टॉन्सिलायटिस आणि होमिओपॅथिक उपचार | पुढारी

Published on
Updated on

डॉ. प्रिया पाटील

टॉन्सिल्स घशाच्या मागील बाजूस असणारी लसिकापेशीची जोडी असते, टॉन्सिलायटिस म्हणजे या लसिका पेशींना झालेला संसर्ग होय. हा संसर्ग सामान्यपणे विषाणूमुळे किंवा जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस, स्टॅफिलोकोकस, न्यूमोकोकस या ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणू होय आणि विषाणूमुळेसुद्धा होतो. टॉन्सिलटायटिस साधारण 4 ते 6 दिवसांत बरे होतो.

टॉन्सिलायटिस होण्याची कारणे ः साधारणपणे टॉन्सिलायटिस वयाच्या 15 वर्षांपर्यंत जास्त पाहण्यात येतात. तरी पण त्याला वयाची अट नाही. थंड पदार्थांच्या जास्त सेवनामुळे तसेच संसर्गजन्य असल्यामुळे जास्त गर्दीच्या ठिकाणी गेल्याने होतो. हवेतील बदलामुळे वातावरणातील अचानक बदलामुळे, रोगप्रतिकारक शक्‍ती कमी झाल्यामुळे, वारंवार सर्दी व श्‍वसनाचे आजार वरचेवर होत असेल तर होतो.

टॉन्सिलायटिसची लक्षणे ः घसात खवखवल्यासारखे होते, कोरडेपणा जाणवतो, घशात दुखणे व अचानक थंडी वाजून ताप भरतो, तापाचे प्रमाणे कमी जास्त असते, घशात दुखणे, जास्त प्रमाणात असते तसेच गिळताना त्रास होतो, लहान मुले जेवत नाहीत. कारण घसा जास्त दुखतो म्हणून, आवाज बसतो, सर्दी व खोकला असतो, नाकामधून आतमध्ये सर्दी उतरते, जबड्याच्या हाडामध्ये अवधानाच्या गाठी वाढतात, झोपताना श्‍वास घेण्यास अडचण होते, टॉन्सिलायटिस बरेच कालावधी राहिला तर कान फुटतो, दुखतो.

तपासणी ः तोंड उघडून पाहिल्यास दोन्ही बाजूच्या टॉन्सिल्सचा रंग लाल दिसतो. तसेच त्याचा आकारही वाढलेला असतो. चिरकाल किंवा बरेच दिवसांचा टॉन्सिल आकाराने लहान किंवा मोठा असू शकतो, मानेत अवधानाच्या गाठी असतात.

दुष्परिणाम ः कधी कधी टॉन्सिलमध्ये पू भरून फोड तयार होतात. त्याला टॉन्सिल्स गळू (टॉन्सिल्सर अ‍ॅब्सेस) असे म्हणतात.

सारखी उपयोगात येणारी होमिओपॅथिक औषधै

फाइटोलेक्‍का : हे औषध टॉन्सिलायटिससाठी फार उपयुक्‍त आहे. यामध्ये टॉन्सिल गडद लाल/निळसर लाल रंगाचे असतात. घसा कोरडा व आकसून घेतल्यासारखा होतो. उजवी बाजू जास्त त्रासदायक असते. गिळताना कानाकडे जास्त कळा सुटतात. गरम पदार्थ गिळू शकत नाही. तसेच हे औषध टॉन्सिल्स गळू (ढेपीळश्ररी अलीलशीी) करिता उपयुक्‍त आहे.

मर्क्युरियस आयोडेटस फ्लेक्स : टॉन्सिल्सला सूज येेते. ही सूज लवकर वाढते. घसा सुजतो. त्यामुळे गिळताना त्रास होतो. सूजलेल्या टॉन्सिलमधून पातळ पदार्थ द्रवतो. त्याला घाणेरडा वास येतो. उजव्या बाजूचे टॉन्सिल जास्त प्रमाणात सूजतात. घशात काही तरी अडकल्यासारखे वाटते व ते सतत गिळावे वाटते. अशावेळी हे औषध उपयुक्‍त असते.

बेलौडौना : टॉन्सिल सुजेमुळे लालभडक व चकचकीत होतात. सूज जास्त असते. सूजलेल्या टॉन्सिलचा आकार जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे घसा भरलाय असे वाटते व गिळताना त्रास होतो. पाणी पिणेसुद्धा कठीण वाटते. घशाला आतून खरवडल्यासारखे वाटते.

बेप्टिशिया टिंक्टोरिया : घसा सुजून लालबुंद होतो. घसा आवळून धरतो. घट्ट पदार्थ (अन्‍न पदार्थ) गिळताना जास्त त्रास होतो. त्या मानाने पाणी व इतर पेय पदार्थ सहज गिळले जातात. जुनाट टॉन्सिलायटिससाठी हे औषध गुणकारी आहे.

वरील औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा लागतो.

टॉन्सिलायटिसमध्ये घ्यावयाची काळजी : विश्रांतीमुळे आजार बरा होण्यास मदत होते. त्यामुळे विश्रांती घेेणे गरजेचे आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या दिवसातून दोनदा कराव्यात, गिळताना जास्त त्रास होत असल्याने पातळ पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात करावे, घशाला पडणारा कोरडेपणा कमी होण्यासाठी वाफ तोंडावाटे घेणे उपयुक्‍त ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news