

डॉ. सौरभ सेठी
आजकाल अनेकांच्या कानात वायरलेस ईअरबडस् दिसू लागले आहेत. संगीत ऐकणं असो, ऑनलाईन क्लासेस असोत किंवा ऑफिसच्या मिटिंग्ज ईअरबडस्चा वापर वाढत चालला आहे; मात्र तो आरोग्यदायी आहे का, याचा विचार कुणीही करत नाही.
ईअरबडस् ब्लूटूथ या तंत्रज्ञानावर चालतात. म्हणजेच रेडिओ-फ्रिक्वेन्सी सिग्नलद्वारे ते फोन किंवा इतर उपकरणांशी जोडले जातात. या लहरी नॉन-आयोनाइजिंग स्वरूपाच्या असतात. त्या डीएनएवर थेट परिणाम करत नाहीत आणि कर्करोगासारखे आजार घडवण्याइतक्या शक्तिशाली नसतात. त्यामुळे रेडिएशन हा मुद्दा वैज्ञानिक द़ृष्ट्या धोकादायक नाही. खरा धोका कुठे आहे? तर ईअरबडस्मधून येणार्या आवाजाच्या तीव्रतेत खरा धोका दडलेला आहे. सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यास ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते. आरोग्यतज्ज्ञ याबाबत 60/60 नियम सांगतात. — म्हणजे आवाज 60 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नका आणि सलग तसेच दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ ईयरबडस् लावू नका.
ईअरबडस् फाटण्याची शक्यता फारच कमी आहे; मात्र बनावट किंवा स्वस्त दर्जाच्या ईअरबडस्मध्ये निकृष्ट बॅटरी वापरली गेल्यास ती ओव्हरहीट होऊन अपघात होऊ शकतो. म्हणूनच नेहमी विश्वासार्ह ब्रँडचे ईअरबडस् वापरावेत आणि चार्जिंगवर तासन् तास ठेवू नयेत.
सतत इयरबडस् लावल्याने कानातील मळ बाहेर न पडता अडकतो.
ईअरबडस् स्वच्छ न ठेवल्यास जीवाणू (बॅक्टेरिया) कानात जाऊन संसर्ग करू शकतात.
काही लोकांना ईअरबडस्च्या साहित्यामुळे अॅलर्जी होते किंवा दीर्घकाळ लावल्याने कान दुखू शकतात.
60/60 नियम काटेकोर पाळा.
नॉईज कॅन्सलिंग इयरबडस् वापरा, ज्यामुळे आवाज वाढवण्याची गरज भासत नाही.
प्रत्येक तासाने 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या.
इयरबडस् नियमित स्वच्छ करा.
कान दुखणे, कानात गुंजनं (रिंगिंग) किंवा ऐकण्याची अडचण जाणवल्यास डॉक्टरांना भेटा.
शक्यतो कमी आवाजात संगीत ऐका.
दीर्घकाळ ऐकायचं असल्यास इयरबडस्ऐवजी हेडफोन वापरा.