डॉ. आदित्य साई
जिममध्ये व्यायाम करताना खांद्याच्या दुखण्यामागे बरीच कारणे असू शकतात. दुखापत, सातत्याने होणारी हालचाल, वजनदार वस्तू उचलणे, अपघात, खेळणे किंवा वाढते वय या कारणांमुळे खांद्याचे दुखणे उद्भवू शकते.
खांद्याच्या दुखण्यामुळे खा हाताच्या हालचालीवर मर्यादा येते. खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात.
यामुळे रोटेटर कफ टिअर्स, खांद्याला इजा होणे, बर्साइटिस, फ्रोझन शोल्डर, टेंडोनिटिस आणि अगदी फॅक्चर यासारख्या विविध समस्यांचा धोका वाढू शकतो. काही महत्त्वाच्या टिप्स खांद्याला दुखापत होण्यापासून टाळतात.
वर्कआऊट रुटीन सुरू करण्यापूर्वी व्यवस्थित वॉर्मअप करावा. वेदनामुक्त हालचालींसाठी आपल्या खांद्याचे स्नायू वॉर्मअप करावेत. स्ट्रेचिंग आणि कार्डिओ करावे.
कारण, ते हलके फुलके आणि सोपे आहेत. तसेच ते रक्तप्रवाह सुरळीत करण्यास प्रोत्साहन देतात. नियमित किमान ५ ते १० मिनिटे वॉर्मअप केले पाहिजे. ते तुमच्या खांद्यांना व्यायामापूर्वी तयार करतात. त्यामुळे खांद्यांना दुखापत होण्याचा धोकादेखील कमी होतो.
चुकीच्या शारीरिक मुद्रेमुळे खांद्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. जास्त वजन उचलताना योग्य मुद्रा राखण्याचा प्रयत्न करावा. बेंच प्रेस, ओव्हरहेड लिफ्टस् किंवा ट्रायसेप्स एक्स्टेंशन,
अरनॉल्ड प्रेस, फ्रंट राईज किंवा लॅटरल राईजेस यासारख्या काही व्यायामादरम्यान चुकीची मुद्रा तुमच्या खांद्यावर अतिरिक्त ताण आणू शकते. तुमच्या सुरक्षिततोसाठी योग्य तंत्रे आणि पद्धती जाणून घ्याव्यात.
जड उचलणे किंवा तीव्र कसरत करणे टाळावे. यामुळे खांद्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच खांद्यांना दुखापत आणि फ्रैक्चर होण्याची शक्यता असते.
सुरुवातीला व्यायाम करतातना हळूहळू आपल्या व्यायामाची तीव्रता वाढवत जावी. हे स्नायू आणि सांध्यांना जुळवून घेण्यास मदत करते.
खांद्याच्या दुखापतींचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे स्नायू मजबूत करणे.