळे यकृताला होणारे नुकसान खूप प्रचंड प्रमाणात असते. कारण जेव्हा हा विषाणू शरीरात शिरतो तेव्हा तो थेट लिव्हरमध्ये जातो. आणि यकृताला इजा पोहोचवतो.
याचा विषाणू यकृतामध्ये गेल्यानंतर अचानक व्यक्तीला कावीळ होते. त्याला Acute Hepatitis B असे म्हणतात. या स्थितीत शरीर hepatitis B विषाणूला नष्ट करायचा प्रयत्न करत असत. त्या दरम्यान हा व्हायरस मरतो; पण लिव्हर किंवा यकृतामधील पेशीही मरतात. आणि त्या व्यक्तीला अचानक कावीळ होते; पण कालांतराने काही आठवड्यानंतर त्या व्यक्तीचे यकृत पूर्व स्थितीत येते.
Hepatitis B चा विषाणू नष्ट होतो. किमान 95% लोकांमध्ये हा Hepatitis चा विषाणू कायमस्वरूपी निघून जातो. हि स्थिती फक्त Acute Hepatitis B म्हणजे अचानक झालेली कावीळ यामध्ये दिसून येते; पण काही प्रकार असेही होतात की एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हिपॅटायटिसचा विषाणू शिरलेला आहे; पण त्या व्यक्तीला Acute Hepatitis झालेला नाही म्हणजेच त्याचे शरीर, त्याचे यकृत या विषाणूला नष्ट करू शकत नाही. त्यामुळे हा विषाणू शरीरात नुसतं राहत नाहीत तर यकृताला दीर्घ काळासाठी निकामी करत असतो. त्यातून लिव्हर सिरोसिस व पांढरी कावीळ, लिव्हर कॅन्सर यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
Hepatitis B हा विषाणू महिनोमहिने शरीरात राहिल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जेव्हा अचानक कावीळ झालेली आहे व Hepatitis B पॉझिटिव्ह आहे या रुग्णांना प्रचलित उपचार पद्धतीमध्ये सपोर्टिव्ह औषधे अँटिबायोटिक किंवा लघवीचे प्रमाण कमी, सूज असेल तर डाययुरेटिक (Diuretic) दिली जातात. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये अँटिव्हायरस उपचारपद्धती आहे. ही औषधे दीर्घकाळासाठी घ्यावी लागतात. या औषधामुळे कावीळही नियंत्रणात ठेवण्यासाठी 3 महिने वेळ लागतो; पण मॉडर्न होमिओपॅथी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रिटमेंटमुळे आज कावीळवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविता येते व काविळीचे प्रमाण पहिल्या महिन्यापासून कमी येऊ लागते.
यकृताच्या आजारामध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊन autoimmune Hepatitis सुद्धा होऊ शकतो. मॉडर्न होमिपॅथीच्या उपचाराने सुरुवातीच्या काळापासून प्रतिकारशक्ती चांगली राहते व इतर संसर्गजन्य आजाराला चांगल्याप्रकारे प्रतिबंध होऊ शकतो.
वारंवार अँटिबायोटिक किंवा वेदनाशामक औषधे खाल्ल्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याचे प्रमाण वाढत आहे. मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधे उपचाराने आपण अँटिबीओटिक किंवा वेदनाशामक औषधे टाळून भविष्यातला धोका निश्चितपणे टाळू शकतो.
यकृताचा कोणताही आजार मग तो यकृताचा कॅन्सर असो, सिरॉसिस असो,हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी असो प्रचलित औषध उपचारींनी तो बरा होत नाही व वारंवार रुग्णास अॅडमिट करून उपचार घ्यावे लागतात.पण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने हा आजार ज.झ.ऊ. इरीळी उपचारांनी चांगल्याप्रकारे नियंत्रणात राहतो. मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधाने यकृताचे कार्य करण्याची क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते. औषधाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. योग्य आहार, औषधे व पथ्ये पाळल्यास आजार अत्यंत चांगल्या पद्धतीने बरा होतो.
हिपॅटायटिस बी या विषाणूमुळे जो व्हायरल लोड वाढलेला असतो तो या औषध उपचारांनी पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतो.
योग्य औषधोपचार वेळीच करणे यकृताच्या आजारामध्ये खूप फायदेशीर ठरते. औषधोपचाराबरोबरच योग्य आहार व इतर पथ्य करणे खूप गरजेचे आहे . त्यासाठी खालील गोष्टी कराव्यात .
– योग्य आहार घ्यावा,
– पित्तशामक पचनास हलकं आहार घ्यावं , तेलकट पदार्थाचे मर्यादित सेवन करावे. चरबीयुक्त स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तातील चरबीचे आणि कोलेस्टेरालचे प्रमाण वाढते, त्यामुळे फॅटी लिव्हर हा यकृत विकार उद्भवतो. त्यासाठी चरबीयुक्त पदार्थ जास्त खाऊ नये, दारू (मद्यपान), तंबाखू यामुळे अनेक अपायकारक विषारी घटक शरीरात जास्त असतात. त्यामुळे या व्यसनापासून दूर राहावे, रात्री पुरेशी झोप घ्यावी, जागरण करणे टाळावे, मानसिक ताणतणावरहित राहावे, नियमित व्यायाम करावा. या आजारात रुग्णांनी विश्रांती घेणे आवश्यक आहे. Hepatitis च्या रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्यावीत, स्वतःहून औषधे आणून प्रयोग करू नका, कारण चुकीच्या औषधांमुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
असुरक्षित लैगिक संबंध टाळा, वेश्यागमन, समलैंगिकता यासारख्या विकृत गोष्ट अनैतिक गोष्टीपासून दूर राहावे. डिहायड्रेशन स्थिती उद्भवू नये, यासाठी तरल पदार्थाचे अधिक सेवन करावे. रक्त घेताना किंवा अवयव प्रत्यारोपणवेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी विशेष दक्ष राहावे. रक्त, अवयव हे हिपॅटायटिस बाधित नसल्याची खात्री करून घ्यावी.
वापरलेल्या सलाईन, इंजेक्शन, सुया यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली. वैद्यकीय कचर्यापासून दूर राहावे. हिपॅटायटिस रुग्णांची सुश्रुषा करणार्यांना नर्स इ. विशेष दक्षता घ्यावी.
* दूषित पाणी पिणे टाळावे.
* पाणी गरम करून निर्जंतुकीकरून वापरावे.
* पावसाळ्याच्या दिवसात पाण्या विषय विशेष खबरदारी घ्यावी. दुसर्यांच्या स्वच्छता साधनांचा वापर करू नये. उदा. साबण , कपडे, टूथब्रश, रेझर्स इ. वस्तू वापरू नये.
हिपॅटायटिस बी हा एक गंभीर विकार असून त्यावर वेळेच उपचार करणे गरजेचे आहे. हिपॅटायटिसवर योग्य उपचार न केल्यास खालील आरोग्यविषयक दुष्परिणाम उत्पन्न होतात.
* यकृताचे विविध आजार उद्भवतात – लिव्हर सिरॉसिस हा विकार होणे.
* लिव्हर कॅन्सर होणे – लिव्हर फेल्यूर -किडनी निकामी होणे -हेपॅटिटिसमुळे रुग्ण दगावण्याची सुद्धा अधिक शक्यता असते. भारतामध्ये हिपॅटिटिसमुळे दरवर्षी सुमारे 25 लाख रुग्ण मरण पावतात. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये त्याची केस स्टडी करून सर्व प्रथम रुग्णास दिलासा दिला जातो. रुग्ण आजाराने व भीतीने पूर्ण घाबरून गेलेला असतो. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने या आजारातील पहिल्या टप्यात सुरुवातीची बिघडत चाललेली आरोग्य स्थिती प्रथम सामान्य केली जाते. आणि दुसर्या टप्यात मुख्य आजाराला उपचाराची योग्य दिशा दिली जाते.
मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने लिव्हरची कार्यक्षमता वाढते. जेव्हा रुग्णाला हिपॅटायटिस बीमुळे लिव्हर सिरिसिस या आजारात लिव्हर ट्रांप्लान्ट हा एकच पर्याय उरलेला असतो. अशावेळी मॉडर्न
होमिओपॅथीच्या उपचाराने रुग्णास लिव्हर ट्रान्सप्लांट निश्चितपणे टाळता येतो. मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेताना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची किंवा रुग्णास स्वतः येण्याची आवशकता नसते. रुग्णाचे रिपोर्ट पाहून त्या आजारावर औषधौपचार दिले जातात. वेळोवेळी केल्या जाणार्या लॅब टेस्ट उदा. CBC sonography ,liver function test B रिपोर्टस्द्वारे रुग्णाच्या तब्येतीमध्ये वेळोवेळी सुधार समोर येतात. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांच्या साहाय्याने आज अनेक रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले आहे.